जळगाव दि. 29 ( जिमाका वृत्तसेवा ): महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ ची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने राज्य शासनातर्फे दिल्या जाणा-या सेवा पारदर्शक व कालबध्द पध्दतीने देण्याकरीता महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ पारित करण्यात आलेल्या एकूण ०१ ते ११५ सेवांबाबत नागरिकांना माहिती होवून सर्व सेवानुसार कामकाज करणे सोयीचे व वेळेत पूर्ण करण्यात व्हावे याकरीता सेवांचा लाभ सर्व नागरिकांनी घ्यावा असे आवाहन सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी, प्रादेशिक परिवहन कार्यालय, जळगाव यांनी केले आहे.
Tuesday, 29 April 2025
महाबीजचा ४९ वा वर्धापन दिन उत्साहात संपन्न; सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण!
जळगाव दि. 29 ( जिमाका वृत्तसेवा ): महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादित, अकोला (महाबीज) ने सोमवार, २८ एप्रिल, २०२५ रोजी आपला ४९ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा केला. महाबीज मुख्यालयात आयोजित या कार्यक्रमात महाबीजच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या वाटचालीचा जल्लोष करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक योगेश कुंभेजकर होते.
या विशेष कार्यक्रमाला अकोला जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक बच्चन सिंह (भा.पो.से.) आणि डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच, महाबीजचे संचालक वल्लभराव देशमुख आणि बीज प्रमाणीकरण यंत्रणा, अकोलाचे संचालक डॉ. अंकुशराव माने यांचीही विशेष उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाची सुरुवात महाबीज मुख्यालयात वृक्षारोपण करून झाली. यानंतर मागील दोन वर्षात उल्लेखनीय कामगिरी करणारे बिजोत्पादक, शेतकरी, महाबीज विक्रेते आणि महाबीजचे अधिकारी-कर्मचारी यांना ‘महाबीज गौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना महाव्यवस्थापक डॉ. प्रफुल्ल लहाने यांनी महाबीजच्या ४९ वर्षांच्या प्रवासातील कर्मचाऱ्यांच्या तीन पिढ्यांचा संगम आणि भविष्यातील वाटचाल यावर विस्तृत माहिती दिली. महाबीजचे संचालक डॉ. रणजीत सपकाळ यांनी सोयाबीन पिकाला पर्याय शोधण्याची आणि संत्रा व इतर फळपिकांच्या संशोधनावर लक्ष केंद्रित करून नवीन वाण विकसित करण्याची अपेक्षा व्यक्त केली. ज्येष्ठ संचालक वल्लभराव देशमुख यांनी महाबीजच्या स्थापनेपासूनचा इतिहास सांगून चिया सीड्स, हळद आणि राजमा या पिकांचे वाण उपलब्ध करण्याचे कार्य सुरू असल्याचे सांगितले आणि ते जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याची आशा व्यक्त केली.
बीज प्रमाणीकरण यंत्रणेचे संचालक डॉ. अंकुशराव माने यांनी बीज प्रमाणीकरणामध्ये महाबीज अधिकाऱ्यांकडून मिळत असलेल्या सहकार्याबद्दल प्रशंसा केली. त्यांनी ‘साथी’ पोर्टलची अंमलबजावणी करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असल्याचे सांगितले. संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे यांनी विद्यापीठांचा महाबीजसोबतचा दीर्घ सहवास आणि हवामानाला अनुकूल वाणांचे संशोधन करून शेतकऱ्यांचे उत्पादन कसे वाढवता येईल यावर विचार व्यक्त केले. त्यांनी जैविक खतांचा वापर करून जमिनीचे आरोग्य सुधारण्याची गरज असल्याचेही सांगितले.
जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी महाबीजने आजपर्यंत शेतकऱ्यांसाठी वाजवी दरात गुणवत्तापूर्ण बियाणे उपलब्ध करून दिले, ही कौतुकास्पद बाब असल्याचे म्हटले. बियाणे वाटप करताना कोणतीही अडचण आल्यास पोलीस विभागाकडून पूर्ण सहकार्य मिळेल, असे आश्वासन त्यांनी दिले.
अध्यक्षीय भाषणात व्यवस्थापकीय संचालक योगेश कुंभेजकर यांनी महाबीजला लाभलेल्या मागील अध्यक्षांचे आणि व्यवस्थापकीय संचालकांचे स्मरण केले. त्यांनी १९८० ते १९८४ या काळात तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक विश्वासराव धूमाळ यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे महाबीजचे कार्य राज्यभर विस्तारले, असे सांगितले. सुवर्ण महोत्सव विशेषांकासाठी परिश्रम घेणाऱ्या टीमचे कौतुक करत त्यांनी पुरस्कारप्राप्त कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. महाबीजच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात महाबीज आणि शेतकऱ्यांसाठी वर्षभर सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारे कार्यक्रम आयोजित केले जातील, असेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर बळी यांनी केले, तर आभार प्रदर्शन जितेंद्र सरोदे यांनी केले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयाचे १ मे रोजी उद्घाटन
जळगाव दि. 29 ( जिमाका वृत्तसेवा ): – महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागांतर्गत नव्याने स्थापन करण्यात आलेल्या “जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय”चा शुभारंभ १ मे २०२५ रोजी सकाळी १०.१५ वाजता करण्यात येणार आहे. उद्घाटन समारंभ जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते होणार आहे.
जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय सामाजिक न्याय भवन, वित्त व महा मंडळ येथून कार्यान्वित होणार असून दिव्यांग व्यक्तींना एकत्रित सेवा-सुविधा उपलब्ध होणार आहेत. जिल्हास्तरीय कार्यालये स्वतंत्रपणे सुरु करण्यासाठी दिव्यांग कल्याण विभागातील कार्यरत वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता यांच्याकडे त्यांच्या पदाचा कार्यभार सांभाळून "जिल्हा दिव्याग सक्षमीकरण अधिकारी" या पदाचा अतिरिक्त कार्यभार तात्पुरत्या स्वरुपात दिव्यांग कल्याण विभागाच्या दि. 15 एप्रिल, 2025 च्या कार्यालयीन आदेशान्वये सोपविण्यात आला आहे. त्यानुसार जळगाव जिल्हयाकरीता समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद, दिव्यांग कल्याण विभागातील कार्यरत वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता माधुरी भागवत यांच्याकडे "जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी" या पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. “१०० दिवसांचा कृती आराखडा” अंतर्गत हे पाऊल उचलण्यात आले असून, दिव्यांग व्यक्तींसाठी उपयुक्त निर्णय आणि सेवा एका ठिकाणी उपलब्ध होतील.
या कार्यालयाच्या स्थापनेमुळे दिव्यांग व्यक्तींसाठी शैक्षणिक, आर्थिक, आरोग्य, पुनर्वसन व अन्य सवलतींचा लाभ अधिक सुलभपणे मिळणार आहे. विविध शासकीय यंत्रणा आणि समाजकल्याण विभागाच्या समन्वयातून दिव्यांगांसाठी आवश्यक सेवा सुलभ केल्या जाणार आहेत.
धरणगावात ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्राचे शानदार लोकार्पण, लोकार्पण सोहळ्यादरम्यान, माननीय पालकमंत्री श्री. गुलाबराव पाटील यांनी ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधताना बुद्धिबळाच्या खेळाचा आनंद घेतला,
धरणगावात ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्राचे शानदार लोकार्पण






Monday, 28 April 2025
‘वेव्हज परिषद-2025’निमित्त ‘जय महाराष्ट्र’कार्यक्रमात सचिव डॉ. अन्बळगन पी. यांची मुलाखत
मुंबई दि. 28 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’कार्यक्रमात ‘ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट’वेव्हज-2025 परिषदेनिमित्त उद्योग विभागाचे सचिव डॉ. अन्बळगन पी. यांच्या विशेष मुलाखतीचे प्रसारण होणार आहे.
‘जय महाराष्ट्र’कार्यक्रमात ही मुलाखत मंगळवार दि. 29 एप्रिल 2025 रोजी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर रात्री 8.00 वा. तसेच महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांवर खाली दिलेल्या लिंकवरून ही मुलाखत पाहता येणार आहे. निवेदक सुषमा जाधव यांनी ही मुलाखत घेतली आहे.
एक्स- https://twitter.com/MahaDGIPR,
फेसबुक - https://www.facebook.com/
यू ट्यूब - https://www.youtube.co/
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून ‘ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट’म्हणजेच ‘वेव्हज-2025’ चे आयोजन करण्यात आले आहे. ही परिषद 1 ते 4 मे 2025 या कालावधीत जिओ कन्व्हेशन सेंटर, बीकेसी, मुंबई येथे होणार आहे. जगभरातील विविध देशांमधील मनोरंजन आणि निर्मितीशी संबंधित क्षेत्रातील मान्यवर यानिमित्ताने एकत्र येणार आहेत. या परिषदेच्या माध्यमातून भारताच्या सर्जनशील शक्तीला, क्रिएटीव्ह इकॉनॉमीला चालना मिळणार आहे. यानिमित्त होणारे नियोजित कार्यक्रम आणि तयारीबाबत उद्योग विभागाचे सचिव डॉ. अन्बळगन पी. यांनी ‘जय महाराष्ट्र’कार्यक्रमात माहिती दिली आहे.
नाशिक विभागातील पाचही जिल्ह्यांत वर्षभरात तब्बल ५० लाख ६८ हजार अर्ज वेळेत निकाली
लोकसेवा हक्क कायदा, आपली सेवा आमचे कर्तव्य
नाशिक विभागातील पाचही जिल्ह्यांत वर्षभरात तब्बल ५० लाख ६८ हजार अर्ज वेळेत निकाली
आयुक्त चित्रा कुलकर्णी यांची माहिती
‘आपली सेवा- आमचे कर्तव्य’ असे सांगणाऱ्या लोकसेवा हक्क कायद्याच्या अंमलबजावणीस सोमवार २८ एप्रिल २०२५ रोजी दहा वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्त २८ एप्रिल हा दिवस सेवा हक्क दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या दिवशी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या कायद्यांतर्गत नाशिक विभागातील पाचही जिल्ह्यात १ एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत विविध लोकसेवांसाठी एकूण ५५ लाख ४८ हजार ४८५ अर्ज प्राप्त झाले. ५१ लाख ३७ हजार ४७४ अर्ज निकाली काढण्यात आले. त्यापैकी ५० लाख ६८ हजार १३३ अर्ज निश्चित केलेल्या कालमर्यादेत निकाली काढण्यात आले. सेवांसाठी प्राप्त होणाऱ्या अर्जांची संख्या बघता नाशिक विभाग दुसऱ्या क्रमांकावर आहे, अशी माहिती लोकसेवा हक्क आयोगाच्या नाशिक विभागाच्या आयुक्त चित्रा कुलकर्णी यांनी दिली आहे.
नागरिकांना दैनंदिन जीवनात विविध दाखल्यांची आवश्यकता असते. कधी पाल्याच्या शालेय, महाविद्यालयीन प्रवेशासाठी उत्पन्न, अधिवास, नॉन क्रिमिलेअर, राष्ट्रीयत्व, शेतकरी, विवाह नोंदणी, दिव्यांग दाखला, जन्म- मृत्यू नोंद दाखल्यासह विविध दाखल्यांची आवश्यकता असते. त्यासाठी नागरिकांना विविध शासकीय कार्यालयांमध्ये जावे लागत असे. त्यात बराच कालावधी जात असे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांना आवश्यक सेवा ऑनलाइन आणि विहित केलेल्या कालावधीत उपलब्ध व्हाव्यात म्हणून सन २०१५ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम लागू केला. या अधिनियमाची अंमलबजावणी २८ एप्रिल २०१५ पासून सुरू झाली. या कायद्यांतर्गत ‘आपले सरकार’ पोर्टलवर आतापर्यंत ३८ विभागांच्या ९६९ सेवा ऑनलाइन उपलब्ध झाल्या आहेत.
महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायदा हा एक क्रांतिकारी कायदा असून त्यामध्ये अन्य राज्यांच्या तुलनेत विविध वैशिष्ट्ये आहेत. लोकसेवा देताना पारदर्शकता, उत्तरदायीत्व, कालबद्धता, कार्यक्षमता या बाबी साध्य करण्याचा प्रयत्न या कायद्यातून झाला आहे. डिजिटल तंत्रज्ञानाचा उपयोग करून लोकसेवा वितरणामध्ये सक्षमता व पारदर्शकतेच्या संस्कृतीस चालना देण्यावर या कायद्याचा भर राहिला आहे. नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सार्वजनिक सेवांचा दर्जा उंचावणे व त्या विहीत कालावधीत जबाबदारीपूर्वक पुरविल्या जातील याची खात्री करणे या कायद्याचे प्राथमिक उद्दिष्ट आहे. राज्याचे माजी मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव हे विद्यमान मुख्य आयुक्त आहेत.
महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायद्याखाली अधिसूचित करण्यात आलेल्या ऑनलाइन सेवांची अद्ययावत माहिती राज्य शासनाच्या Aaplesarkar.mahaonline.gov.in (आपले सरकार) या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. याशिवाय या संकेतस्थळावर महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगाची माहिती, लोकसेवा हक्क कायदा, नियम व त्याची अंमलबजावणी, वार्षिक अहवाल आदी माहिती उपलब्ध आहे. या संकेतस्थळाचा वापर करताना नागरिकांनी प्रथम वापरकर्ता म्हणून स्वत:ची नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यानंतर आपला जिल्हा निवडून लॉग इन करून घरबसल्या ऑनलाइन अर्ज करून संकेतस्थळावर दर्शविलेल्या सेवा प्राप्त करून घेता येतील. एवढेच नव्हे, तर मोबाईल फोनवर देखील RTS Maharashtra हे ॲप डाऊनलोड करून या सेवा मिळवू शकतो. या कायद्याच्या माध्यमातून नागरिक घराजवळील सेतू केंद्र, आपले सरकार ई सेवा केंद्रावर जाऊन चालकाच्या मदतीने अर्ज दाखल करू शकतात. त्यासाठी शासनाने माफक शुल्क निर्धारित केलेले आहे.
नाशिक विभागातील नाशिकसह, अहिल्यानगर, जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यात महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणीसाठी विभागाच्या आयुक्त श्रीमती कुलकर्णी या वेळोवेळी जिल्ह्यांचा दौरा करतात. या दौऱ्यात त्या अंमलबजावणी अधिकाऱ्यांशी संवाद साधतात. त्यांच्या काही अडचणी असतील तर त्या जाणून घेतात. तसेच या कायद्याच्या माध्यमातून नागरिकांशी जोडले गेलेल्या ई सेवा केंद्र चालकांशी संवाद साधतात. यामुळे नाशिक विभागात या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होताना दिसून येत आहे. महाराष्ट्र लोकसेवा हक्क विभागीय कार्यालय, सिंहगड, शासकीय विश्रामगृह, गोल्फ क्लब मैदानाच्या मागे, नाशिक येथे आहे.
या कायद्यांतर्गत अहिल्यानगर जिल्ह्यात १२ लाख १५ हजार २५, धुळे जिल्ह्यात ६ लाख ७५ हजार १४१, जळगाव जिल्ह्यात ११ लाख ६१ हजार ४२८, नंदुरबार जिल्ह्यात ४ लाख ७७ हजार ९६३, तर नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक १६ लाख ७ हजार ९१७ अर्ज ३१ मार्च २०२५ अखेर निकाली काढण्यात आले असून या पैकी ९९ टक्के अर्ज हे वेळेत निकाली काढण्यात आले आहेत.
राज्य शासनाच्या विविध क्षेत्रीय कार्यालयांमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांबाबत नागरिकांना मोठ्या प्रमाणात माहिती करून देणे, त्यांना राज्य शासनाच्या विविध योजनांचा योग्य लाभ घेता यावा, याबाबत नागरिकांमध्ये जनजागृतीसाठी २८ एप्रिल ते १२ मे २०२५ या कालावधीत सेवा पंधरवडा राबविण्यात येणार आहे. या कालावधीत प्रलंबित सर्व अर्जांचा मोहीम स्वरूपात निपटारा करणे अपेक्षित आहे.
केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांचा 28 ते 1 मे पर्यंतचा जळगाव जिल्हा दौरा
जळगाव दि. 28 ( जिमाका वृत्तसेवा ):- केंद्रीय युवा कल्याण आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांचा दिनांक 28 एप्रिल ते 1 मे 2025 दरम्यान जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा खालील प्रमाणे-
सोमवार, दिनांक 28 एप्रिल, 2025 रोजी सकाळी 06.45 वाजता छत्रपती संभाजीनगर विमानतळावरून मोटारीने मुक्ताईनगरकडे रवाना. 09.45 वाजता मुक्ताईनगर येथे आगमन. रात्री मुक्ताईनगर येथे मुक्काम.
मंगळवार, दिनांक 29 एप्रिल, 2025 रोजी सकाळी 10 ते दुपारी 01 वाजेपर्यंत मुक्ताईनगर येथील निवासस्थानी शासकीय काम. दुपारी 2 ते 4वाजेपर्यंत राखीव. संध्याकाळी 4 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मुक्ताईनगर येथील निवासस्थानी स्थानिक लोकांशी आणि कार्यकर्त्यांशी बैठक. रात्री मुक्ताईनगर येथे मुक्काम.
बुधवार , दिनांक 30 एप्रिल 2025 रोजी सकाळी 10 ते 1 वाजेपर्यंत मुक्ताईनगर येथील निवासस्थानी स्थानिक लोकांशी आणि कार्यकर्त्यांशी बैठक. दुपारी 2 ते 4 वाजेपर्यंत राखीव. संध्याकाळी 4 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मुक्ताईनगर येथील निवासस्थानी शासकीय काम. रात्री मुक्ताईनगर येथे मुक्काम.
गुरुवार, दिनांक 01 मे 2025 रोजी सकाळी 10 ते दुपारी 02 वाजेपर्यंत राखीव. संध्याकाळी 4 वाजता मुक्ताईनगर येथून येथून मोटारीन छत्रपती संभाजीनगरकडे प्रस्थान. रात्री 07.30 वाजता छत्रपती संभाजीनगर येथे आगमन.
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत १८ कोटींहून अधिक रकमेचे विद्यावेतन वितरित
जळगाव दि. 28 ( जिमाका वृत्तसेवा ): मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण (CMYKPY) योजनेंतर्गत १८ कोटी ८८ लाख ७३ हजार ९६६ रुपयांचे विद्यावेतन वितरित करण्यात आले आहे. या योजनेत एकूण ४,९६५ प्रशिक्षणार्थ्यांनी सहभाग घेतला असून २१३ आस्थापनांचा समावेश आहे.
योजनेत ऑगस्ट ते डिसेंबर या महिन्यादरम्यान वितरित करण्यात आलेल्या विद्यावेतनाची माहिती खालीलप्रमाणे आहे:
* ऑगस्ट: ४०६ प्रशिक्षणार्थ्यांना १२,२६,०६४.१२ रुपये.
* सप्टेंबर: ४०३० प्रशिक्षणार्थ्यांना २,२८,१३,४००.५८ रुपये.
* ऑक्टोबर: ४५११ प्रशिक्षणार्थ्यांना ७,०७,८०६.४३ रुपये.
* नोव्हेंबर: ४४२२ प्रशिक्षणार्थ्यांना ४,०९,३४४,००.१ रुपये.
* डिसेंबर: ४३४१ प्रशिक्षणार्थ्यांना ३,९९,०७,६७७.९३ रुपये.
या योजनेमुळे राज्यातील युवकांना प्रशिक्षण मिळण्यास आणि त्यांच्या कौशल्य विकासास मदत होत आहे.
शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) परीक्षा-२०२५
जळगाव दि. 28 ( जिमाका वृत्तसेवा ) महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या तसेच महाराष्ट्र शासनाच्या इतर विभागांच्या शाळांमध्ये पवित्र या संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षक भरती करीता शिक्षक अभियोग्यता व बुब्दीमत्ता चाचणी (TAIT) - २०२५ या परीक्षेचे ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात येत आहे. परीक्षेबाबतची अधिसूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर दिनांक २५ एप्रिल २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. तेव्हा इच्छुक उमेदवारांनी सदर संकेतस्थळास भेट द्यावी, असे आवाहन आयुक्ता अनुराधा ओक यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
जागतिक मधमाशी दिनानिमित्त मधु मित्र पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन
जळगाव दि. 28 ( जिमाका वृत्तसेवा ) जागतिक मधमाशी दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळकडुन लाभ घेतलेल्या यशस्वी मधुपालक/उद्योजक यांना मधु मित्र पुरस्कार देवुन गौरविण्यात येणार आहेत. महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाकडून लाभ घेतलेल्या यशस्वी मधुपालक / उद्योजक यांच्याकडुन दिनांक. ०२ मे २०२५ पर्यंत २ प्रतित अर्ज व फोटो सहित अर्ज मागविण्यात येत आहे.
महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, मुख्य कार्यालय, मुंबई यांचे वतिने मंडळाचे सभापती यांच्या अध्यक्षतेखाली मंडळाचे मध संचालनालय, शासकिय बंगला नं. ५, मु. पो. ता. महाबळेश्वर, जि. सातारा येथे २० मे २०२५ रोजी जागतिक मधमाशी दिनानिमित्त यशस्वी मधुपालक यांना मधु मित्र पुरस्कार देवुन गौरविण्यांत येणार आहेत. तरी यशस्वी मधुपालक यांनी विहित नमुन्यातील अर्ज हा जिल्हा कार्यालय, जळगाव येथे कार्यालयीन वेळेत स. ११ ते ५ वाजेपर्यंत मिळतील. अशी माहिती जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी राजेंद्र एल. चव्हाण यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनात 7 अर्ज प्राप्त
जळगाव दि. 28 ( जिमाका वृत्तसेवा ) समस्याग्रस्त व पिडीत महिलांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे, तसेच त्यांच्या हक्काचे संरक्षण होवून त्यांना न्याय मिळावा या दृष्टीने महिलांच्या तक्रारी / अडचणी यांची शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी व समाजातील पिडीत महिलांना मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून महिला लोकशाही दिन जिल्हा स्तरावर दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी राबविण्यात येतो.
त्यानुषंगाने जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन दिनांक २१ एप्रिल २०२५ सोमवार रोजी सकाळी ११.०० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथे आयोजित करण्यात आला होता. या लोकशाही दिनात सात अर्जदारांचे अर्ज प्राप्त झालेले असून, त्यापैकी 5 अर्ज हे उपनिबंधक कार्यालयाचे, । अर्ज जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे कार्यालय व 1 अर्ज संजय गांधी योजना यांच्या कार्यालयाचे होते. हे अर्ज संबधित कार्यालयाकडे कार्यवाही करण्याकरिता पाठविण्यात आले आहे.
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाच्या दशकपूर्तीनिमित्त 28 एप्रिल रोजी मुंबईत सोहळा
मुंबई, दि. 28 : सामान्य प्रशासन विभाग (प्रशासकीय नावीन्यता, उत्कृष्टता व सुशासन) व महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ च्या अंमलबजावणीची "दशकपूर्ती" आणि "प्रथम सेवा हक्क दिन” निमित्त राज्यस्तरीय सोहळा सोमवार, दि. २८ एप्रिल, २०२५ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
सह्याद्री अतिथीगृह येथे दु. 1.00 वा होणाऱ्या या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार व मुख्य सचिव सुजाता सौनिक उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती राज्य सेवा हक्क आयोगाचे मुख्य आयुक्त मनु कुमार श्रीवास्तव यांनी दिली आहे.
महाराष्ट्र राज्यातील नागरिकांना शासनामार्फत व शासनाचे अधिनस्त सर्व सार्वजनिक प्राधिकरणांमार्फत दिल्या जाणाऱ्या अधिसूचित सेवा पारदर्शक, गतिमान व विहित कालमर्यादेत देण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 पारित करण्यात आला आहे. नागरिकांना सुलभ व कालमर्यादेत सेवा मिळाव्यात हे या अधिनियमाचे उद्दिष्ट आहे.
Friday, 25 April 2025
मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम २०२५-२६ निमित्त 'दिलखुलास' 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात प्रिया खान यांची मुलाखत
मुंबई, दि.25 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील "मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम" २०२५-२६ जाहीर करण्यात आला आहे. या कार्यक्रमांतर्गत शासनासोबत काम करण्यासाठी युवकांना मोठी संधी उपलब्ध होणार असल्याने जास्तीत जास्त तरूणांनी अर्ज सादर करून शासनासोबत काम करण्याचा अनुभव घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री कार्यालयाच्या विशेष कार्य अधिकारी प्रिया खान यांनी 'दिलखुलास' 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात केले आहे.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलास' आणि 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात मुख्यमंत्री कार्यालयाच्या विशेष कार्य अधिकारी प्रिया खान यांच्या मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमाबाबत घेण्यात आलेल्या विशेष मुलाखतीचे प्रसारण करण्यात येणार आहे. ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ही मुलाखत शनिवार दि.26 एप्रिल 2025 रोजी महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांवर रात्री 8.00 वा. खाली दिलेल्या लिंकवरून पाहता येणार आहे. तसेच ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ही मुलाखत मंगळवार दि. 29, बुधवार दि. 30 एप्रिल तसेच गुरूवार दि. 1 मे 2025 रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व ‘न्यूज ऑन एआयआर’या मोबाईल अॅपवर सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे. निवेदक हेमंत बर्वे यांनी ही मुलाखत घेतली आहे.
एक्स- https://twitter.com/MahaDGIPR,
फेसबुक - https://www.facebook.com/
यू ट्यूब - https://www.youtube.co/
राज्यातील तरुणांना प्रशासनासोबत काम करण्याचा अनुभव मिळावा तसेच त्यांच्या ज्ञानाच्या, अनुभवाच्या कक्षा रुंदावण्यास मदत व्हावी यासाठी "मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम" २०२५-२६ जाहीर करण्यात आला आहे. फेलोंच्या निवडीसंदर्भातील निकष, नियुक्ती संदर्भातील अटी व शर्ती तसेच शैक्षणिक संस्थांमार्फत राबविण्यात येणाऱ्या शैक्षणिक कार्यक्रमाची रूपरेषा व अंमलबजावणीबाबत शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे. या मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमासाठी उमेदवारांना दिनांक 5 मे 2025 पर्यंत अर्ज सादर करता येणार आहे. त्याअनुषंगाने मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमाचे निकष, निवड प्रक्रिया, अनुभव आणि अर्ज सादर करण्याच्या एकंदरित प्रक्रियेबाबत 'दिलखुलास' व 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमातून विशेष कार्य अधिकारी श्रीमती खान यांनी माहिती दिली आहे.
अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये प्रवेशाची संधी
जळगाव, दि. 25 ( जिमाका वृत्तसेवा ) : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल यांच्यामार्फत सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी शहरातील नामांकित इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळांमध्ये इयत्ता १ ली मध्ये प्रवेश देण्यात येणार आहेत. जळगाव जिल्ह्यातील इच्छुक विद्यार्थ्यांनी यासाठी २८ एप्रिल, २०२५ ते १५ मे, २०२५ या कालावधीत विहित नमुन्यातील अर्ज कार्यालयीन वेळेत आणि सुट्टीचे दिवस वगळून खालील ठिकाणी जमा करावेत.
अर्ज मिळवण्याचे आणि जमा करण्याचे ठिकाण:
आदिवासी मुलांचे शासकिय वसतीगृह, रावेर , बऱ्हाणपुर रोड, व्ही.एस.नाईक कॉलेज ता.रावेर जि.जळगाव
आदिवासी मुलांचे शासकिय वसतीगृह जुने, महात्मा गांधी कॉलेज कॅम्पस, हॉटेल श्रीनाथ शेजारी, तिरंगा चौक, चोपडा ता. चोपडा जि.जळगाव
आदिवासी मुलांचे शासकिय वसतीगृह, पंचायत समिती जवळ, मुक्ताईनगर ता. मुक्ताईनगर जि.जळगाव
आदिवासी मुलांचे शासकिय वसतीगृह, बोदवड रोड, नायरा पेट्रोल पम्प, जामनेर ता. जामनेर जि.जळगाव
आदिवासी मुलांचे शासकिय वसतीगृह नवीन, कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठ परिसर, बांभोरी जळगाव, जि.जळगाव
आदिवासी मुलांचे शासकिय वसतीगृह चाळीसगाव, सप्तशृंगी नगर, टाकळी प्र.चा., भडगाव रोड, अभिनव शाळेसमोर चाळीसगाव जि.जळगाव
आदिवासी मुलांचे शासकिय वसतीगृह एरंडोल, म्हसावद रोड शासकीय गोदामा जवळ ता. एरंडोल जि.जळगाव
आदिवासी मुलांचे शासकिय वसतीगृह अमळनेर, अमळगाव रोड , रेल्वेगेट जवळ ता. अमळनेर जि.जळगाव
याव्यतिरिक्त, इच्छुक लाभार्थी http.itdp yawal.in या पोर्टलवर ऑनलाइन पद्धतीने देखील अर्ज करू शकतात.
प्रवेशासाठी आवश्यक पात्रता:
इयत्ता १ ली साठी जन्मदाखला ग्रामसेवक , इ. १ ली प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचे वय 31 डिसेंबर 2025 रोजी किमान 6 वर्षे पूर्ण असावे.जन्म दिनांक ०१/07/२०१8 ते ३1/12/२०१9 या दरम्यान झालेला असावा. पालकाचे वार्षिक उत्पन्न १.०० लाख रुपये पेक्षा जास्त नसावे तसेच पालक शासकीय/ निमशासकीय सेवेत नसावे. उत्पन्नाचा दाखला प्रत जोडणे आवश्यक, उत्पन्नाचा दाखला तहसीलदार यांचा सन २०२4-२5, पालकाचे रहिवासी प्रमाणपत्र ,विद्यार्थ्यांचे अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र (सक्षम अधिकाऱ्याने दिलेले) ,दारिद्रयरेषेखालील असेल तर यादीतील अनुक्रमांक नमूद करून ग्रामसेवक यांचा दाखला, महिला पालक विधवा, घटस्फोटित, निराधार, परित्यक्ता असल्यास ग्रामसेवकाचा दाखला , विद्यार्थ्यांचे पासपोर्ट साईज दोन फोटो, विद्यार्थ्यांचे आधारकार्ड छायांकित प्रत निवड केलेल्या विद्यार्थ्याला एकदा शाळा निश्चिती झाल्यानंतर कोणत्याही परिस्थितीत पालकांच्या व पाल्यांच्या विनंतीनुसार शाळा बदलता येणार नाही याबाबत पालकाचे हमीपत्र. अनुसूचित जमातीच्या पालकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रकल्प अधिकारी यांनी केले आहे.
जिल्हा परिषदेचा वार्षिक प्रशासन अहवाल प्रसिद्ध
जळगाव दि. 25 ( जिमाका वृत्तसेवा ) - महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या (वार्षिक प्रशासन अहवाल) नियम 1964 मधील नियम 9 अन्वये जळगाव जिल्हा परिषदेचा सन 2023-24 चा वार्षिक प्रशासन अहवाल जिल्हा परिषद ठराव क्रमांक 751 दिनांक 30 सप्टेंबर 2024 रोजी मंजूर करण्यात आला अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी दिली आहे
जळगाव जिल्हा क्रीडा विभागातर्फे उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन
वेव्हज् : मनोरंजनाच्या सर्वसमावेशक चळवळीची नांदी
भारत हा मनोरंजन आणि माध्यम उद्योगामध्ये आघाडीचा देश मानला जातो. डिजिटल प्रसारण सेवा, प्रादेशिक भाषांमधील आशय निर्मिती आणि वाढत्या तंत्रज्ञानस्नेही प्रेक्षकवर्गामुळे या क्षेत्रात झपाट्याने प्रगती होत आहे. या पार्श्वभूमीवर भारत सरकारतर्फे मुंबईत १ ते ४ मे २०२५ या काळात 'वेव्हज् शिखर परिषद' आयोजित केली जात आहे. ही परिषद भारताच्या जागतिक पातळीवरील वाढत्या महत्त्वाचे प्रतिबिंब ठरणार आहे.
वेव्हज् बाजार – डिजिटल मनोरंजनासाठीचे क्रांतिकारक व्यासपीठ
या शिखर परिषदेचा एक प्रमुख घटक म्हणजे 'वेव्हज् बाजार' – एक अभिनव, ऑनलाइन व्यासपीठ, जे मनोरंजन आणि माध्यम क्षेत्रातील विक्रेते, खरेदीदार, कलाकार, निर्माते, वितरक, गुंतवणूकदार यांना एकत्र आणते. या बाजारात आजवर सुमारे ५५०० खरेदीदार, २००० हून अधिक विक्रेते आणि १००० प्रकल्पांची नोंदणी झाली आहे. वेव्हज् बाजाराला माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रातील 'दावोस' बनवण्याचा उद्देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडला आहे.
संधींचा महासागर
या व्यासपीठावर एखादा दिग्दर्शक निर्मिती भागीदार शोधू शकतो, एखादा गेम डेव्हलपर गुंतवणूकदाराशी संपर्क साधू शकतो, तर एखादा कलाकार आपली कलाकृती जागतिक प्रेक्षकांसमोर सादर करू शकतो. ही संधी फक्त ऑनलाइन सादरीकरणापुरती मर्यादित नसून, लाइव्ह स्क्रीनिंग्स, बी2बी बैठका, वेबिनार्स, आणि गुंतवणूकदारांशी थेट संवाद अशा अनेक स्तरांवर संवाद साधता येतो.
तंत्रज्ञानाचा वापर आणि प्रोफाइलिंगची नवी दिशा
कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून प्रत्येक सहभागीचे प्रोफाइलिंग, जुळवणूक, त्याच्या गरजांनुसार संधींचा शोध हे या बाजारपेठेचे खास वैशिष्ट्य आहे. अशा प्रकारे, हे व्यासपीठ केवळ संपर्काचे नाही, तर परिणामकारक व्यावसायिक व्यवहार घडवणारे केंद्र बनले आहे.
सर्जनशीलतेला चालना देणारा मंच
चित्रपट, दूरचित्रवाणी, संगीत, गेमिंग, अॅनिमेशन, जाहिरात, वर्धित वास्तव (XR), आभासी वास्तव (VR), पॉडकास्टिंग, वितरण, लायसन्सिंग अशा विविध क्षेत्रांतील सहभागींना येथे संवाद, सादरीकरण आणि भागीदारीसाठी एकत्र आणले जाते. पारंपरिक मर्यादांच्या पलीकडे जाऊन हे व्यासपीठ जागतिक संधी उपलब्ध करून देते.
"वेव्हज् मनोरंजन परिषद २०२५" – भारताचा 'लगान' क्षण
माझ्या मते, 'वेव्हज्' ही फक्त परिषद नाही, तर एक चळवळ आहे. एक कलाकार म्हणून मी कायमच सर्जनशीलतेच्या, प्रेरणादायी विचारांच्या आणि चौकटीबाहेर जाणाऱ्या संधींचा शोध घेत आलो आहे. 'वेव्हज्' ही त्या शोधाची पूर्तता करणारी वाट आहे. ही परिषद केवळ भारतापुरती मर्यादित न राहता, जागतिक स्तरावर भारतीय दृष्टिकोनाचा प्रभाव पाडेल. ही भारतासाठीचा 'लगान' क्षण आहे – धैर्य, दृष्टिकोन आणि एकतेचा उत्सव, ज्याचा प्रतिध्वनी जगभरात ऐकू येत राहील.
जळगाव जिल्ह्यात राष्ट्रीय लोक अदालतीचे १० मे रोजी आयोजन
जळगाव दि. 25 ( जिमाका वृत्तसेवा ) : वर्षानुवर्षे प्रलंबित राहिलेल्या प्रकरणांमध्ये जलदगतीने तोडगा काढण्यासाठी तसेच सामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार देशभरात राष्ट्रीय लोकअदालतांचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार जळगाव जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये दिनांक १० मे २०२५ रोजी राष्ट्रीय लोकअदालत आयोजित करण्यात येणार आहे.
या लोकअदालतीमध्ये नागरी वाद, मोटार अपघात प्रकरणे, बँक वसुली प्रकरणे, मजुरी दावे, दिवाणी प्रकरणे, न्यायालयीन प्रक्रियेत असलेले थकबाकीचे प्रकरणे तसेच इतर तडजोडीयोग्य प्रकरणे सोडविण्यात येणार आहेत. न्यायालयीन प्रक्रियेतील विलंब टाळण्यासाठी आणि प्रकरणांचा जलदगतीने निपटारा करण्यासाठी नागरिकांनी आपल्या प्रकरणांचा राष्ट्रीय लोकअदालतीत सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने केले आहे.
या लोकअदालतीमध्ये प्रकरणे सोडवण्यासाठी तडजोडीला महत्त्व दिले जाईल. ज्या पक्षकारांना तडजोडीने आपली प्रकरणे निकाली काढायचे असतील अशा संबधित सर्व पक्षकार व त्यांचे विधीज्ञ यांनी उपस्थित राहुन तडजोडीने आपआपले खटले निकाली काढावे. तसेच ऐनवेळी ज्या पक्षकारांना आपले खटले तडजोडीने निकाली काढण्यासाठी ठेवावयाचे असतील त्यांना सुध्दा ऐनवेळी खटले निकाली काढण्याची संधी देण्यांत आलेली आहे. तरी या संधीचा फायदा घ्यावा व जास्तीत जास्त खटले १० मे रोजीच्या राष्ट्रीय लोक अदालतीत सामोपचाराने निकाली करुन घ्यावे असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगाव तर्फे करण्यात आलेले आहे.
Thursday, 24 April 2025
गोंदिया जिल्ह्यातील डव्वा/स ग्रामपंचायत राष्ट्रीय पंचायत पुरस्काराने सन्मानित
हवामान कृती विशेष पुरस्कारात अव्वल
नवी दिल्ली 24: राष्ट्रीय पंचायत राज दिनानिमित्त देशातील विविध ग्रामपंचायतींना व तसेच संस्थांना केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. या पुरस्कारांमध्ये राज्यातील गोंदिया जिल्ह्याच्या डव्वा/स ग्रामपंचायतीला हवामान कृती विशेष पंचायत पुरस्कार(CASPA) वर्ष 2023-24 साठी पंतप्रधान यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
राष्ट्रीय पंचायत राज दिन-2025 निमित्त मधुबनी, बिहार येथे पंचायती राज मंत्रालयाकडून हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या पुरस्कार सोह्यात प्रथमच हवामान कृती विशेष पंचायत पुरस्कार (CASPA), आत्मनिर्भर पंचायत विशेष पुरस्कार (ANPSA) आणि पंचायत क्षमता निर्माण सर्वोत्तम संस्था पुरस्कार (PKNSSP) या श्रेणींमध्ये पुरस्कार प्रदान करण्यात आले. हवामान कृती विशेष पंचायत पुरस्कार श्रेणीत गोंदिया जिल्ह्यातील डव्वा/स ग्रामपंचायती उत्कृष्ट कामगिरी केली असून, सर्वोत्तम स्थान मिळवले आहे. हा पुरस्कार ग्रामपंचायतच्या सरपंच योगेश्वरी चौधरी यांनी पंतप्रधानांच्या हस्ते स्वीकारला. पुरस्काराचे स्वरुप 1 कोटी रुपये रोख पारितोषिक, मानचिन्ह आणि प्रमाणपत्र असे आहे.
हवामान बदलावर मात करणारी डव्वा/स ग्रामपंचायत ठरली देशात आदर्श
गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील डव्वा/स ग्रामपंचायतीने हवामान कृती विशेष पंचायत पुरस्कार (CASPA) मध्ये प्रथम क्रमांक पटकावून राज्याचाच नव्हे तर देशाचा गौरव वाढवला आहे. पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासाच्या दिशेने प्रभावी पावले उचलत हवामान बदल विरुद्ध त्यांनी प्रभावीरित्या राबवलेल्या उपाययोजना राष्ट्रीय पातळीवर आदर्श ठरल्या आहेत.
डव्वा/स ग्रामपंचायतीने विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांद्वारे गावात पर्यावरणपूरक जीवनशैली रुजवली आहे. गावातील प्रत्येक घरात सौर ऊर्जेचा वापर वाढावा यासाठी विशेष प्रोत्साहन देण्यात आले असून, प्लास्टिक व फटाक्यांवर संपूर्ण बंदी लागू करण्यात आली आहे. यामुळे गावाचा कार्बन फूटप्रिंट लक्षणीयरित्या कमी झाला आहे.
निसर्गातील पंचतत्त्वांचे – पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश – संवर्धन करण्यासाठी जैवविविधता जपणारे उपक्रम प्रभावीपणे राबविले गेले. ग्रामपंचायतीच्या या यशामागे सरपंच योगेश्वरी चौधरी आणि ग्रामपंचायत अधिकारी सिंधू सूर्यवंशी यांचे नेतृत्व महत्त्वाचे ठरले आहे. गावकऱ्यांनी एकजुटीने या उपक्रमांमध्ये सहभाग घेत पर्यावरण संरक्षणाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. या सर्व उपक्रमांची दखल घेत 11 एप्रिल 2025 रोजी भारत सरकारच्या निरीक्षण पथकाने –श्रीमती अनुराधा आणि श्रीमती नीलिमा गोएल यांनी डव्वा/स ग्रामपंचायतीची पाहणी केली. त्यांनी ग्रामपंचायतीच्या कार्याचे मन:पूर्वक कौतुक करत, अन्य गावांसाठी हे एक उत्तम उदाहरण असल्याचे ही मत व्यक्त केले.
इतर पुरस्कार विजेते
CASPA अंतर्गत दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार कर्नाटक राज्यातील हसन जिल्ह्यातील बिरदहल्ली ग्रामपंचायतीने मिळवला असून त्यांना 75 लाख रुपयांचे पारितोषिक मिळाले आहे. तर तिसरा क्रमांक बिहारमधील समस्तीपूर जिल्ह्यातील मोतीपूर ग्रामपंचायतीला मिळाला असून त्यांना 50 लाख रुपयांनी सन्मानित करण्यात आले आहे.
यासोबतआत्मनिर्भर पंचायत विशेष पुरस्कार (ANPSA) अंतर्गत तेलंगणाच्या रंगारेड्डी जिल्ह्यातील मल ग्रामपंचायतीने प्रथम क्रमांक पटकावून 1 कोटी रुपयांचे पारितोषिक मिळवले. ओडिशाच्या मयूरभंज जिल्ह्यातील हातबदरा ग्रामपंचायतीने दुसरा क्रमांक मिळवत 75 लाख रुपयांचा पुरस्कार पटकावला, तर आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्यातील गोल्लापुडी ग्रामपंचायतीला तिसरा क्रमांक मिळाला असून त्यांना 50 लाख रुपयांचा पुरस्कार मिळाला आहे.
पंचायत क्षमता निर्माण सर्वोत्तम संस्था पुरस्कार (PKNSSP) अंतर्गतही उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या संस्थांचा यावेळी गौरव करण्यात आला. या श्रेणीत प्रथम क्रमांक केरळ इन्स्टिट्यूट ऑफ लोकल ॲडमिनिस्ट्रेशन (KILA), केरळ यांना देण्यात आला असून त्यांनी 1 कोटी रुपयांचे पारितोषिक पटकावले. दुसरा क्रमांक ओडिशातील राज्य ग्रामीण विकास आणि पंचायती राज संस्थेला मिळाला असून त्यांना 75 लाख रुपयांचा पुरस्कार प्राप्त झाला. तिसऱ्या क्रमांकावर आसाममधील राज्य पंचायत आणि ग्रामीण विकास संस्था असून त्यांना 50 लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात आले.
प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारांसाठी अर्ज करण्याचे आवाहन; अंतिम तारीख ३१ जुलै २०२५
जळगाव, दि. 24 ( जिमाका ) - केंद्र शासनाच्या महिला व बालविकास मंत्रालयाद्वारे दिला जाणारा प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2025 करिता अर्ज मागविण्यात येत आहेत. 5 वर्षापेक्षा अधिक व 18 वर्षापर्यंतच्या शिक्षण, कला, सांस्कृतीक कार्य, खेळ नाविन्यपुर्ण शोध, सामाजिक कार्य व शौर्य अशा क्षेत्रात विशेष नैपुण्यपूर्ण कामगिरी करणाऱ्यांना हा पुरस्कार दिला जातो.
या पुरस्कारांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, इच्छुक उमेदवार ३१ जुलै २०२५ पर्यंत https://awards.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर आपले अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करायचे आहेत.
ज्या मुलांचे वय 5 वर्षापेक्षा अधिक व 31 जुलै 2025 रोजी 18 वर्षापेक्षा कमी आहे व ज्या मुलांनी शिक्षण, कला, सांस्कृतीक, कार्य खेळ नाविन्यपुर्ण शोध, सामाजिक कार्य व शौर्य अशा क्षेत्रात विशेष नैपुण्यपुर्ण कामगिरी केलेली आहे त्यांचे प्रस्ताव या संकेतस्थळावर स्वतः मुले किंवा त्यांच्या वतीने राज्य सरकार, केंद्रशासित प्रदेश, जिल्हाधिकारी जिल्हादंडाधिकारी, पंचायत राज्य संस्था, नागरी स्वराज्य संस्था, शैक्षणिक संस्था इ. अर्ज करु शकतात. ऑनलाईन अर्ज दिनांक 01 एप्रिल 2025 पासून ते दिनांक 31 जुलै 2025 पर्यंत स्विकारण्यात येणार आहे.
जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी रफिक हुरमत रुबाब तडवी यांनी जिल्ह्यातील अशा प्रकारच्या जास्तीत जास्त मुलांचे प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन केले आहे.
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा 24 एप्रिल रोजीचा जळगाव जिल्हा दौरा
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा 24 एप्रिल रोजीचा जळगाव जिल्हा दौरा
जळगाव दि. 24 ( जिमाका ) - राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री, गुलाबराव पाटील यांचा जळगाव जिल्ह्यातील नियोजित दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
गुरूवार, दिनांक 24 एप्रिल, 2025, रात्री 08.40 जळगाव रेल्वे स्थानकावर आगमन. रात्री 08.50 वाजता जळगाव येथून शासकीय वाहनाने धरणगाव जि. जळगाव कडे प्रयाण. रात्री 09.20 वाजता पाळधी ता. धरणगांव जि. जळगांव येथे आगमन व राखीव
अंबरनाथकरांना शाश्वत व स्वच्छ पाणी देण्यासाठी नियोजन करावे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील
मुंबई, दि. 24 : अंबरनाथकरांना शाश्वत व स्वच्छ पाणी पुरवठा देण्यासाठी तसेच पाणी पुरवठा सुधारण्यासाठी योजना तयार असून, त्याच्या अंमलबजावणीला गती देवून सर्वांना सारख्या प्रमाणात पाणी उपलब्ध होईल असे नियोजन करावे, अशा सूचना पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिल्या.
वेव्हज परिषद-2025’ निमित्त 'दिलखुलास' कार्यक्रमात सचिव डॉ. अन्बळगन पी. यांची मुलाखत
जळगावातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात CPF प्रशिक्षण शिबिराचे आयोजन
जळगाव, दि. 24(जिमका) : जळगाव येथील महिला व बाल रुग्णालय मोहाडी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मध्ये रुग्णालयातील कर्मचाऱ्यांसाठी एक दिवसीय हृदय व फुफ्फुसाचे पुनर्जीवन (CPF) कौशल्यचे प्रशिक्षण शिबिर यशस्वीरित्या पार पडले. वाढत्या हृदयविकाराच्या घटना आणि इतर आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना त्वरित वैद्यकीय मदत पुरवण्यासाठी हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.
या शिबिरात रुग्णालयातील डॉक्टर आणि तज्ञांच्या टीमने कर्मचाऱ्यांना हृदयविकाराचा झटका आल्यास त्वरित प्रथमोपचार कसा करावा (सीपीआर - कार्डिओ पल्मोनरी रिससिटेशन) आणि Hands-on CPR देण्याची प्रात्यक्षिक माहिती दिली. अचानक हृदयविकार, बुडणे, गुदमरल्यामुळे, विजेचा धक्का, औषधांचा अतीवापर यामुळे झालेल्या दुष्परिणामा करिता CPR दिले जाते. प्रशिक्षणामध्ये कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष सहभाग घेऊन या महत्वाच्या वैद्यकीय प्रक्रियेचे प्रशिक्षण घेतले.
या प्रशिक्षण शिबिरात डॉ. व्ही. आर. पाटील, डॉ. एम. डी. शिरसाठ, डॉ. किशोर इंगळे, डॉ. अविनाश पाटील, डॉ. प्रशांत इंगळे, डॉ. सुनील पाटील, डॉ. महेंद्र राजपूत, डॉ. धीरज जाधव, डॉ. संदीप पाटील, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी, सिस्टर इंचार्ज, तसेच सीपीआरमधील परिचारिका, वॉर्ड बॉय आणि इतर कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
वैद्यकीय अधीक्षक डॉ. किरण बळीराम सोनवणे यांनी सर्व प्रशिक्षक प्रशिक्षणार्थी यांचे आभार मानले. ISA व ISCCM ह्या संस्थांनी यात पुढाकार घेऊन आम्हाला डमी बाहुला (mannequin) ची उपलब्धता करून दिली व प्रशिक्षण वर्ग उपलब्धते बाबत देखील डॉ. किरण बळीराम सोनवणे यांनी आभार मानले.
Wednesday, 23 April 2025
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 'आपलं मंत्रालय' गृहपत्रिकेचे प्रकाशन
मुंबई, दि. २३ : महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे प्रकाशित होणाऱ्या ‘आपलं मंत्रालय’ या गृहपत्रिकेच्या अंकाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. मंत्रालयात बैठकीत हा प्रकाशन समारंभ झाला.
यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, मुख्य सचिव सुजाता सौनिक, प्रधान सचिव तथा माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक ब्रिजेश सिंह, सामान्य प्रशासन विभागाच्या उपसचिव (मावज) समृद्धी अनगोळकर, सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव (मावज) अजय भोसले, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक हेमराज बागुल, डॉ.गणेश मुळे आदी मान्यवर उपस्थित होते.
'आपलं मंत्रालय' गृहपत्रिकेच्या अंकामध्ये मंत्रालयातील विविध विभागाचे अधिकारी-कर्मचारी यांच्या कथा, कविता, स्वानुभव तसेच पाककला, भ्रमंती या विषयीचे लेख समाविष्ट करण्यात आले आहेत.
हा अंक https://online.publuu.com/