जळगांव, दि. 29 :-
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांचेमार्फत सप्टें.
/ ऑक्टो. 2013 मध्ये घेण्यात येणा-या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र ( इ. 12 वी )
परीक्षेस पुनर्परीक्षार्थी, नांव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी
विद्यार्थी तसेच श्रेणीसुधार योजने अंतर्गत प्रविष्ट होणा-या विद्यार्थ्यांसाठी
ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याच्या तारखा जाहीर करण्यात आल्या होत्या काही तांत्रिक
अडचणीमुळे त्यामध्ये अंशत: बदल करण्यात आला असून बदललेल्या तारखा खालीलप्रमाणे
आहेत.
नियमित शुल्कासह
विद्यार्थ्यानी शाळा / कनिष्ठ महाविद्यालयामार्फत ऑनलाईन पध्दतीने विहीत शुल्कासह
आवेदनपत्रे सादर करावयाच्या तारखा शुक्रवार दिनांक 19 जुलै ते बुधवार दि.
31 जुलै 2013 , शाळा / कनिष्ठ महाविद्यालयाने परीक्षा शुल्क भरणे व चलनाची माहिती
अपलोड करणे गुरुवार दि. 1 ऑगस्ट ते शनिवार दि. 3 ऑगस्ट 2013
विलंब शुल्कासह गुरुवार दि. 1 ऑगस्ट ते
मंगळवार दि. 6 ऑगस्ट 2013 शाळा / कनिष्ठ
महाविद्यालयाने परीक्षा शुल्क व चलनाची माहिती अपलोड करणे बुधवार दि. 7 ऑगस्ट ते
शनिवार दि. 10 ऑगस्ट 2013
तरी सदर
परीक्षेची आवेदनपत्रे ही ऑनलाईन पध्दतीने स्विकारण्यात येणार असल्याने
विद्यार्थ्यानी आवेदनपत्र भरण्यासाठी संबंधित शाळा / कनिष्ठ महाविद्यालय यांच्याशी
संपर्क साधावा. सर्व शाळा / कनिष्ठ महाविद्यालयातील मुख्याध्यापक / प्राचार्य
यांना कळविण्यात येते की, त्यांनी पूर्वी कळविलेल्या संकेतस्थळाऐवजी www.mahahsscboard.in
या मंडळाच्या संकेतस्थळावरुन ऑनलाईन आवेदनपत्र भरण्यात यावीत. असे सचिव राज्य
मंडळ, पुणे यांनी कळविले आहे.
No comments:
Post a Comment