जळगांव, दि. 10 - सेवानिवृत्त डाक
कर्मचा-यांच्या निवृत्ती वेतनासंबंधी तक्रारींचे प्रामाणिकपणे निवारण करण्यासाठी
डाक विभागातर्फे नियतीपणे पेंश्न अदालत चे
आयोजन केले जाते. यात कर्मचा-यांच्या तक्रारींचा योग्य प्रकारे न्यायनिवाडा
करण्यासाठी पोस्टाचे संबंधति अधिकारी तक्रारदारांना प्रत्यक्षपणे भेटतात.
त्यांच्या तक्रारींची दखल घेवून त्या लवकरात लवकर सोडविण्याचा प्रयत्न करतात.
मुख्य पोस्टमास्टर जनरल, महाराष्ट्र
सर्किल, मुंबई 400 001, बुधवार दिनांक 7 ऑगस्ट 2013 रोजी 15.00 वाजता मुख्य
पोस्टमास्टर जनरल, मुंबई यांचे कार्यालयामध्ये 35 वी डाक पेंशन अदालत आयोजित करीत
आहे.
डाक विभागातील सेवानिवृत्त
कर्मचा-यांच्या निवृत्ती वेतन (पेंशन) संबंधी ज्या तक्रारींचे निवारण 6
आठवडयांच्या आत झालेले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नसेल अशा सर्व तक्रारींची
या डाक पेंशन अदालत मध्ये दखल घेतली जाईल. कायदा संबंधित प्रकरणे उदा. उत्तराधिकार
तथा धोरणात्मक स्वरुप संबंधित तक्रारी पेंशन अदालत मध्ये विचारात घेतली जाणार
नाही. तक्रारींचा उल्लेख सर्व तपशिलासह केलेला असावा. उदा. तारीख व ज्या
अधिका-यांस मूळ तक्रार पाठविली असेल त्याचे नांव, हुद्दा इत्यादी संबंधितांनी
पेंन्शन बाबतची आपली तक्रार श्री. व्ही. ए. व्यवहारे, वरिष्ठ लेखा अधिकारी / सचिव,
पेंशन अदालत, मुख्य पोस्टमास्टर जनरल यांचे कार्यालय, मुंबई जी. पी. ओ. इमारत, 2
रा माळा, मुंबई - 400 001 यांचे नांवे अतिरिक्त प्रतिसह दिनांक 19 जुलै 2013 अथवा
तत्पुर्वी पोहोचेल अशा रितीने पाठवावी. त्यानंतर आलेल्या तक्रारींची दख्रल घेतली
जाणार नाही.
No comments:
Post a Comment