जळगांव, दि. 8 :- अपंग कल्याण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे
मार्फत शासन मान्यता प्राप्त तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र देगलूर या संस्थेत
महाराष्ट्र व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ मुंबई मार्फत शासन मान्यता प्राप्त
अभ्यासक्रमासाठी 15 ते 35 वयोगटातील अपंग व मुकबधीर मुला-मुलींना प्रवेश देण्यात
येत आहे. सदरील प्रशिक्षण केंद्रात संगणक प्रशिक्षण (हार्डवेअर व कॉम्प्युटराईजड
अकाऊटींग ॲन्ड ऑफिस ॲटोमेशन) वेल्डर कम फॅबीकेटर, कंपोजींग प्रिंटीग ॲण्ड बायडींग,
शिवन कर्तण कला, टंकलेखन, मोटार अर्मीचर रिवायडींग, विद्युत तारतंत्री इत्यादी
अभ्यासक्रमास प्रवेश देण्यात येत आहे. संस्थेत अपंग आणि मुकबधीर प्रशिक्षणार्थ्याना
यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ अंतर्गत पदवी शिक्षणाची सोय करण्यात आलेली आहे.
प्रवेशितांची निवास, वैद्यकीय औषधोपचाराची व प्रशिक्षण साहित्याची विनामुल्य सोय
केली आहे.
तरी इच्छूक अपंग मुला-मुलींनी किंवा
पालकांनी दिनांक 30 जुलै 2013 पर्यत प्राचार्य, तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण
केंद्र, शिवनेरी, नगर, रामपुर रोड, देगलुर जि. नांदेड मोबाईल क्रं. 9960900369,
9403207100, 9604951055 येथे संपर्क साधावा.
No comments:
Post a Comment