Monday, 24 June 2024

नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक 2024 मतदान करण्याचे आवाह

 नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक 2024
मतदान करण्याचे आवाहन


नाशिक ,दिनांक 24 जून, 2024 (विमाका वृत्तसेवा)

नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक 2024 करिता सर्व मतदारांनी 26 जून,2024 रोजी सकाळी 07.00 ते सायंकाळी 06.00 वाजे पर्यंत आपल्याशी संबंधित मतदान केंद्रावर जाऊन मतदान नोंदवावे, असे आवाहन  सहा. निवडणूक निर्णय अधिकारी तथा अपर आयुक्त निलेश सागर यांनी केले आहे.

या निवडणूकीत सर्व मतदान केंद्रांतील मतपत्रिकांची सरमिसळ करुन मतमोजणी केली जाते, त्यामुळे कोणत्या मतदान केंद्रात कोणत्या उमेदवारास किती मते मिळाली, असा तपशिल तयार केला जात नाही. मतदारांनी मोठया संख्येने निर्भयपणे मतदान करावे, असेही श्री.सागर यांनी कळविले आहे
0 0 0 0  0.

No comments:

Post a Comment