Monday, 9 February 2015

जिल्ह्यात आजपासून घरोघरी जंतनाशक गोळ्यांचे वाटप

जिल्ह्यात आजपासून घरोघरी
जंतनाशक गोळ्यांचे वाटप

जळगाव, दि.9- राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेनिमित्त जंत उच्चाटन कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. त्या अंतर्गत जिल्ह्यात 10 ते 13 फेब्रुवारी या कालावधीत घरोघरी जंत नाशक गोळ्यांचे वाटप केले जाणार आहे. राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त ही मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत घरोघरी गोळ्यांचे वाटप केले जाईल अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव यांनी दिली आहे.


* * * * * * * * * *

No comments:

Post a Comment