जळगाव, दि. 7 (जिमाका वृत्तसेवा) : केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या जळगाव जिल्हा दौऱ्याचा कार्यक्रम खालीलप्रमाणे आहे. मंगळवार दिनांक ०८ एप्रिल २०२५ रोजी ०५:३० वाजता पाटलीपुत्र एक्स्प्रेसने जळगाव रेल्वे स्थानकावर आगमन. संध्याकाळी ५:४५ वाजता मोटारीने जळगाव शासकीय विश्रामगृह येथे आगमन. सकाळी०९:४५ वाजता जळगाव शासकीय विश्रामगृहात जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक आणि जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांच्यासोबत सामाजिक न्याय विभागाच्या योजनांवर चर्चा. सकाळी १०:१५ वाजता जळगाव शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद. सकाळी११:३० वाजता आकाशवाणी चौकातील लाड वंजारी मंगल कार्यालयात नागरिकांच्या मेळाव्यात सहभाग. दुपारी १२:३० वाजता आकाशवाणी चौकातून मोटारीने बुलढाण्याकडे प्रयाण.
No comments:
Post a Comment