न्हावे येथील जवान अर्जुन पिलोरे
यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
चाळीसगांव, दिनांक 17 :- तालुक्यातील न्हावे येथील रहिवासी अर्जुन
आनंदा पिलोरे हे हवालदार वायरलेस ऑपरेटर या पदावर आर्मी सेवेत कार्यरत होते
त्यांचा दिनांक 15 फेब्रुवारी, 2015 रोजी सकाळी 06:45 वाजता ऱ्हदयविकाराच्या तिव्र
झटक्याने मृत्यु झाला असून त्यांच्यावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात
आले. यावेळी आमदार उन्मेश पाटील, तहसिलदार बाबासाहेब गाढवे, पोलीस निरीक्षक संजय
देशमुख, गट विकास अधिकारी मालती जाधव, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती
आर.एल.पाटील, माजी पंचायत समिती सभापती संजय पाटील, शशीकांत साळुंखे, दिनेश बोरसे
यांच्यासह न्हावे गावचे सरपंच श्रीमती दिपाली देवरे व पंचक्रोशीतील गावकरी मोठया
संख्येने उपस्थित होते.
यावेळी
आमदार उन्मेश पाटील शोकसंदेश देतांना म्हणाले की विर जवान अर्जुन पिलोरेच्या
अंत्यसंस्कारात एकीकडे अभिमान वाटतो तर दुसरीकडे दु:खही होते. चाळीसगांव
तालुक्याने भारतीय सेनेला मोठे योगदान दिले आहे. त्यामुळे अशा विर जवानांचा अभिमान
बाळगून देशसेवेसाठी तरुणांनी उत्साही राहण्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
विर
जवान अर्जुन पिलोरे यांची मुलगी कु रेश्मा हिच्या हातुन अग्निडाग देण्यात आला तर भुसावळ
येथुन आलेले लेफ्टनन कर्नल परमार व रजत कुमार साका यांच्या पथकाने सलामी दिली. पोलीस प्रशासनाच्या वतीने हवेत तीन फैरी झाडून
विर जवान अर्जुन पिलोरे यास अखेरची मानवंदना दिली. यावेळी आमदार उन्मेश पाटील,
तहसिलदार बाबासाहेब गाढवे, शशिकांत साळुंखे, गटविकास अधिकारी मालती जाधव,
आर.एल.पाटील पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी पुष्पचक्र अर्पण करुन श्रध्दांजली
वाहिली. तर गावातील प्रतिष्ठीत नागरिकांनी पुष्प गुच्छ वाहून दोन मिनीटे एका
जागेवर स्तब्ध उभे राहून श्रध्दांजली अर्पण केली.
विर
जवान अर्जुन पिलोरे यांचा सेवेतील सहकारी माधव देवरे यांनी शोकसंदेशात सांगितले
की, विर जवान अर्जुन पिलोरे यांना जम्मु
कश्मिर सेवा पुरस्कार, आसाम नागालँण्ड सेवा पुरस्कार, गुड सेवा पुरस्कार, दिर्घ
सेवा पुरस्कार अशा चार प्रकाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. भारतीय
सेनेतील दुरसंचार विभागात ऑपरेटर म्हणून दिनांक 28 फेब्रुवारी, 1996 रोजी दाखल
झालेल्या अर्जुनने अभ्यास करुन परिक्षा उत्तीर्ण होत हवालदार पदापर्यंतची पदोन्नती
प्राप्त केली होती आणि वरिष्ठ पदावर पोहचल्याने त्यांचा सेवाकालावधी देखील
वाढविण्यात आला होता. आदर्श घेण्यासारखा आमचा सहकारी गेल्याचे दु:ख व्यक्त करतांना
त्यांनी वरील बाबी आपल्या शोकसंदेशाव्दारे व्यक्त केल्या.
विर
जवान अर्जुन पिलोरे यांच्या पश्चात पत्नी
रत्नाबाई अर्जुन पिलोरे वय 30, मुलगी
रेश्मा अर्जुन पिलोरे वय 8 व भाऊ
रामदास आनंदा पिलोरे वय 45 असा परिवार आहे.
* * * * * * * *
No comments:
Post a Comment