राष्ट्रीय व्यवसाय नोंदवही पडताळणी
जिल्ह्यातील 92 हजार आस्थापनांच्या तपासणीला सुरुवात
जळगाव
दि.8- तेराव्या वित्त आयोगांतर्गत
राष्ट्रीय व्यवसाय नोंदवहीतील आस्थापनांची पडताळणी जिल्हा सांख्यिकी कार्यालयामार्फत करण्यात येत
असून जिल्ह्यातील विविध 7 कायद्यान्वये स्थापित 92 हजार आस्थापनांच्या तपासणीला
सुरुवात झाल्याची माहिती जिल्हा सांख्यिकी कार्यालयामार्फत देण्यात आली आहे.
जिल्ह्यात
कंपनी कायदा 1956, दुकाने व आस्थापना अधिनियम 1948, कारखाने अधिनियम 1948,
सार्वजनिक विश्वस्त संस्था कायदा 1950, सहकारी संस्था कायदा 1960, उद्योग अधिनियम,
खादी व ग्रामोद्योग अधिनियम 1960 या सात वेगवेगळ्या कायद्यांअंतर्गत नोंदणी
झालेल्या आस्थापनांची पडताळणी करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. या पडताळणीसाठी
जिल्हा सांख्यिकी कार्यालयाचे कर्मचारी-अधिकारी आस्थापनांना प्रत्यक्ष भेट देणार
आहेत.
सदर पडताळणीचे काम हे विहित मुदतीत पूर्ण करावयाचे
असल्याने क्षेत्रकाम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक माहिती आस्थापना
चालकांनी तातडीने उपलब्ध करुन द्यावी. या पडताळणीदरम्यान संकलित होणारी
माहिती ही शासनाच्या विविध विकास योजना
तयार करण्यासाठी पायाभुत आकडेवारी म्हणुन वापरली जाणार असल्याने माहिती देणे
बंधनकारक आहे. तसेच ही माहिती गोपनीय ठेवली जाणार आहे, याची आस्थापना मालक व
चालकांनी नोंद द्यावी व संबंधित क्षेत्रिय कर्मचाऱ्यांना माहिती देऊन सहकार्य
करावे, असे आवाहन जिल्हा सांख्यिकी अधिकारी पी.एस. पाटील यांनी केले आहे.
राष्ट्रीय व्यवसाय नोंदवहीच्या क्षेत्रीय
पडताळणीच्या कामासाठी निवडण्यात आलेल्या आस्थापनांची संख्या
अ.क्र.
|
7 कायदे
|
क्षेत्रीय पडताळणी करावयाच्या आस्थापनांची संख्या
|
1
|
कंपनी कायदा,1956
|
1325
|
2
|
कारखाना अधिनियम,1948,(DISH)
|
1101
|
3
|
सार्वजनिक विश्वस्थ् संस्था कायदा,1950
|
11207
|
4
|
दुकाने व आस्थापना अधिनियम,1948
|
62140
|
5
|
सहकारी संस्था कायदा,1960
|
4580
|
6
|
उद्योग अधिनियम(MSME)
|
2854
|
7
|
खादी ग्रामोद्योग अधिनियम,1960
|
8802
|
|
एकूण
|
92009
|
०००००
No comments:
Post a Comment