जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीतर्फे
राजर्षी शाहू महाराज जयंती पर्व आयोजन
जळगाव, दिनांक 28 जून, 2024 (जिमाका वृत्तसेवा) : राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती निमीत्त जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती जळगाव या कार्यालयातर्फे २६ जून २०२४ ते ०२ जुलै २०२४ या कालावधीत राजर्षी शाहू महाराज जयंती पर्व आयोजित करण्यात आला आहे.
राजर्षी शाहू महाराज जयंती पर्वात वर्ग १२ विज्ञान शाखेतील २०२४ – २५ मधील सर्व प्रवेशीत मागासवर्गीय विदयार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे.
या मोहिमेदरम्यान विज्ञान शाखेतील प्रवेशीत सर्व मागासवर्गीय अनु, जाती. विदयार्थ्यांची जात पडताळणी प्रकरणे तालुका व महाविदयालय निहाय संख्यात्मक माहिती समान संधी केंद्रांच्या माध्यमातून महाविदयालय तसेच जिल्हास्तरावर संकलित करण्यात येणार आहेत,
राजर्षी शाहू महाराज जयंती पर्वात सीईटी देणारे विदयार्थी, डिप्लोमाच्या तृतीय वर्षाती प्रवेशित विदयार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज देखील भरण्यात येऊन अर्ज भरतांना विदयार्थ्यांना येणा-या अडचणीच्या पार्श्वभूमीवर विदयार्थ्यांसाठी संबंधीत महाविदयालयातील समानसंधी केंद्रामार्फत वेबिनारचे आयोजन करण्यात येणार आहे.
समान संधी केंद्राच्या माध्यमातून सर्व मागासवर्गीय विदयाध्यांचे अर्ज जमा करण्यात येणार असून प्राप्त अर्जावर तात्काळ कार्यवाही करुन वैधता प्रमाणपत्र देण्याचे नियोजन जात पडताळणी समितीच्या वतीने करण्यात आले आहे
राजर्षी शाहू महाराज जयंती पर्व निमतीत्त ०१ ते २ जुलै, २०२४ या कालावधी त्रुटी पुर्तता मोहिमेचे आयोजन करण्यात आले असून सदर मोहिमेत मागासवर्गीय विदयाथ्यांचे अर्जांची त्रुटी पुर्तता करुन सदर अर्ज निकाली काढण्यात येणार आहे.
जिल्हयातील विज्ञान शाखेतील प्रवेशीत विदयार्थी, सीईटी परिक्षा देणा-या विदयार्थ्यांनी आपआपल्या महाविदयालयात परिपूर्ण अर्ज सादर करुन जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त करुन घ्यावे व या मोहिमेचा लाभ घ्यावा असे आवाहन संशोधन अधिक तथा सदस्यसचिव जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती जळगाव प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
00 00 00 00 00
No comments:
Post a Comment