अन्न व औषध प्रशासनाची कारवाई
प्रतिबंधित अन्न पदार्थाचा रुपये ६,२०,६९०/-चा साठा जप्त
जळगाव, दिनांक 12 जून, 2024 ( जिमाका वृत्तसेवा ) : जिल्हयात सुरु असलेल्या गुटखा विक्री व वाहतुकीविरुदध अन्न व औषध प्रशासन, जळगाव कार्यालयाने मोहीम तीव्र केलेली आहे. या मोहीमेअंतर्गत गोपनीय माहीतीच्या आधारे अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य, यांचे विशेष पथकाने सोमवार दिनांक १० जून, २०२४ रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास जळगाव शहरामधील तिजोरी गल्ली येथील संतोष हुकुमतमल राजपाल (दुकान मालक) मे. मिरा ट्रेडर्स, आणि रवी चंद्रभान चिमनानी, (दुकान मालक) मे. आर्शिर्वाद ट्रेडर्स, तसेच मानसिंग मार्केट मधील भरत बाविस्कर (फरार दुकान मालक) मे. पंकज ट्रेडर्स आणि जनरल या तिन्ही दुकानाची तपासणी केली असता महाराष्ट्र राज्यामध्ये उत्पादन, साठा वितरण, विक्री व वाहतूकीकरीता प्रतिबंधीत असलेला पानमसाला व सुगंधीत तंबाखू या अन्न पदार्थाचा साठा व विक्री आढळून आल्यामुळे एकूण साठा रु. ६.२०.६९०/- जप्त करुन तिन्ही दुकान मालक यांचे विरुद्ध जळगाव शहर पोलीस स्टेशन येथे प्रथम खबरी अहवाल दाखल करण्यात आलेले आहे.
सदर कारवाई ही अन्न सुरक्षा अधिकारी शरद म. पवार व त्यांचे सहकारी विशेष तपास भरारी पथक समन्वयक साहेबराव एकनाथ देसाई, सहायक आयुक्त, आणि सर्व अन्न सुरक्षा अधिकारी श्रीनिवास केदार, उमेश भुसे, चन्नावीर स्वामी, राजेश यादव, रवी सोळके तसेच या कार्यालयाचे सहायक आयुक्त संतोष कांबळे व मा. सह आयुक्त, (नाशिक विभाग) स.भा. नारगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली घेतलेली आहे. सदर गुन्हयामधील मुख्य सुत्रधाराचा शोध घेतला जात असून जळगाव जिल्हयात अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने गुटख्याविरुदध तीव्र कारवाई करणार असल्याची माहिती अधिका-यांनी दिली असे सहाय्यक आयुक्त (अन्न) अन्न व औाध प्रशासन, महाराष्ट्र राज्य संतोष कांबळे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.
0 0 0 0 0 0 0 0
No comments:
Post a Comment