Saturday, 7 February 2015

आदर्श आश्रमशाळा प्रवेश परीक्षेसाठी स्पर्धा परीक्षा 21 फेब्रुवारी पर्यंत अर्ज सादर करावेत

आदर्श आश्रमशाळा प्रवेश परीक्षेसाठी स्पर्धा परीक्षा
21 फेब्रुवारी पर्यंत अर्ज सादर करावेत

            जळगाव, दिनांक 7 :- आदिवासी विकास विभाग, नाशिक विभागांतर्गत आदर्श आश्रमशाळा, देवमोगरा ता. नवापूर, जि. नंदुरबार येथे सन 2015-16 या शैक्षणिक वर्षात इयत्ता 5 वी मध्ये प्रवेशासाठी अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांच्या स्पर्धा परीक्षा दिनांक 5 एप्रिल रोजी सकाळी 11.00 ते 12.30 या वेळेत होणार आहे. या स्पर्धा परीक्षेसाठी प्रविष्ठ होऊ इच्छिणा-या विद्यार्थ्यांकडून त्यांच्या मुख्याध्यापकांमार्फत 21 फेब्रुवारी पर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत.
सन 2014-15 या शैक्षणिक वर्षामध्ये इयत्ता 4 थीच्या वर्गात शिकत असलेल्या आदिवासी विद्यार्थ्याकरिता या स्पर्धा परीक्षा होणार आहेत. या परीक्षा जळगाव जिल्ह्यात शासकीय आश्रमशाळा, गंगापूरी ता. जामनेर व शासकीय आश्रमशाळा, दहिवद ता. अमळनेर या दोन केंद्रावर होणार आहेत. इच्छूक विद्यार्थ्यांनी आपले अर्ज आपल्या शाळेतील मुख्याध्यापकांमार्फत प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल यांचेकडे दिनांक 21 फेब्रुवारी पर्यंत अर्ज करावेत. सदर परीक्षा शासकीय आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळा, जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेत असलेले इयत्ता 4 थीत शिकत असलेल्या अनु. जमातीच्या विद्यार्थ्यांकरीता पूर्णत: खुली आहे. सदर परीक्षा पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा धर्तीवर आधारीत आहे. विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक कमाल उत्पन्न एक लाख आठ हजाराच्या आत असावे. तरी इच्छूक विद्यार्थ्यांच्या पालकांनी प्रवेश परीक्षेचा अर्ज, गटशिक्षण अधिकारी, पंचायत समितीच्या किंवा एकात्मिक आदिवासी विकास प्रकलप यावल कार्यालयातून उपलब्ध करुन घ्यावा, असे आवाहन प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल यांनी केले आहे.

                                                                            
* * * * * * * * * * *

No comments:

Post a Comment