Tuesday, 11 June 2024

प्रतापराव गणपतराव जाधव यांनी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयात राज्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारला



 प्रतापराव गणपतराव जाधव यांनी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण
मंत्रालयात राज्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारला


नवी दिल्ली, 11 जून, 2024 : केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या राज्यमंत्री म्हणून श्री. प्रतापराव जाधव यांनी आज पदभार स्वीकारला. त्यांच्याकडे आयुष मंत्रालयाचे केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) हे खातेही आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचा पदभार स्वीकारण्यापूर्वी, श्री प्रतापराव जाधव यांनी त्यांच्या निवासस्थानी एक रोपटे लावले व पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी अवयवदानाची शपथही यावेळी घेतली.


श्री.प्रतापराव जाधव यांनी तीन वेळा महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य आणि क्रीडायुवक कल्याण आणि पाटबंधारे राज्यमंत्री म्हणून विविध पदांवर महाराष्ट्रातील जनतेचे प्रतिनिधित्व केले आहे. बुलढाणा मतदारसंघातून 2009, 2014, 2019 आणि पुन्हा 2024 मध्ये ते लोकसभेवर निवडून आले आहेत. ते 1997 ते 1999 या काळात महाराष्ट्र सरकारचे क्रीडायुवक कल्याण आणि पाटबंधारे राज्यमंत्रीही राहिले आहेत. लोकसभात्यांनी ग्रामीण विकास आणि पंचायती राज स्थायी समितीचे अध्यक्ष आणि दळणवळण आणि माहिती तंत्रज्ञान स्थायी समितीचे अध्यक्ष अशी महत्त्वाची पदे भूषवली आहेत.त्यानंतर केंद्रीय आरोग्य मंत्री श्री जे पी नड्डा यांच्या संवादात त्यांनी आरोग्य मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधला. केंद्रीय मंत्री श्री अपूर्व चंद्राकेंद्रीय आरोग्य सचिव आणि श्रीमती रोली सिंगअतिरिक्त सचिव (आरोग्य)सह मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वागत केले.


0 0 0 0 0 0 0

No comments:

Post a Comment