Tuesday, 11 June 2024

विधान परिषद शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या मतदानाच्या वेळेत वाढ

 विधान परिषद शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या
मतदानाच्या वेळेत वाढ

           

मुंबईदिनांक ११ जून, 2024 : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर केली आहे. या निवडणुकीसाठी दिनांक २६ जून २०२४ रोजी मतदान होत आहे. काही संघटनांनी या मतदानाची वेळ वाढविण्यासाठी केलेली मागणी भारत निवडणूक आयोगाने  मान्य केली असून; आता मतदानाची वेळ सकाळी ७.०० वाजेपासून सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत अशी असेल.

या निवडणुकीसाठी शुक्रवार३१ मे २०२४ रोजी अधिसूचना जारी करण्यात आली. मुंबई पदवीधरकोकण विभाग पदवीधरनाशिक विभाग शिक्षक तसेच मुंबई शिक्षक मतदारसंघ अशा चार जागांकरिता बुधवार, दि.२६ जून रोजी मतदान तर सोमवारदि.१ जुलै रोजी मतमोजणी होणार आहेअशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली.

0 0 0 0 0 0

No comments:

Post a Comment