Friday, 19 July 2013

सन 2014 -15 साठी नवीन शाळा सुरु करण्यासाठी व दर्जावाढ करण्यासाठी अर्ज करावेत



            जळगांव, दि. 19 :- सन 2014-15 या शैक्षणिक वर्षाकरिता सर्व माध्यमाच्या नवीन प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना परवानगी देण्याकरीता व विद्यमान शाळांचा दर्जा वाढ करण्यासाठी नोंदणीकृत संस्थांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. स्वयंअर्थसहाय्यित शाळा ( स्थापना व विनियमन) अधिनियम 2012 तसेच दिनांक 2 जुलै 2013 चा अध्यादेश शासनाच्या खालील संकेत स्थळावर उपलबध करुन देण्यात आला आहे.
                  www.depmah.com , www.mahdoesecondary.com, www.msbshse.ac.in  त्याचप्रमाणे सदर अधिनियमाची तसेच अध्यादेशाची प्रत शिक्षणाधिकारी  (प्राथमिक  / माध्यमिक ) यांचे कार्यालयात पाहण्यास उपलब्ध होईल. सदर अधिनियमामध्ये विहित नमुन्याचा अर्ज व अर्जासोबत जोडावयाच्या कागदपत्रांची यादी देण्यात आलेली आहे. नवीन शाळा मान्यतेकरीता व अस्तित्वात असलेल्या शाळांचा दर्जा वाढ करण्यासाठी अर्ज करु इच्छिणा-या संस्थांनी विहित प्रपत्रामध्ये आपला अर्ज उपरोक्त अधिनियम तसेच दिनांक 2 जुलै 2013 च्या अध्यादेशातील सुधारणा / दुरुस्त्या विचारात घेऊन www.school.maharashtra.gov.in/sfc या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने भरुन व त्यासोबत रुपये 5 हजार चलनाव्दारे विहित लेखाशिर्षामध्ये जिल्हा कोषागारामध्ये जमा करुन दिनांक 31 जुलै 2013 रोजी सायंकाळी 5.00 वाजेपर्यत ऑनलाईन पध्दतीने भरलेला अर्ज, चलनाची मूळ प्रत व अर्जासोबत जोडावयाच्या कादपत्रासह संबंधित शिक्षणाधिकारी  (प्राथमिक / माध्यमिक) यांचेकडे समक्ष सादर करावेत. लेखी स्वरुपातील तसेच पोष्टावदारे / कुरिअरने पाठविलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत. त्याचप्रमाणे सदरचा अर्ज सादर करण्यासाठी कोणत्याही प्रकारची मुदतवाढ देण्यात येणार  नाही, असे शिक्षण संचालक (माध्यमिक  व उच्च माध्यमिक ) यांनी कळविले आहे.

No comments:

Post a Comment