Wednesday, 10 July 2013

अण्णासाहेब पाटील विकास महामंडळामार्फत बीज भांडवल कर्ज योजना



     जळगांव, दि. 10 :- आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील सुशिक्षित बेरोजगारांकरिता रोजगार व स्वयंरोजगारांच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची स्थापना करण्यांत आलेली आहे. ज्या प्रवर्गाकरिता शासनाचे महामंडळ नाही अशा प्रवर्गातील आर्थिकदृष्टया दुर्बल घटकांतील सुशिक्षित बेरोजगारांच्या आर्थिक उन्नतीचा मार्ग खुला करण्यांसाठी स्वयंरोजगाराच्या योजना राबवून त्यात येणा-या अडचणी दूर करणे असा या महामंडळाचा उददेश आहे. सदर महामंडळ हे कंपनी कायदा 1956 अंतर्गत नोंदणीकृत आहे.
          महामंडळामार्फत बीज भांडवल कर्ज योजना राबविण्यांत येते योजनेच्या अटी व शर्ती करिता व अधिक माहितीसाठी जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्रांशी संपर्क साधावा असे सहाय्यक संचालक, जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र, जळगांव यांनी कळविले आहे.                                  00000

No comments:

Post a Comment