Friday, 25 April 2025

जळगाव जिल्हा क्रीडा विभागातर्फे उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन

 

जळगाव दि. 25 ( जिमाका वृत्तसेवा ) - जळगाव जिल्हा क्रीडा परिषद आणि युवक व क्रीडा सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच त्यांच्यातील क्रीडा गुणांना वाव मिळावा यासाठी भव्य मोफत क्रीडा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
हे शिबिर खो-खो, कबड्डी आणि सॉफ्टबॉल, योगा या खेळांसाठी असून ते येत्या २६ एप्रिल ते ५ मे २०२५ या कालावधीत सकाळी ७.३० ते ९.३० आणि सायंकाळी ५.३० ते ७.३० या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल, जळगाव येथे आयोजित केले जाणार आहे. या शिबिरात खेळाडूंना राज्य क्रीडा मार्गदर्शकांचे मार्गदर्शन लाभणार आहे, ज्यामुळे खेळाडूंना उच्च दर्जाचे प्रशिक्षण विनामूल्य मिळेल.
तरी जिल्ह्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, आश्रमशाळा आणि विविध क्रीडा संघटना व क्रीडा मंडळांतील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. इच्छुक प्रशिक्षणार्थींनी आपापल्या शाळा/संस्थांच्या माध्यमातून आपली नावे व इयत्ता नोंदवावी. या प्रशिक्षण शिबिरा बाबत अधिक माहितीसाठी मिनल थोरात (राज्य क्रीडा मार्गदर्शक- खो-खो) ८६२५९४६७०९ व किशोर चौधरी (राज्य क्रीडा मार्गदर्शक सॉफ्टबॉल) ९४०३४७९९९७ तसेच चंचल माळी (राज्य क्रीडा मार्गदर्शक योगा) यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी रविद्र नाईक यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment