Saturday, 6 July 2013

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे अध्यक्ष रमेश कदम यांचा जळगांव जिल्हा दौरा कार्यक्रम



            जळगांव, दि. 6 :- लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ  (मर्या.) अध्यक्ष श्री. रमेश कदम (राज्यमंत्री दर्जा) यांचा जळगांव जिल्हा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे
          सोमवार दिनांक 8 जुलै 2013 रोजी सकाळी 10.30 वा. कन्नड येथुन शासकीय वाहनाने चाळीसगांव जि. जळगांवकडे प्रयाण, सकाळी 11.00 वा. शासकीय विश्रामगृह चाळीसगांव येथे आगमन व राखीव, सकाळी 11.15 वा. प्रादेशिक व्यवस्थापक नाशिक व जिल्हा व्यवस्थापक जळगांव यांच्यासमवेत आढावा बैठक (स्थळ : शासकीय विश्रामगृह चाळीसगांव), सकाळी 11.30 वा. चाळीसगांव तालुक्यातील विविध मातंग वस्त्यांना भेटी व समाजाच्या अडीअडचणी संदर्भात चर्चा व मार्गदर्शन , दुपारी 12.30 वा. पत्रकार परिषद (स्थळ : शासकीय विश्रामगृह चाळीसगांव), दुपारी 1.00 वा. जळगांव जिल्हयातील मातंग समाजातील प्रमुख कार्यकर्त्यासमवेत औरंगाबाद येथे होणारा महिलांकरीता कर्ज वितरण कार्यक्रमाच्या नियोजनासंदर्भात चर्चा (स्थळ : शासकीय विश्रामगृह चाळीसगांव.), दुपारी 2.30 वा. चाळीसगांव येथुन शासकीय वाहनाने भडगांव जि. जळगांवकडे प्रयाण, दुपारी 3.15 वा. भडगांव तालुक्यातील विविध मातंग वस्त्यांना भेटी व समाजाच्या अडीअडचणी संदर्भात चर्चा व मार्गदर्शन, सायं. भडगांव येथुन शासकीय वाहनाने औरंगाबादकडे प्रयाण

No comments:

Post a Comment