Tuesday, 9 July 2013

ऑन लाईन शिष्यवृत्तीसाठी आदिवासी विद्यार्थ्याना आधारकार्ड असणे आवश्यक



          जळगांव, दि. 9 :- जळगांव जिल्हा हा सन 2013-14 या वर्षापासून डीबीटी योजनेत शासनाने समावेश केलेला आहे. सर्व आपल्या महाविद्यालयातील सन 2012-13 या शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यानी भरलेल्या ऑनलाईन अर्जावर आधारकार्ड असणे आवश्यक असल्याने या कार्यालयाचे स्तरावर मंजुरीसाठी पाठविलेल्या भारत सरकार शिष्यवृत्तीच्या विद्यार्थ्याच्या अर्जावर आधार कार्ड क्रमांक ऑनलाईनवर नमूद करुन अर्ज अद्यावत करुन घ्यावे. तसेच विद्यार्थ्याचे राष्ट्रीयकृत बॅकेतील बॅक खाते आधार कार्डाशी संलग्न करुन घ्यावे. त्याशिवाय विद्यार्थ्याना व महाविद्यालयांना शिष्यवृत्तीची देय असलेली रक्कम अदा करणे शक्य नाही.
            यापूर्वी ई-स्कॉलरशिपचे संकेतस्थळ http;etribal.maharashtra.gov.in यात अंशत:बदल करण्यात आला असून नवीन संकतस्थळ  ttps;etribal.maharashtra.gov.in असे आहे असे प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल जि. जळगांव यांनी कळविले आहे.

No comments:

Post a Comment