विभागीय
लोकशाही दिन 12 सप्टेंबर रोजी
नाशिक, दि. 6
:- जनतेच्या तक्रारी सोडविण्यासाठी विभागीय लोकशाही दिनाची बैठक विभागीय आयुक्त कार्यालय
नाशिक येथे सोमवार 12 सप्टेंबर 2016 रोजी होणार आहे.
लोकशाही दिन
बैठकीत विहीत पध्दतीने प्राप्त अर्जांवर सुनावणी घेण्यात येणार असून अर्जदारांनी मूळ
अर्जासह सुनावणीसाठी उपस्थित राहावे असे आवाहन महसूल उपायुक्त डॉ. संजय कोलते यांनी
केले आहे.
लोकशाही दिनात
प्रत्यक्ष अर्ज सादर करता येणार नाहीत. तसेच विविध अडचणींचे निराकरण करणेसाठी अस्तित्वात
असलेली न्यायालये, आयोग, लोकायुक्त कार्यालये आदी प्रशासकिय यंत्रणांच्या कक्षेतील
न्यायप्रविष्ठ प्रकरणे, राजस्व अपिल, सेवा-आस्थपनाविषयक बाबी, यापूर्वी अंतिम उत्तर दिलेले लोकशाहीदिनातील अर्ज,
कागदपत्रांची पुर्तता नसणारे अर्ज आणि वैयक्तिक स्वरुपातील नसतील अशा प्रकरणांचे अर्ज
विभागीय लोकशाही दिनात स्विकारले जाणार नाहीत. लोकशाही दिन सुनावणीसाठी अर्जदारांनी
मूळ अर्जासह सुनावणीसाठी उपस्थित राहणे गरजेचे राहील असे या आवाहनाद्वारे कळविले आहे.
* *
* * * * *
No comments:
Post a Comment