Thursday, 4 July 2013

वाहनांच्या विंडस्क्रीन व खिडक्यांच्या काचेवर बसविण्यात येणा-या ब्लॅक फिल्मच्या वापरास मनाई



           जळगांव, दि. 4 :-वाहनाच्या विंडस्क्रीन व पाठीमागील काचांची पारदर्शकता 70 टक्क्यापेक्षा आणि बाजूच्या खिडक्यांच्या काचांची पारदर्शकता 50 टक्क्यांपेक्षा कमी करणे हा सुध्दा कायद्याने गुन्हा आहे.
           जळगांव जिल्हयातील सर्व चार चाकी / बस बॉडी बिल्डर वाहन वितरक यांना या प्रसिध्दी पत्रकान्वारे कळविण्यात येते की, उपरोक्त सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणीच्या दृष्टीने आपल्या शोरुममार्फत वितरीत करण्यात येणा-या वाहनांच्या मालाकांसाठी सोबत शोरुममध्ये प्रदर्शित करावयाच्या फलकाचा  असून आपल्या शोरुमच्या दर्शनी भागात तसेच अभ्यांगत कक्षात ठळकपणे प्रदर्शित करण्यात यावे.
             उपरोक्त सुचनांचे उल्लंघन केल्यास आपल्यास व्यवसाय प्रमाणपत्रावर केंद्रीय मोटार वाहन नियमानुसार योग्य ती कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी जळगांव यांनी कळविले आहे.

No comments:

Post a Comment