चाळीसगाव
प्रातांधिकारी पदी शरद पवार रुजू
चाळीसगाव दि. 29 (उमाका वृत्तसेवा) : चाळीसगावचे
तत्कालीन प्रातांधिकारी मनोज घोडे पाटील यांची फैजपूर प्रातांधिकारी पदी बदली
झाल्यानंतर त्यांच्या रिक्त पदावर बिलोली जि.नांदेड येथील उपविभागीय अधिकारी शरद
भगवान पवार यांची नियुक्ती झाली आहे. त्या अनुषंगाने श्री.पवार यांनी चाळीसगावचे
तहसिलदार कैलास देवरे यांच्याकडून पदभार स्विकारला आहे.
मुळचे कराड ता.सातारा
येथील रहिवासी असलेले शरद पवार यांचे शिक्षण एम.एस.सी.ॲग्री पर्यंत झाले आहे. एक
वर्ष तालुका कृषी अधिकारी म्हणून त्यांनी सेवा बजावल्यानंतर त्यांनी मे-2014 रोजी महसूल प्रशासनातील उप विभागीय
अधिकारी म्हणून जबाबदारी स्विकारली आहे. बिलोली येथे कार्यरत असतांना त्यांनी
जलयुक्त शिवार योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसह अवैध गौण खनिज वाहतुकीला आळा
घालण्यातही मोठे यश संपादन केले आहे.
चाळीसगाव तालुक्यात हजर
होतांना शासनाच्या योजना प्रभावीपणे राबवून समाजातील उपेक्षीत घटकांना न्याय
देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितले, तर तालुक्यातील
लोकप्रतिनीधींसह सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांशी समन्वय ठेवून चांगले काम करण्याचा
विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
* * * * * * *
*
No comments:
Post a Comment