Wednesday, 4 February 2015

कायदे विषयक शिबीरांच्या जनजागृतीसाठी मोबाईल व्हॅन व्दारे प्रचार फेरी

कायदे विषयक शिबीरांच्या जनजागृतीसाठी
मोबाईल व्हॅन व्दारे प्रचार फेरी

चाळीसगांव,दिनांक 4:- जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगांव यांच्या आदेशान्वये  कायदे विषयक शिबीरांचे आयोजनासाठी  तालुकाविधी सेवा समिती, चाळीसगाव तर्फे ग्रामीण भागात जनजागृती करण्यासाठी मोबाईल व्हॅन व्दारे प्रचार फेरींचे आयोजन करण्यात आले आहे. सदर मोबाईल व्हॅन ही गुरूवार  दिनांक 5 फेब्रुवारी, 2015 रोजी तालुक्यातील  भऊर, जामदा, बहाळ, खेडगांव, पोहरे, कळमडू, कुंझर व दहिवद या ठिकाणी  तर शुक्रवार दिनांक 06 फेब्रुवारी, 2015 रोजी  पातोंडा, बोरखेडे खुर्द, वाघळी, डांबरून, वडाळा वडाळी, हिंगोणे सीम व भांमरे बु या ठिकाणी फिरणार आहे. सदर जनजागृती मोहिम यशस्वी करण्यासाठी संबंधित गावाचे ग्रामविस्तार अधिकारी, अंगणवाडी सेविका, केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक, वरील गावातील सर्व ग्रामसेवक यांनी सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करुन उपस्थित राहण्याचे आवाहन सहाय्यक गट विकास अधिकारी  सुरेश नरवाडे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे तर वरील गावातील सर्व सरपंच व गावक-यांनी मोठया प्रमाणात सहभाग नोंदवून या मोहिमेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.


* * * * * * * *

No comments:

Post a Comment