मतदार
याद्यांचा संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर
चाळीसगाव दि. 17 (उमाका वृत्तसेवा) : भारत निवडणूक
आयोगाच्या सुचनेनुसार 1 जानेवारी 2017 या अर्हता दिनांकावर आधारित मतदारांच्या
छायाचित्रांसह मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम 16 सप्टेंबर,2016
ते 05 जानेवारी, 2017 या कालावधीत राबविण्यात येणार
आहे.
या कार्यक्रमात 16 सप्टेंबर, 2016 रोजी प्रारुप मतदार याद्यांची प्रसिध्दी करण्यात
येणार असून 16 सप्टेंबर ते 14 आक्टोंबर, 2016 दरम्यान दावे व हरकती स्वीकारण्यात
येणार आहेत. 16 सप्टेंबर, 2016 (शुक्रवार)
व 30 सप्टेंबर,2016 (शुक्रवार) रोजी मतदार यादीमधील संबंधित भागांचे/सेक्शनचे/ग्रामसभा/स्थानिक
संस्था येथे वाचन तर आरडब्ल्युए सोबत बैठक आणि नावांची खातरजमा करण्यात येईल. 18
सप्टेंबर, 2016 (रविवार) व 09 ऑक्टोंबर,2016
(रविवार) रोजी विशेष मोहीम राबविण्यात येईल. 16 नोव्हेंबर, 2016 (बुधवार) पर्यंत
दावे व हरकती निकाली काढण्यात येतील. 15 डिसेंबर,2016 संपुर्ण डाटाबेसचे अद्यावतीकरण
तर 05 जानेवारी 2017 रोजी अंतिम मतदार
यादया प्रसिध्द केल्या जातील या प्रकारे मतदार याद्यांचा संक्षिप्त पुनरिक्षण
कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.
तरी
सर्व संबंधितांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन चाळीसगावचे तहसिलदार कैलास देवरे
यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
* * * * * * *
*
No comments:
Post a Comment