Thursday, 4 July 2013

गौताळा अभयारण्याचा व्यवस्थापन आराखडा तयार करणेसाठी सुचना पाठवाव्यात



              जळगांव, दि. 4 :- जळगांव जिल्हयातील चाळीसगांव तालुक्यातील क्षेत्र गौताळा औट्रमघाट अभयारण्य अंतर्गत येते. सदर अभयारण्याचा पुढील 10 वर्षासाठीचा व्यवस्थापन आराखडा तयार करण्याचे काम या विभागातर्फे चालु आहे. सदर आराखडयामध्ये अभयारण्यातील वन्यप्राणी / पक्षी यांचे संरक्षण / संवर्धनाचे दृष्टीने विविध उपाययोजनांचा अंतर्भाव असणार आहे.
              तरी या कामाकरीता जिल्हयातील सेवाभावी संस्था (N G O) निसर्गप्रेमी  / वन्यप्राणी प्रेमी/ पक्षी मित्र / सर्पमित्र / तसेच इतर माहितगार यांचेकडून अभयारण्यासाठी भविष्यात करावयाच्या कामाबाबत काही सूचना / सल्ला प्राप्त करावयाचे आहेत, ज्यांना सुचना / सल्ला देणे आहे, त्यांनी या विभागाकडे लवकरात लवकर त्यांच्या सुचना / सल्ला या विभागाकडे पाठवाव्यात त्यांना विचारात घेवून व्यवस्थापन आराखडा तयार करण्यास मदत होईल असे उपवनसंरक्षक औरंगाबाद यांनी कळविले आहे.

No comments:

Post a Comment