शिक्षक मतदार संघ; तीन नामनिर्देशन अर्ज दाखल
नाशिक, दिनांक 6 जून,2024 (विमाका वृत्तसेवा)
महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीसाठी गुरुवार दिनांक 6 जून,2024 रोजी 3 उमेदवारांनी 3 नामनिर्देशन अर्ज सादर केले असून आत्तापर्यंत 22 नामनिर्देशन अर्ज दाखल झाले आहेत.आज नामनिर्देशन अर्ज दाखल करणाऱ्यामध्ये राजेंद्र दौलत निकम, मालेगाव यांनी टी.डी.एफ जुनी पेन्शन संघटनेतून अर्ज सादर केला आहे. दिलीप काशिनाथ डोंगरे, संगमनेर, जि.अहमदनगर व अमृतराव रामराव शिंदे, अहमदनगर यांनी अपक्ष म्हणून अर्ज सादर केला आहे. महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीसाठी दिनांक 6जून, 2024 रोजी 13 उमेदवारांनी नामनिर्देशन अर्ज नेले आहेत.
0 0 0 0 0 0 0 0 0 0
No comments:
Post a Comment