Sunday, 30 June 2024

मुख्य सचिवपदाची सूत्रे सुजाता सौनिक यांनी स्वीकारली राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान

 मुख्य सचिवपदाची सूत्रे सुजाता सौनिक यांनी स्वीकारली
राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान

मुंबई, दिनांक 30 जून, 2024 : राज्याच्या मुख्य सचिवपदाची सूत्रे सुजाता सौनिक यांनी मावळते मुख्य सचिव डॉ.नितीन करीर यांच्याकडून स्वीकारली. राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा मानही सौनिक यांना मिळाला आहे. मावळते मुख्य सचिव डॉ. नितीन करीर यांनी मुख्य सचिव सुजाता सौनिक यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. मंत्रालयात झालेल्या या कार्यक्रमास अपर मुख्य सचिव नितीन गद्रे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव डॉ. भूषण गगराणी, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, अपर मुख्य सचिव अनूप कुमार, अपर मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरा, पर्यटन विभाग प्रधान सचिव जयश्री भोज, प्रधान सचिव आभा शुक्ला, प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, प्रधान सचिव मनीषा वर्मा यांच्यासह इतर विभागाचे प्रधान सचिव, सचिव आणि वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

       

राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक म्हणाल्या, राज्यात पावसाळी अधिवेशन सुरू आहे. यामध्ये शेतकरी, महिला, बालके, युवक तसेच सर्वसामान्य जनतेला न्याय देण्यासाठी महत्वाचे धोरणात्मक निर्णय घेण्यात आले आहे. या योजना आणि धोरणात्मक निर्णयांची अंमलबजावणी करण्यासाठी मी प्रयत्न करेन. शासनाने माझ्यावर मोठी जबाबदारी सोपविली आहे. राज्याच्या मुख्य सचिवपदाची धुरा सांभाळतांना सर्व लोकप्रतिनिधी तसेच सर्व वरिष्ठ अधिकारी तसेच प्रशासकीय यंत्रणेच्या सहकार्याने मी जनतेसाठी प्रामाणिपणे आणि शाश्वत काम करण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असेन, अशा शब्दात नव नियुक्त मुख्य सचिव श्रीमती सौनिक यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहे.

 

मुख्य सचिव सुजाता सौनिक यांचा अल्प परिचय :


       सुजाता सौनिक या 1987 बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. सध्या त्या महाराष्ट्र शासनाच्या गृह विभाग आणि सामान्य प्रशासन विभागात अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून कार्यरत होत्या. त्या हार्वर्ड विद्यापीठाच्या टी.एच चॅन स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ 2018 मधील टेकमी फेलो आहेत. त्यांनी 2019 मध्ये सार्वजनिक आरोग्यहवामान बदल आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या क्रोस विभागातील समस्या याविषयावर मित्तल साउथ एशिया इन्स्टिट्यूटमध्ये संशोधन करत फेलोशिप देखील पूर्ण केली आहे. टेकमी फेलो म्हणूनमहाराष्ट्राच्या विमा-आधारित आरोग्य सेवा या विषयावर अभ्यास करतांना केलेल्या संशोधनातून त्यांचा शोधनिबंध देखील प्रसिद्ध झाला आहे. अलीकडेच त्याचे सार्वजनिक आरोग्याचा दृष्टीकोन असलेले कुंभ नाशिक-त्र्यंबकेश्वर या पुस्तकाचे प्रकाशन देखील झाले आहे.


      त्यांनी कौशल्य विकासरोजगार आणि उद्योजकता विभाग (SDEED) चे अतिरिक्त मुख्य सचिव (ACS) आणि राज्यस्तरावर सार्वजनिक आरोग्य आणि आर्थिक सुधारणांचे प्रधान सचिव म्हणून काम केले आहे. ऑक्सफर्ड पॉलिसी मॅनेजमेंटच्या अभ्यासातही त्यांचा सहभाग होता. ज्यामध्ये महिला व बाल विकास आणि शालेय शिक्षण या प्रमुख विभागांच्या कामकाजाचा सारांश त्यात मांडण्यात आला होता. त्या मुंबई विद्यापीठ आणि SNDTWU, मुंबईच्या सल्लागार समितीवरही कार्यरत आहेत. तसेच सांघिक स्तरावर त्यांनी महिला व बाल आणि आपत्ती व्यवस्थापन विभागांमध्ये कंबोडिया व कोसोवोमध्ये UN च्या दोन मानवतावादी मोहिमांमध्ये काम केले आहे. राज्य शासनात विविध पदांची जबाबदारी सांभाळत असतांना त्यांनी शाश्वत आणि पारदर्शक कामकाजावर नेहमीच भर दिला आहे.

00 00 00 00 00

Friday, 28 June 2024

राज्यातील अनुसूचित जमातींच्या विद्यार्थ्यांना महाडीबीटी पोर्टलमध्ये राईट टू गिव्ह निवडण्याचे आवाहन

 राज्यातील अनुसूचित जमातींच्या विद्यार्थ्यांना महाडीबीटी पोर्टलमध्ये
राईट टू गिव्ह निवडण्याचे आवाहन

जळगाव, दि. २७  (जिमाका वृत्तसेवा) :  जळगाव जिल्हयातील सर्व प्राचार्य/मुख्याध्यापक व जळगाव जिल्हयात मॅट्रीकोत्तर शिक्षण घेणारे सर्व अनूसूचित जमातीच्या प्रवर्गातील विद्याथ्यांना याव्दारे कळविण्यात येते की, अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना आदिवासी  विकास विभागाच्या विविध शिष्यवृत्तीचा लाभ देणेसाठी महाराष्ट्र शासनामार्फत सन 2018-19 या शैक्षणिक वर्षापासून महाडीबीटी पोर्टल सुरु करण्यात आलेले असून महाडीबीटी पोर्टलमध्ये राइट टू गिव्ह अप पर्याय निवडलेल्या  अर्जदारांना  या पर्यायाबाबत पुन्हा निवड करू देण्याची तरतूद, संस्थेच्या 'प्रिन्सिपल लॉगिनमध्ये उपलब्ध आहे. संबंधित  अर्जदारांनी राइट टू गिव्ह अप पर्यायांबाबत पुन्हा निवड करण्यासाठी संबंधित संस्थेशी संपर्क साधावा राइट टू गिव्ह अप पर्याय निवडलेल्या अर्जासंदर्भात पुन्हा निवड करू देण्याची तरतूद ३० जून, २०२४ पर्यंत संस्थेच्या principal   लॉगिनमध्ये  उपलब्ध  असेल याची सर्वांनी नोंद  घ्यावी, असे  आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय यावल अरुण पवार यानी आहे.

00 00 00 00 00

जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीतर्फे राजर्षी शाहू महाराज जयंती पर्व आयोजन

                    जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीतर्फे 

                       राजर्षी शाहू महाराज जयंती पर्व आयोजन

 जळगाव, दिनांक 28 जून, 2024 (जिमाका वृत्तसेवा) : राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती निमीत्त जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती जळगाव या कार्यालयातर्फे २६ जून २०२४ ते ०२ जुलै २०२४ या कालावधीत राजर्षी शाहू महाराज जयंती पर्व आयोजित  करण्यात आला आहे.

            राजर्षी शाहू महाराज जयंती पर्वात वर्ग १२ विज्ञान शाखेतील २०२४ – २५ मधील सर्व प्रवेशीत  मागासवर्गीय विदयार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे.

            या मोहिमेदरम्यान विज्ञान शाखेतील प्रवेशीत सर्व मागासवर्गीय अनु, जाती. विदयार्थ्यांची जात पडताळणी प्रकरणे तालुका व महाविदयालय निहाय संख्यात्मक माहिती समान संधी केंद्रांच्या माध्यमातून महाविदयालय तसेच जिल्हास्तरावर संकलित करण्यात येणार आहेत,

            राजर्षी शाहू महाराज जयंती पर्वात सीईटी देणारे विदयार्थी, डिप्लोमाच्या  तृतीय वर्षाती  प्रवेशित विदयार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज देखील भरण्यात येऊन अर्ज भरतांना विदयार्थ्यांना येणा-या अडचणीच्या पार्श्वभूमीवर  विदयार्थ्यांसाठी  संबंधीत महाविदयालयातील समानसंधी केंद्रामार्फत वेबिनारचे आयोजन करण्यात येणार आहे.

            समान संधी केंद्राच्या माध्यमातून सर्व मागासवर्गीय विदयाध्यांचे अर्ज जमा करण्यात येणार असून प्राप्त अर्जावर  तात्काळ कार्यवाही करुन वैधता प्रमाणपत्र देण्याचे नियोजन जात पडताळणी समितीच्या वतीने करण्यात आले आहे

            राजर्षी शाहू महाराज जयंती पर्व निमतीत्त ०१ ते २ जुलै, २०२४  या कालावधी त्रुटी पुर्तता मोहिमेचे आयोजन करण्यात आले असून सदर मोहिमेत मागासवर्गीय विदयाथ्यांचे अर्जांची त्रुटी पुर्तता करुन सदर अर्ज निकाली काढण्यात येणार आहे.

जिल्हयातील विज्ञान शाखेतील प्रवेशीत विदयार्थी, सीईटी परिक्षा देणा-या  विदयार्थ्यांनी  आपआपल्या  महाविदयालयात परिपूर्ण अर्ज सादर करुन जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त करुन घ्यावे व या मोहिमेचा लाभ घ्यावा असे आवाहन  संशोधन अधिक तथा सदस्यसचिव जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती जळगाव प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

00 00 00 00 00

वंदे मातरम्‌ व राज्यगीताने पावसाळी अधिवेशनाच्या कामकाजास प्रारंभ

             

                वंदे मातरम्‌ व राज्यगीताने पावसाळी अधिवेशनाच्या कामकाजास प्रारंभ

             मुंबईदि. 27 : विधानमंडळाच्या पावसाळी अधिवेशनास आजपासून मुंबईत प्रारंभ झाला.  विधानसभेत ‘वंदे मातरम्‌’ व जय जय महाराष्ट्र माझा’ या राज्यगीताने कामकाजास सुरुवात झाली. विधानसभेचे अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकरमुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपाध्यक्ष नरहरी झिरवाळउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवारविधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार  महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, वनमंत्री सुधीर मुनगंटीवारसंसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटीलआदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावितगृहनिर्माण मंत्री अतुल सावेराज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाईवैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफकौशल्यरोजगारउद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा,पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटीलसार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री दादाजी भुसेमहिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरेक्रीडामंत्री संजय बनसोडे यांच्यासह मंत्रिमंडळातील  मंत्री  तसेच विधानसभेचे सदस्य  उपस्थित होते.

00 00 00 00

विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात मतदारयाद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम (दुसरा) दि.१ जुलै २०२४ च्या अर्हता दिनांकावर

 विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात मतदारयाद्यांचा
विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम (दुसरा)
दि.१ जुलै २०२४ च्या अर्हता दिनांकावर

 

मुंबई, दिनांक 28 जून, 2024 : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका यशस्वीरित्या पार पडल्यानंतरभारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्राच्या आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.  त्यासाठी राज्यांमधील मतदार याद्या अद्ययावत करण्याचा कार्यक्रम घोषीत केलेला आहे. भारत निवडणूक आयोगाने  दि.१  जूलै २०२४  या अर्हता दिनांकाच्या आधारावर राज्यात मतदारयाद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम (दुसरा) राबवण्याचे सूचित केले आहे. त्यानुसार हा कार्यक्रम राज्यभरात २५ जूलै ते २० ऑगस्ट २०२४ या कालावधीत राबवण्यात येत असल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने प्रसिद्धीपत्राद्वारे कळवले आहे. 

कार्यक्रमाचे टप्पे

            पुनरिक्षण – पूर्व उपक्रम– यामध्ये दि. २५ जून  ते २४ जूलै २०२४ या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचेद्वारा प्रत्यक्ष घरोघरी भेट देऊन पडताळणी मतदान केंद्राचे सुसुत्रीकरण व प्रमाणीकरण.

             मतदार यादी/ मतदार ओळखपत्रातील त्रुटी दुर करणे इ.  आयोगाच्या मानकानुसार छायाचित्र प्राप्त करून मतदार यादीत सुधारणा करणे तसेचअस्पष्ट/ अंधुक छायाचित्र बदलुन त्याऐवजी संबंधित मतदाराकडून योग्य दर्जाची छायाचित्र प्राप्त करून मतदार यादीत सुधारणा करणे. विभाग / भाग यांची आवश्यकतेनुसार नव्याने मांडणी करून मतदान केंद्राच्या सीमांचे पुनर्रचना तयार करून मतदान केंद्राच्या यादीस मान्यता घेणे आणि तुलनात्मक फरक शोधुन फरक दुर करण्यासाठी कालबध्द योजना आखणे, कंट्रोल टेबल अद्ययावत करणे,  नमुना १-८ तयार करणे०१ जुलै२०२४ या अर्हता दिनांकावर आधारीत पुरवणी व एकत्रीत प्रारूप यादी तयार करणे हे कामकाज  करण्यात येणार आहे.

पुनरिक्षण उपक्रम

            या अंतर्गत दि. 25.07.2024 (गुरूवार) रोजी एकत्रीकृत प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येतील. तर  दि.25.07.2024 (गुरूवार ) ते दि. 09.08.2024 (शुक्रवार )दावे व हरकती स्विकारण्याचा कालावधी राहील. विशेष मोहिमांचा कालावधी यामध्ये दावे व हरकती स्विकारण्याच्या कालावधीत,मुख्य निवडणूक अधिकारीयांनी निश्चित केलेले शनिवार व रविवार आहे. (i) दावे व हरकती निकालात काढणे

             (ii) अंतिम प्रसिद्धीसाठी आयोगाची परवानगी मागणे, (iii) डाटाबेस अद्ययावत करणे आणि पुरवणी याद्यांची छपाई दि. 19.08.2024 (सोमवार) पर्यंत असून दि.  20.08.2024 (मंगळवार) रोजी मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी करण्यात येईल.

घरोघरी भेट देऊन पडताळणी

            विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम2024 अंतर्गत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांनी त्यांच्या क्षेत्रामध्ये घरोघरी भेट देवून नागरिकांची माहिती गोळा केलेली आहे. तथापियेत्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुका2024 मध्ये काही नागरिकांना त्यांची नावे मतदार यादीत आढळून आलेली नाहीत. यामुळे आता विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम (दुसरा) अंतर्गत दि.25.06.2024 ते 08.07.2024 या कालावधीमध्ये मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) हे त्यांच्या क्षेत्रामध्ये विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम2024 दरम्यान शिल्लक राहिलेल्या घरांना गृह भेटी देणार आहेत. त्याचबरोबर लोकसभा सार्वत्रिक निवडणूका2024 मध्ये मतदार यादीत नावे आढळून न आल्याबाबतच्या तक्रारींच्या अनुषंगाने मतदान केंद्रस्तरीय अधिकारी हे गृहभेटी देतील. त्या गृहभेटी दरम्यान पुढीलप्रमाणे कामकाज करण्यात येईल :-  नोंदणी न केलेले पात्र मतदार (०१ जुलै२०२४ रोजी पात्र)तसेच  एकापेक्षा अधिक नोंदी/मयत मतदार/ कायमस्वरूपी स्थलांतरीत मतदार आणि मतदार यादीतील नोंदीत दुरुस्ती या प्रमाणे कामकाज करण्यात येईल.

मतदान केंद्राचे सुसुत्रीकरण व प्रमाणीकरण

             याबाबत भारत निवडणूक आयोगाच्या दि.20 जून 2024 च्या पत्रान्वये दिलेल्या मार्गदर्शक सुचना विचारात घेवून करण्यात येणार आहे. याद्वारे मतदारांच्या सुविधेसाठी मतदान केंद्रे निवासाच्या जवळ ठेवण्याबाबतचा प्रयत्न केला जाणार आहे.

                 मतदान केंद्रांच्या सुसुत्रीकरणादरम्यान अति ऊंच इमारती/हौसिंग सोसायटी समूह जेथे सामान्य सुविधा असलेली जागा किंवा सभागृह त्या इमारतीच्या परिसरामध्येच तळमजल्यावर उपलब्ध आहे अशी ठिकाणेशहरी भागातील झोपडपट्टी तसेच विस्तारीत होणारे शहरी /निम शहरी भाग यामध्ये नविन मतदान केंद्र प्रस्तावित करण्याबाबत योग्य प्रक्रियेचे पालन केल्यानंतर मतदान केंद्रे उभारली जाणार आहेत.

                सर्व कुटुंब एकाच ठिकाणी आणि शेजारी हे एकाच विभागात असतील आणि मतदार यादीत व मतदार ओळखपत्रात एकसमानता यावी अशाप्रकारे सुसूत्रीकरण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

                पूर्व पुनरिक्षण उपक्रमात मतदार ओळखपत्र (EPICs) संदर्भातील १०० % त्रुटी दुर करण्याबाबत सर्वोतोपरी प्रयत्न करण्यांचे भारत निवडणूक आयोगाचे निर्देश आहेत.

            मतदानाच्या दिवशी आपले मतदार यादीत नाव नाहीअसे होऊ नयेयासाठी पात्र नागरिकांनी या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम (दुसरा) अंतर्गत दि.25 जुलै ते 9 ऑगस्ट2024 या कालावधीमध्ये त्यांची नावे मतदार यादीत नोंदणी करावीत. तसेच ज्या मतदारांचे नाव मतदार यादीमध्ये आहे त्यांनीत्यांचे नोंदणी केलेले नावपत्तावय व इतर तपशिल बरोबर आहे का ते तपासून घेऊनत्यात दुरुस्तीची आवश्यकता असल्यास या कालावधीत तो तपशील दुरुस्त करुन घ्यावा. यातून मतदार यादी अधिकाधिक बिनचूक होण्यास मदत होईल. दि.1 जुलै2024 रोजी किंवा त्या आधी 18 वर्ष पूर्ण केलेले नागरिक या कालावधीत मतदार म्हणून मतदार यादीमध्ये नाव नोंदणी करु शकतात. विधानसभा निवडणुकीमध्ये मतदान करण्याची ही महत्वाची संधी असल्याने पात्र नागरिकांनी नाव नोंदणी करावी. मतदार यादीत नवीन नाव नोंदविण्यासाठी व नोंदीत दुरुस्ती करण्यासाठी किंवा मतदार यादीत आपले नाव तपासण्यासाठी पुढील दोन ऑनलाईन पर्यायांचा वापर करु शकता.

              मतदार सेवा पोर्टल - http://voters.eci.gov.in/  ,  त्याचप्रमाणे वोटर हेल्पलाईन ॲप त्याचप्रमाणे आपल्या मतदार संघातील मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयास भेट देऊनही प्रत्यक्ष अर्ज भरता येईल.

             भारत निवडणूक आयोगाच्या दि.20.06.2024 च्या पत्रान्वये दिलेल्या निर्देशानुसार दि.01.07.2024 च्या अर्हता दिनांकावर आधारीत राज्यात मतदारयाद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम (दुसरा) राबविण्याबाबत राजकीय पक्षांना माहिती देण्यासाठी प्रधान सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारीमहाराष्ट्र राज्य यांचे अध्यक्षतेखाली राज्यस्तरावरील मान्यता प्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत मंगळवार दि.25 जून2024 रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना याबाबतची सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे.

               मतदार यादी सर्वसमावेशक व त्रुटी विरहीत करण्यावर आयोगाचे कायम लक्ष केंद्रीत आहे.  कोणताही पात्र नागरिक मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून तसेच निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावण्याच्या त्यांच्या अधिकारापासून वंचित राहू नये अशी आयोगाची भावना आहे. सबब त्रुटीमुक्त मतदार यादी तयार करण्यासाठी सर्व पात्र नागरिकांनी मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी पुढे यावेअसे आवाहन आयोगाकडून करण्यात येत आहेजर आतापर्यंत नावनोंदणी झाली नसेल तर नावनोंदणी करून आगामी विधानसभा निवडणुकीत आपला मतदानाचा हक्क बजावावा,असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.

00 00  00 00 00

एसआयएसी प्रशिक्षणासाठी अर्ज करण्यास २० जुलैपर्यंत मुदतवाढ

 एसआयएसी प्रशिक्षणासाठी अर्ज करण्यास
२० जुलैपर्यंत मुदतवाढ

 

            मुंबईदिनांक 28 जून, 2024 : राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था, मुंबई व राज्यातील सर्व भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्रात नागरी सेवा पूर्व परीक्षा प्रशिक्षणास प्रवेशासाठी २५ ऑगस्ट रोजी केंद्रावर परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षेसाठी १ जुलै ते २० जुलै या कालावधीत विद्यार्थ्यांना अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली असून, २१ जुलैपर्यंत शुल्क चलन भरण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.

            ऑनलाईन अर्ज करण्यासाठी siac.org.in मधील SIAC MUMBAI नागरी सेवा पूर्व परीक्षा प्रशिक्षण सामाईक प्रवेश परीक्षा CET २०२४-२५ नोंदणीसाठीची लिंक मधील REGISTRATION NOW ला जाऊन प्रवेश अर्ज नोंदणी करावी. तसेच नागरी सेवा पूर्वपरीक्षा प्रशिक्षण २०२५ च्या अधिक माहिती siac.org.in या संकेतस्थळावरील सूचनांचे पालन करावे.

             केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत महाराष्ट्रातील मराठी विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढावेयासाठी  दिलेल्या   मुदतवाढीचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावाअसे आवाहन सामाईक प्रवेश परीक्षा समनव्यक संचालक डॉ. स्वाती वाव्हळ यांनी केले आहे.

        राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्थामुंबई व सर्व भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्रनाशिककोल्हापूरऔरंगाबादअमरावती व नागपूर तसेच महाराष्ट्र शासनाच्या इतर विभागांतर्गत यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा) संचलित डॉ. आंबेडकर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रपुणेपिंपरी चिंचवड महानगरपालिका संचलित सावित्रीबाई फुले अकॅडमी पुणेअंबरनाथ नगरपालिकेचे स्पर्धा परीक्षा केंद्रअंबरनाथठाणे महानगर पालिका संचलित चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थाठाणे ई. केंद्रामधील प्रवेश परिक्षेसाठी सन २०२४ च्या अंतिम वर्षात पदवीला बसलेले व यापूर्वी पदवी परीक्षा उत्तीर्ण झालेले आणि  जाहीरातीतील नमुद इतर अटी शतीर्ची पूर्तता करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून  नागरी सेवा पूर्व परीक्षा निःशुल्क प्रशिक्षणासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. सुधारीत परीक्षा दिनांक २५ ऑगस्ट २०२४ रोजी ऑफलाईन पद्धतीने महाराष्ट्रातील सात (मुंबईपुणेकोल्हापूरनाशिकऔरंगाबादअमरावती व नागपूर) केंद्रांवर आयोजित करण्यात येणार आहे.

            याकरिता  उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरण्याची  मुदतवाढ १ जुलै २०२४ ते २० जुलै २०२४ या कालावधीत आणि दिनांक २१ जुलै २०२४ पर्यत परीक्षा शुल्क चलन भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात येत आहे

0 0 0 0 0 0 

Wednesday, 26 June 2024

राजधानीत राजर्षि शाहू महाराज जयंती साजरी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, प्रतापराव जाधव आणि रक्षाताई खडसे यांनी वाहिली आदरांजली

 राजधानीत राजर्षि शाहू महाराज जयंती साजरी

केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळप्रतापराव जाधव आणि रक्षाताई खडसे यांनी वाहिली आदरांजली

 

नवी दिल्ली, 26 : सामाजिक समतेचे प्रणेते राजर्षि शाहू महाराज यांची जयंती कस्तुरबा गांधी मार्गावरील महाराष्ट्र सदनाच्या दर्शनी भागात उत्साहात आज साजरी करण्यात आली.

 

कस्तुरबा गांधीस्थित महाराष्ट्र सदनच्या दर्शनी भागात राजर्षि शाहू महाराज यांच्या पुतळ्यास तसेच कॉपरनिकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनच्या सभागृहात शाहू महाराजांच्या प्रतिमेस  निवासी आयुक्त रुपिंदर सिंग  यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

 

या प्रसंगी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळप्रतापराव जाधवश्रीमती रक्षाताई खडसे यांनी राजर्षि शाहू महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली वाहिली. या कार्यक्रमात सर्वश्री खासदार छत्रपती शाहू महाराजसुनील तटकरेश्रीकांत शिंदेधैर्यशील मानेश्रीमती वर्षाताई गायकवाड हेमंत सावरारविंद्र वायकरबळवंत वानखेडेश्रीमती शोभा बच्छावप्रशांत पडोळे यांसह इतर मान्यवरांनीही सहभाग घेतला आणि शाहू महाराजांना अभिवादन केले.

 

यावेळी सहाय्यक निवासी आयुक्त डॉ. राजेश आडपावार , महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्राचे कर्मचारी उपस्थित होते. यावेळी  त्यांनी  राजर्षि शाहू महाराजांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

 

राजर्षि शाहू महाराजांच्या विचारांमुळे भारतीय समाजात मोठ्या प्रमाणात सामाजिक सुधारणा झाल्याअसे मान्यवरांनी यावेळी सांगितले. त्यांच्या सामाजिक समतेच्या कार्याचा उल्लेख करूनराजर्षि शाहू महाराजांच्या योगदानामुळे भारतीय समाजात परिवर्तन घडविण्यात मोठी मदत झाल्याचेही त्यांनी नमूद केले.

0 0 0 0 0 0 0 0

जुलै महिन्याचा जिल्हास्तरीय लोकशाही दिन रद्द

 जुलै महिन्याचा जिल्हास्तरीय लोकशाही दिन रद्द

जळगाव, दिनांक २६ जून, 2024 ( जिमाका वृत्तसेवा ) : जनतेची गाऱ्हाणी व तक्रारी सोडविण्यासाठी दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरावर लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. नाशिक विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूक 2024 चा कार्यक्रम जाहिर केला आहे. त्यानुसार 31 मे, 2024 ते 05 जुलै, 2024 पासून ज्या क्षेत्रांमध्ये निवडणूक आचारसंहिता लागू झालेली आहे. अशा ठिकाणी आचारसंहिता कालावधीत लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येवू नये असे निर्देश आहेत. त्यामुळे जुलै महिन्यात पहिल्या सोमवारी (01 जुलै, 2024) रोजी होणारा जिल्हास्तरीय लोकशाही दिन कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. असे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

00 00 00

विधानपरिषद शिक्षक, पदवीधर मतदारसंघाच्या द्वैवार्षिक निवडणुकीची अकरा वाजेपर्यतची मतदान आकडेवारी

विधानपरिषद शिक्षकपदवीधर मतदारसंघाच्या

द्वैवार्षिक निवडणुकीची अकरा वाजेपर्यतची मतदान आकडेवारी

मुंबईदिनांक 26 जून, 2024 : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या  द्वैवार्षिक निवडणूकीसाठी आज मतदान होत आहे. सकाळी सात वाजल्यापासून मतदान प्रक्रिया सुरळीतपणे सुरु झाली असून सकाळी ११ वाजेपर्यंतची आकेडवारी पुढीलप्रमाणे -

            कोकण पदवीधर मतदारसंघ एकूण मतदार संख्या २,२३,४०८ असून मतदान केलेल्यांची संख्या ४५,०१० इतकी आहे. सकाळी ११  वाजेपर्यंतची मतदानाची टक्केवारी  २०.१५ इतकी आहे.

            मुंबई पदवीधर मतदारसंघ एकूण मतदार संख्या १,२०,७७१ असून मतदान केलेल्यांची संख्या ३२६२२ इतकी आहे. सकाळी  ११  वाजेपर्यंतची मतदानाची टक्केवारी २७.०१ इतकी आहे

            मुंबई शिक्षक मतदारसंघ एकूण मतदार संख्या १५,८३९ असून मतदान केलेल्यांची संख्या २,९००  इतकी आहे. सकाळी  ११ वाजेपर्यंतची मतदानाची  टक्केवारी  १८.३० इतकी आहे

            नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ एकूण मतदार संख्या ६९,३६८ असून मतदान केलेल्यांची संख्या १६,०६९  इतकी आहे. सकाळी  ११  वाजेपर्यंतची मतदानाची टक्केवारी २३.१६  इतकी आहे,असे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय यांनी कळवले आहे. 

0 0 0 0 0 0 0 0

Tuesday, 25 June 2024

शासकीय भरडधान्य (ज्वारी) खरेदी केंद्रांचे आज उद्घाटन

 शासकीय भरडधान्य (ज्वारी) खरेदी केंद्रांचे आज उद्घाटन

जळगाव, दिनांक 25 जून, 2024 ( जिमाका ) : जळगाव जिल्हा कृषी औद्योगिक सर्व सेवा सहकारी संस्था मर्यादित जळगाव या अभिकर्ता संस्थेच्या वतीने २६ जून, २०२४ रोजी सकाळी १०.०० वाजता चिंचोली शिवारातील गोदामात उपाध्यक्ष रोहित दिलीपराव निकम दि महाराष्ट्र स्टेट को-ऑप. मार्केटिंग फेडरेशन लि. मुंबई यांचे हस्ते खरेदी केंद्राचे उद्घाटन आयोजित केलेले आहे. यावेळी जळगाव तालुक्याच्या तहसिलदार, शितल राजपुत व गोदामपाल श्रीकांत माटे यांचे उपस्थितीत उद्घाटन होणार आहे. तरी यावेळी जळगाव तालुक्यातील ज्या शेतकरी बांधवानी ऑनलाईन ज्वारीची नोंदणी केलेली आहे. त्यांना नोंदणीक्रमाने एस. एम. एस देवून खरेदीसाठी बोलविण्यात आलेले आहे. तरी शासकीय भरडधान्य ( ज्वारी) नोंदणी झालेल्या शेतकरी बांधवांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे चेअरमन, व्हाईस चेअरमन व संचालक मंडळाने केले आहे.

0 0 0 0 0 0 0 0

नाशिक विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूक 2024 मतदान साहित्याचे वाटप : अधिकारी, कर्मचारी मतदान केंद्राकडे रवाना





 
नाशिक विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूक 2024
मतदान साहित्याचे वाटप : अधिकारी, कर्मचारी मतदान केंद्राकडे रवाना

जळगांव, दिनांक 25 जून, 2024 ( जिमाका ) : नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी 26 जून रोजी मतदान होत असून याकरीता जळगांव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात 1, यावल तालुक्यात 1, रावेर तालुक्यात 1, मुक्ताईनगर तालुक्यात 1, बोदवड तालुक्यात 1, भुसावळ तालुक्यात 2, जळगांव तालुक्यात 3, धरणगांव तालुक्यात 1, अमळनेर तालुक्यात 2, पारोळा तालुक्यात 1, एरंडोल तालुक्यात 1, भडगांव तालुक्यात 1, चाळीसगांव तालुक्यात 2, पाचोरा तालुक्यात 1, जामनेर तालुक्यात 1 असे एकूण 20 मतदान केद्र आहे. जिल्ह्यात 13 हजार 122 शिक्षक मतदार असून त्यात 9 हजार 673 पुरुष तर 3 हजार 449 स्त्री मतदार आहे. मतदानासाठी 120 अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून प्रत्येक केंद्रासाठी केंद्राध्यक्ष, कर्मचारी, सुक्ष्म निरीक्षक, एक शिपाई, तसेच बंदोबस्तासाठी पोलीस कर्मचारी, भरारी पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. मतदानासाठी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण झाले असून आज कर्मचारी मतदान साहित्यासह मतदान केंद्रावर पोहोचले आहे. या निवडणूकीत जिल्ह्यातील जास्तीत जास्त शिक्षक मतदारांनी आपला मतदानाचा हक्क निर्भयपणे बजवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी श्री.आयुष प्रसाद यांनी केले आहे यांनी केले आहे.
0 0 0 0 0 0 0 0 0

औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) येथे २७ जुन, रोजी प्लेसमेंट ड्राईव्ह मेळाव्याचे आयोजन

 औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) येथे २७ जुन, रोजी

प्लेसमेंट ड्राईव्ह मेळाव्याचे आयोजन

जळगाव, दिनांक २५ जून, 2024 (जिमाका वृत्तसेवा) : जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल करिअर सेंटर जळगाव, औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) यांच्या संयुक्त विद्यमाने २७ जुन, २०२४ रोजी सकाळी १०:३० दुपारी २: ३० वाजेपर्यंत प्लेसमेंट ड्राईव्ह मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. तरी नोकरी इच्छुक उमदेवारांसाठी ही एक सुवर्णसंधी असून सर्वसाधारण १० वी, १२ वी, सर्व पदवीधारक/आय टी आय सब ट्रेड धारक/सर्व डिप्लोमा धारक / असे एकूण १५० रिक्तपदे भरण्याविषयी कंपन्यांनी कळविलेले आहे- सदरील प्लेसमेंट ड्राईव्ह मेळाव्याचे औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) या ठिकाणी करण्यांत आलेले आहे.

तरी रोजगार मेळाव्यात नमूद पात्रता धारक केलेल्या ईच्छुक उमेदवारांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नांव नोंदणी केलेल्या उमेदवारांनी मेळाव्यांत सहभागी होण्यासाठी विभागाच्या www.mahaswayam.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या रिक्तपदांना अप्लॉय करण्यासाठी आपल्या युजर आयडी व पासवर्ड ने लॉग ईन करुन अप्लॉय करावा. तसेच, ज्या उमेदवारांनी नांव नोंदणी केलेली नाही त्यांनी देखील सर्व शैक्षणिक पात्रतेच्या कागदपत्रासह रोजगार मेळाव्याच्या ठिकाणी मुलाखतीसाठी उपस्थित रहावे. व विभागाच्या www.mahaswayam.gov.in /www.ns.gov.in या संकेतस्थळावर नांव नोंदणी देखिल करुन घ्यावी.

याबाबत काही तांत्रिक अडचणी आल्यास अथवा अधिकच्या सहाय्यासाठी सोमवार ते शुक्रवार (सार्वजनिक सुट्टीचे दिवस वगळून) या कालावधीत सकाळी ०९.४५ ते सांयकाळी ०६.१५ वाजेपर्यंत स्थानिक जळगाव कार्यालयाशी ०२५७-२९५९७९० वर कार्यालयीन वेळेत दूरध्वनीद्वारे किंवा प्रत्यक्ष संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त रवीकुमार एम पंतम, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव यांनी केले आहे. मेळाव्याचे ठिकाण औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) मेस हॉल नॅशनल हायवे क्रमांक ०६ ता. जि. जळगाव. (चंद्रकांत दुसाने) क. मार्गदर्शन अधिकारी कौशल्य विकास रोजागर व उद्योजकता जळगाव यांनी केले आहे.
0 0 0 0 0 0 0

राष्ट्रीय महामार्ग क्र. ७५३ एफ फर्दापुर ते जळगाव ( भाग-३) चौपदरीकरणाचे काम सुरु, पर्यायी रस्ता उपलब्ध

 राष्ट्रीय महामार्ग क्र. ७५३ एफ फर्दापुर ते जळगाव ( भाग-३)
चौपदरीकरणाचे काम सुरु, पर्यायी रस्ता उपलब्ध

जळगाव, दिनांक 25 जून, 2024 (जिमाका वृत्तसेवा) : जामनेर तालुक्यातील वाकोद या गावातील वाघुर नदीवरील छात्रपती संभाजीनगर ते जळगाव या राष्ट्रीय महामार्गावरील क्र. ७५३ एफ डाव्या बाजुस असलेल्या जुन्या मोठया पुलाची परिस्थिती अत्यंत कमकुवत झालेला असुन सदर पुल हा पुर्णपणे जिर्ण झालेला आहे.

त्यामुळे सदर पुल वाहतुकीकरिता धोकादायक झालेला असुन या ठिकाणी मोठा अपघात होऊन जीवीत हाणी होण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे व जळगाव ते छत्रपती संभाजीनगर या महामार्गाची वाहतुक पुर्णपणे बंद करण्यात येत आहे. पोलीस अधीक्षक जळगाव यांच्या पत्रान्वये काढण्यात आलेल्य अधिसुचनेनुसार जामनेर तालुक्यातील मौजे वाकोद या गावातील वाघुर नदीवरील छत्रपती संभाजीनगर ते जळगाव या मार्गावरील डाव्या बाजुने असलेला जुना मोठा पुल हा रविवार दि. १६ जून, २०२४ पासून पुलाची दुरुस्ती होई पर्यंत बंद करण्यात येत आहे.

पर्यायी बदल
पर्याय क्र. ०१- अ) - जड वाहतुक (दुहेरी वाहतुक मार्ग) – नेरी - एरंडोल- चाळीसगाव –नांदगाव- शीरुर बंगला- छत्रपती संभाजीनगर , ब) जळगाव (अजिंठा चौफुली) – मुक्ताईनगर- मलकापुर- बुलढाणा-जालना- छत्रपती संभाजीनगर , हलकी वाहतुक – पर्यायी मार्ग (एकेरी वाहतुक मार्ग) अ)- जळगाव ते छत्रपती संभाजीनगर , जळगाव -पहुर- वाकोद- फर्दापुर - छत्रपती संभाजीनगर ,

ब) छत्रपती संभाजीनगर ते जळगाव - छत्रपती संभाजीनगर - फर्दापुर - फर्दापुर तांडा (सोयगाव रोड) वरखेडी तांडा फाटा- वाकोद – पहुर असा बदल करण्यात मंजूरी दिली आहे, असे कार्यकरी अभियंता राष्ट्रीय महामार्ग विभाग जालना यांनी कळविले आहे.
0 0 0 0 0 0 0 0

नाशिक विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूक 2024 मतदान साहित्याचे वाटप : अधिकारी, कर्मचारी मतदान केंद्राकडे रवाना





 नाशिक विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूक 2024
मतदान साहित्याचे वाटप : अधिकारी, कर्मचारी मतदान केंद्राकडे रवाना

 

धुळे, दिनांक 25 जून 2024 (जिमाका वृत्तसेवा) : महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदार संघ द्विवार्षिंक निवडणूकीसाठी बुधवार, दि.26 जून, 2024 रोजी  सकाळी 7.00 ते सायंकाळी 6.00 वाजेदरम्यान मतदान होणार आहे. या निवडणूकीसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयात मतदान साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल, उप जिल्हा निवडणूक अधिकारी गंगाराम तळपाडे यांच्यासह उपजिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

 

नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी 26 जून रोजी मतदान होत असून याकरीता धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात 3, शिंदखेडा तालुक्यात 2, साक्री तालुक्यात 2 तर धुळे तालुक्यात 5 अशा एकूण 12 मतदान केद्र आहे. जिल्ह्यात 8 हजार 159 शिक्षक मतदार असून त्यात 6 हजार 203 पुरुष तर 1 हजार 956 स्त्री मतदार आहे. मतदानासाठी 70 अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून प्रत्येक केंद्रासाठी  केंद्राध्यक्ष, कर्मचारी, सुक्ष्म निरीक्षक, एक शिपाई, तसेच बंदोबस्तासाठी पोलीस कर्मचारी, भरारी पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. मतदानासाठी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण झाले असून आज कर्मचारी मतदान साहित्यासह मतदान केंद्रावर पोहोचले आहे.  मतमोजणी सोमवार, 1 जुलै, 2024 रोजी केंद्रीय वखार महामंडळ, वेअर हाऊस, अंबड, ता. जि. नाशिक येथे होणार आहे.

 

नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक 2024 करिता सर्व शिक्षक मतदारांनी 26 जून, 2024 रोजी सकाळी 7.00 ते सायंकाळी 6.00 वाजेपर्यंत आपल्याशी संबंधित मतदान केंद्रावर जाऊन मतदान करावे, तसेच मतदानावेळी मतदान केंद्रावर ओळख पटविण्यासाठी जे मतदार छायाचित्रासह मतदार ओळखपत्र (ईपीक) सादर करु शकत नाहीत, अशा मतदारांना त्यांची ओळख पटविण्यासाठी पर्यायी पुरावा म्हणून भारत निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या 10 अतिरिक्त ओळखपत्रांपैकी एक ओळख कागदपत्र सोबत आणावेत.  या निवडणूकीत जिल्ह्यातील जास्तीत जास्त शिक्षक मतदारांनी आपला मतदानाचा हक्क निर्भयपणे बजवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी श्री. गोयल यांनी केले आहे.

0 0 0 0 0 0 0 0 

Monday, 24 June 2024

राज्य कौशल्य विद्यापीठाच्या अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांनी 30 जूनपर्यंत अर्ज करावेत

 

राज्य कौशल्य विद्यापीठाच्या अभ्यासक्रमांसाठी
विद्यार्थ्यांनी 30 जूनपर्यंत अर्ज करावेत

 मुंबईदिनांक 24 जून, 2024 : विद्यार्थ्यांना आवडीच्या क्षेत्रात आपले करिअर करता यावे तसेच रोजगारक्षम संस्थांना कौशल्याधिष्ठीत मनुष्यबळ उपलब्ध व्हावे यासाठी मुंबई येथील महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या (MSSU) माध्यमातून विविध अभ्यासक्रम सुरू आहेत. या अभ्यासक्रमांसाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी 30 जून 2024 पर्यंत अर्ज  करावेतअसे आवाहन महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर यांनी 'दिलखुलासआणि 'जय महाराष्ट्रकार्यक्रमातून केले आहे.

महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठांतर्गत विद्यार्थ्यांना कौशल्य आधारित शिक्षण आणि प्रशिक्षण दिले जाते. अभियांत्रिकीव्यवस्थापनतंत्रज्ञान आणि इतर विद्यार्थ्यांची रोजगारक्षमता वाढविणे, उद्योगाभिमुख अभ्यासक्रमांच्या माध्यमातून शैक्षणिक आणि उद्योग यांच्यातील दरी कमी करण्याचे विद्यापीठाचे मुख्य उद्दिष्ट आहे. या विद्यापीठात बीबीएपदव्युत्तर पदवीसायबर सिक्युरिटीमध्ये व बांधकामातील मास्टर ऑफ टेक्नॉलॉजीआर्टिफिशियल इंटेलिजन्सइंटरनेट ऑफ थिंग्ज इत्यादी अभ्यासक्रम शिकविले जातात. या अभ्यासक्रमांसाठी 30 जून 2024 पर्यंत अर्ज स्वीकारण्याची मुदत देण्यात आली असून 1 जुलै 2024 पासून प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी अर्ज सादर करावेतअसेही कुलगुरू डॉ. पालकर 'दिलखुलासआणि 'जय महाराष्ट्रकार्यक्रमातून सांगितले आहे.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलासकार्यक्रमातून ही मुलाखत मंगळवारदि. 25बुधवार दि. 26 आणि गुरूवार दि. 27 जून 2024 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व 'न्यूज ऑन एआयआरया मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे, तर 'जय महाराष्ट्रकार्यक्रमात ही मुलाखत बुधवार दि. 26 जून 2024 रोजी सायंकाळी 7.30 वाजता महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर पाहता येणार आहे. निवेदक राजेंद्र हुंजे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

00 00 00 00 00

औद्योगिक प्रशिक्षण संस्था एरंडोल येथे ३० जून पर्यंत ऑनलाईन पद्धतीने प्रवेश अर्ज सादर करावे

 औद्योगिक प्रशिक्षण संस्था एरंडोल येथे  ३० जून पर्यंत

ऑनलाईन पद्धतीने प्रवेश अर्ज सादर करावे


जळगाव, दिनांक २४  जून, 2024 ( जिमाका वृत्तसेवा ) :  सर्व नागरीकांना व युवकांना कळविण्यात येते की, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील शासकीय आयटिआय एरंडोल जिल्हा जळगाव येथे केंद्रिय ऑनलाईन पध्दतीने प्रवेश प्रक्रिया २०२४ दिनांक ३ जून, २०२४ पासुन सुरु करण्यात आलेली असून इच्छुक उमेदवारांनी  https://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर भेट देवून ऑनलाईन पध्दतीने प्रवेश अर्ज भरवेत. सद अर्ज भरण्याची अंतिम दिनांक ३० जून, २०२४ सायंकाळी ५ वाजेपर्यंत आहे.


शासकीय आयटिआय एरंडोल येथे प्रवेश साठी कोपा, इलेक्ट्रिशियन, फिटर, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, मशिनिष्ट हे व्यवसाय उपलब्ध आहे. अधिक माहिती साठी औद्योगिक प्रशिक्षण संस्था एरंडोल येथे संपर्क साधावा, असे आवाहन प्राचार्य यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.


00 00 00 00 00

दुचाकी वाहनांसाठी नवीन पसंती क्रमांक मालिका

 दुचाकी वाहनांसाठी नवीन पसंती क्रमांक मालिका

जळगाव, दिनांक 24 जून, 2024 ( जिमाका ) : उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात परिवहनेत्तर संवर्गातील दुचाकी वाहनांची नवीन नोंदणी  एमएच 19/ईएल-0001 ते 9999 पर्यंतची मालिका लवकरच सुरु करण्यात येत आहे. ज्या वाहनधारकांना आपल्या वाहनांसाठी आकर्षक व पसंतीचा क्रमांक हवा असेल त्यांनी दि. 26 व 28 या दोन दिवसांपर्यंत दुपारी चार वाजेपर्यंत अर्ज  करावेत.  या अर्जासोबत शासकीय शुल्काचा डीडी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, जळगाव यांच्या नावे द्यावा.  शुल्क भरल्यावर 30 दिवसांच्या आत वाहन नोंदणी न केल्यास भरलेले शुल्क हस्तांतरीत होणार नाही.  नवीन मालिका दि.1 जुलै, 2024 पासून नियमित सुरु करण्यात येईल. अधिक माहितीसाठी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांचे कार्यालयाशी संपर्क साधावा,असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, जळगाव यांनी केले आहे.

0 0 0 0 0 0 0 0 0 0

शिष्यवृतीचे अर्ज रद्दबातल झाले असतील अशा विद्यार्थ्यांनी परत 30 जून, पर्यंत अर्ज सादर करावे

 शिष्यवृतीचे अर्ज रद्दबातल झाले असतील अशा 

विद्यार्थ्यांनी परत 30 जून, पर्यंत अर्ज सादर करावे

जळगाव, दिनांक 24 जून, 2024 ( जिमाका ) : राज्य शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवर ज्या विद्यार्थ्यांनी अनावधानाने अथवा नजरचुकीने Right to Giveup  हा पर्याय निवडून त्यांचे शिष्यवृतीचे अर्ज रद्दबातल झाले असतील केवळ अशा विद्यार्थ्यांना राज्यशासनातर्फे 30 जून, 2024 पर्यंत अंतिम संधी देण्यात आलेली आहे.

याबाबत विद्यार्थ्याने आपले महाविद्यालयाच्या प्राचार्यांशी संपर्क साधून महाविद्यालयांच्या प्राचार्य  login  मधून आपला अर्ज  Revert Back  करुन घेणे आवश्यक आहे. Revert Back   झालेला अर्ज विहित वेळेत विद्यार्थ्याच्या  Login  मधून ऑनलाईन फेर सादर करणे आवयक राहील. विहित वेळेत विद्यार्थ्याने अर्ज फेर सादर न केल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी विद्यार्थ्याची राहील याची नोंद घ्यावी असे आवाहन सहाय्य्क आयुक्त समाज कल्याण योगेश पाटील यांनी केले आहे.

0 0 0 0 0 0 0 0  0