Thursday, 8 September 2016

परीक्षा केंद्र परिसरात प्रवेशबंदी

सरळसेवा भरती परीक्षा
परीक्षा केंद्र परिसरात प्रवेशबंदी
                                               
जळगाव दि 8 – जिल्हा निवड समिती, जळगाव यांचेमार्फत दि. 11 रोजी सरळसेवा भरती परीक्षा 2016 अंतर्गत तलाठी (पेसा क्षेत्रातील व पेसा क्षेत्राबाहेरील) संवर्गातील रिक्त पदांसाठी लेखी परीक्षा घेण्यात येत आहे. ही परीक्षा जिल्ह्यातील जळगाव शहरासह भुसावळ, अमळनेर, चाळीसगाव व फैजपूर येथील एकूण 91 उपकेंद्रांवर (शाळा/महाविद्यालय) सकाळी 11 ते दुपारी एक वाजपावेतो घेण्यात येणार आहे. सदर परिक्षेच्या वेळी शांतता व सुव्यवस्था कायम रहावी यासाठी, खबरदारीचा उपाय म्हणुन जळगाव जिल्हादंडाधिकारी रुबल अग्रवाल यांनी सर्व  91 परिक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरात रविवार दि. 11 रोजी सकाळी 10ते दुपारी 2 वाजेपर्यंत प्रवेशबंदी लागू केली आहे. सदर बंदी आदेश परीक्षार्थी, नियुक्त कर्मचारी, अधिकारी, पोलीस, होमगार्ड यांचेसाठी लागु असणार नाही.

०००००

No comments:

Post a Comment