Tuesday, 9 July 2013

शेळया / मेढया खरेदीसाठी अर्ज सादर करावेत



              जळगांव, दि. 9 :- अंशत: ठाणबध्द पध्दती 10 शेळया / मेंढया व एक बोकड / मेंढा पालनाची नाविण्यपूर्ण राज्यस्तरीय योजनेची अंमलबवजाणी करण्यासाठी
            या योजनेत निवड होणा-या प्रत्येकी लाभार्थ्याला 10 शेळया / मेंढया अधिक एक बोकड / मेंढाचे युनिट देण्यात येते. अर्जाचा विहित नमुना, नियम, अटी , शर्ती पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती यांचे कार्यालयाकडून तालुकास्तरावर उपलब्ध आहे.
            नवीन प्राप्त झालेले वैध, परिपूर्ण व पात्र अर्ज व मागील आर्थिक वर्षातील प्रलंबित वैध अर्जाचा लाभार्थी निवडीसाठी विचार केला जाईल.
             जे लाभार्थी स्वहिस्स्याची रक्कम उभारण्यास सक्षम आहेत किंवा लाभार्थी हिस्स्याची रक्कम बँक / वित्तीय संस्था यांच्या कर्जातून उभारतील त्यांना अग्रक्रमाने व प्राधान्याने योजनेचा लाभ देण्यासाठी अनुदान देण्यांत येईल.
            योजने अंतर्गत 3 टक्के विकलांग लाभार्थ्यांना देण्यात येईल. तसेच 30 टक्के महिला लाभार्थ्याची निवड करण्यात येईल.
            या योजनेचा जिल्हयातून सर्वसाधारण  प्रवर्गातील 54 व अनुसूचित जाती प्रवर्गातील 26 लाभार्थ्याना लाभ देण्यात येणार आहे.
           प्रत्येक (10 + 1) युनिटची एकूण किंमत रुपये 87 हजार 857 असून सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्याला रु. 43 हजार 929 व अनुसूचित जाती प्रवर्गातील लाभार्थ्याला रु. 65 हजार 893 चे अनुदान देण्यात येईल.
            उस्मानाबादी व संगमनेरी शेळयांची व जातीवंत मेंढयाच्या गटाची खरेदी शेळी / मेंढी विकास महामंडळाच्या प्रक्षेत्रावरुन किंवा विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावरुन खरेदी करावी लागेल. वरील दोन्ही संस्थेकडे शेळया / मेंढया व बोकड / मेंढया उपलब्ध न झाल्यास अधिकृत मान्यताप्राप्त बाजारातून गटाची खरेदी करण्यात येईल.
            निवड झालेल्या व प्रत्यक्ष खरेदी करणा-या लाभार्थ्याला विहित नमुन्यातील बंधपत्र द्यावे लागेल. लाभार्थ्याच्या स्वहिश्याच्या रक्कमेचा धनाकर्ष जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त यांचे नांवे किंवा बॅकेमार्फत कर्ज मंजूर होणा-या लाभार्थ्यांच्या बॅक कर्ज खात्यात अनुदानाची रक्कम वितरीत करण्यात येईल.
               शेळयाची खरेदी करण्यापूर्वी इकॉनॉमी टाइप वाडयाचे (आराखडयानुसार) व खाद्य साठविण्यासाठी बांधकाम पूर्ण करावे लागेल. गटातील सर्व शेळया  / मेंढयाचा नियमानुसार विमा उतरविणे बंधनकारक राहील. लाभ घेणा-या लाभार्थीचे बॅक खाते माहितीसाठी जिल्हा पशुसंवर्धन उप आयुक्त जळगांव यांचेशी संपर्क साधावा. आवश्यक राहील. अधिक

No comments:

Post a Comment