जलयुक्त शिवार मोहिमेचा लोकसहभागाव्दारे शुभारंभ
चाळीसगांव,दिनांक 16:- तालुक्यातील सोनगांव येथे आज
जलयुक्त शिवार मोहिमेचा लोकसहभागाव्दारे प्रातांधिकारी मनोज घोडे पाटील यांच्या
हस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी सरपंच रामेश्वर पाटील, तहसिलदार बाबासाहेब
गाढवे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी रविंद्र जाधव, मंडळ अधिकारी ए.बी.जाधव, तलाठी
डी.एन.पाटील, पोलीस पाटील देशमुख, कृषी सहाय्यक पाटील व सुर्यवंशी, ग्रामसेवक भावना
पाटील यांच्यासह गावातील प्रतिष्ठीत नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
चाळीसगांव तालुक्यातील एकूण 24 गावांची निवड ही
जलयुक्त शिवार अभियानात करण्यात आली असून यामध्ये लोंजे, शेवरी, डोणदिगर, टाकळी
प्र.चा, ओझर, खरजई, वाकडी, रोकडे, शिरसगांव, टाकळी प्र.दे, तळोंदे प्र.दे, म्हाळशेवगे,
डामरूण, वडाळा-वडाळी, पिंप्री खु, परशराम नगर, रांजणगांव, सांगवी, खेर्डे, सोनगांव,
आंबेहोळ, तळोंदे प्र.चा, बोढरे, भोरस बु. या गावांचा समावेश करण्यात आलेला आहे.
तालुक्यातील सोनगांव येथील नाल्यातील गाळ काढण्यासाठी
लोकसहभागातून आज सुरवात करण्यात आली त्यावेळी प्रांताधिकारी मनोज घोडे पाटील यांनी
जलयुक्त शिवार अभियानात कोणकोणती कामे करता येतील याबाबत सविस्तर मार्गदर्शन
करतांना म्हणाले की, शासनामार्फत राबविण्यात येणारी जलयुक्त शिवार अभियान ही मोहिम
यशस्वीपणे राबविण्यासाठी लोकसहभाग महत्वाचा असून आपले गाव कायमस्वरुपी टंचाईमुक्त
करण्यासाठी यात सर्वांचा सहभाग आवश्यक आहे. विहीरींचे पुर्नभरण, गावातील पाणीसाठे
वाढविणे, जलव्यवस्थापन या सारख्या मुलभूत गोष्टींमुळे गाव टंचाईमुक्त होऊ शकते.
तरी गावातील प्रतिष्ठीत नागरिकांनी गावातील
विकासाला चालना देण्यासाठी एकत्र येण्याची गरज आहे.
यावेळी प्रांताधिकारी मनोज घोडे पाटील यांनी केवळ
जलयुक्त शिवार मोहिमेतील गावांनीच नव्हे तर प्रत्येक गावातील लोकांनी आपल्या
गावातील पाणी साठयांमधील गाळ काढून आपल्या शेतात टाकण्याचे आवाहन केले. यामध्ये
पाणी साठयात वाढ होऊन शेतीची पोत सुधारण्यास मदत होईल. यासाठी सर्व गावक-यांना गाळ
उपसण्याचे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.
या कार्यक्रमास उपस्थित सरपंच रामेश्वर पाटील
यांनी सर्व ग्रामस्थांच्या वतीने जलयुक्त शिवार अभियानातील प्रत्येक योजना यशस्वी
करण्याचे व गाव टंचाईमुक्त करण्यासाठी सहभाग देण्याचे गावक-यांतर्फे आश्वासन दिले.
* * * * * * * * *
No comments:
Post a Comment