ना.एकनाथराव
खडसेंनी केली
महिला
रुग्णालयाच्या जागेची पाहणी
जळगाव, दि.28- जळगाव शहरानजिक मोहाडी शिवारात नियोजित महिला
रुग्णालयासाठी जिल्हाप्रशासनाने निर्धारित केलेल्या जागेची आज राज्याचे महसूल, कृषी,
उत्पादन शुल्क, पशुसंवर्धन, मत्स्यव्यवसाय, अल्पसंख्यांक व औकाफमंत्री ना.
एकनाथराव खडसे यांनी प्रत्यक्ष पाहणी केली.
मोहाडी शिवारात मोहाडी व शिरसोली रस्त्याच्या दरम्यान
असलेल्या या जागेस ना. खडसे यांनी आज प्रत्यक्ष भेट दिली. जागेवर नकाशानुसार पाहणी करुन याठिकाणी रुग्णालय उभारल्यास
येण्या जाण्यासाठी रस्त्याबाबत त्यांनी चर्चा केली. यावेळी त्यांचे समवेत
जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल, प्रांताधिकारी अभिजीत भांडे, तहसिलदार गोविंद शिंदे
आदी उपस्थित होते.
जळगाव शहरासह परिसरासाठी शासनाने महिला व नवजात
शिशुंसाठी 100 खाटांच्या रुग्णालयास
मंजूरी दिली आहे. या रुग्णालयासाठी मोहाडी परिसरातील गट नं 20 मधील 6 एकर जागा जिल्हा प्रशासनाने
निश्चित केली आहे. रुग्णालय उभारणीसाठी 40
कोटी रुपयांच्या निधीची तरतूदही आगामी अर्थसंकल्पात करण्यात येणार आहे. या
जागेच्या मंजूरीसाठी जिल्हा प्रशासनाने शासनाकडे प्रस्ताव पाठविला आहे. पाच एकर
पेक्षा अधिक क्षेत्र असल्यास शासनाकडून मंजूरी घेणे आवश्यक असते, त्यासाठी ना. खडसे यांनी जागेची पाहणी केली. शासनाने जागा मंजूरी दिल्यानंतर ही जागा
रुग्णालयासाठी प्राप्त होईल. त्यासाठी पाठपुरावा करण्याचे ना.खडसे यांनी आश्वासन
दिले.
* * * * * * * * *
No comments:
Post a Comment