जळगांव, दि. 4 :- जळगांव येथे सैनिकी
मुलांचे व मुलींचे वसतिगृह असून मुलांचे वसतिगृह मध्यवर्ती शिवाजी पुतळण्याजवळील
जी . एस. मैदानाजवळ आहे. तर मुलींचे वसतिगृह उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील
स्टेडियम समोर आहे. सदर वसतिगृहात आजी माजी सैनिकांच्या इयत्ता आठवी पासून पुढील
विविध अभ्यासक्रमासाठी शिक्षण घेत असलेल्या मुलांना / मुलींना माफक शुल्क आकारुन
प्रवेश दिला जातो. या अंतर्गत शैक्षणिक वर्ष 2013-2014 पासून माजी सैनिक
विधवांच्या पाल्यांना निशुल्क प्रवेश दिला जाणार असून माजी सैनिकांच्या
पाल्यांसाठी भोजन व इतर शुल्कामध्ये कपात करण्यात आलेली आहे. त्यानुसार शिपाई ते
हवालदार यांच्या पाल्यासाठी 600/- प्रति महा जेसीओ पाल्यांसाठी रु. 800/- प्रति
महा, सैनिकी अधिकारी यांचे पाल्यासाठी प्रति महा रु. 900/- व तसेच इतर
नागरिकांच्या पाल्यांसाठी दरमहा रु. 1800/- प्रति महा दराप्रमाणे माफक भोजन,
निवास, सेवा यांच्या समावेशासह शुल्क आकारण्यात येणार आहे. सदर वसतिगृहात
विद्यार्थ्याची सर्वागिण प्रगती साधण्यासाठी विविध क्रिडा स्पर्धाचे व सहलींचे
आयोजन केले जाते. तसेच व्यायामशाळा व वाचनालय यांची सुविधा उपलब्ध आहे. वसतिगृहात
कार्यरत असलेले कर्मचारी मुखत्वे करुन सैन्य सेवेतून सेवा निवृत्त झालेले सैन्य
अधिकारी व कर्मचारी असल्याने त्यांचकडून वसतिगृहात राहणा-या विद्यार्थ्याना उत्तम
शिस्त लावली जाते व योग्य मार्गदर्शन केले जाते. तरी जळगांव जिल्हयातील माजी सैनिक
व दिवंगत सैनिक / माजी सैनिक यांच्या पत्नीनी शैक्षणिक वर्ष 2013-2014 मध्ये
आपल्या इयत्ता आठवी व पुढील शिक्षण घेणा-या
पाल्यांसाठी सदर सैनिकी मुलांच्या किंवा मुलींच्या वसतिगृहाच्या सेवेचा लाभ घ्यावा
असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी जळगांव यांनी केले आहे. वसतिगृह
प्रवेशाबाबत अधिक माहितीसाठी श्री. महाजन मोबाईल क्रं. 9372913536 व श्रीमती कचरे
मोबाईल क्रं. 9850481913 वर संपर्क साधावा असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी जळगांव
यांनी कळविले आहे.
No comments:
Post a Comment