नैसर्गिंक आपत्तीमुळे मयत शेतक-यास
आमदार पाटील यांच्या हस्ते धनादेश वितरीत
चाळीसगांव,दिनांक 15:-
चाळीसगांव तालुक्यातील मौजे तळोंदे प्र.दे. येथील शेतकरी श्री.चरणदास ठमा राठोड वय 49 हे दुपारच्या वेळी
शेतात काम करित असतांना झालेल्या अवकाळी पावसात त्यांच्यावर विज पडून
दुर्देवी मृत्यु झाला होता. कै.चरणदास
राठोड यांचा नैसर्गिक आपत्तीमुळे मृत्यु झाल्याने शासन स्तरावरुन त्यांच्या
वारसांचा मदत म्हणून त्यांची वारस पत्नि
श्रीमती धावरीबाई चरणदास राठोड
राहणार तळोंदे यांना आमदार उन्मेश पाटील यांच्या हस्ते रुपये एक लाख पन्नास
हजाराचा धनादेश प्रदान करण्यात आला. प्रसंगी सरपंच बद्री राठोड, पंचायत समिती सदस्य सतिष पाटे, तहसिलदार
बाबासाहेब गाढवे, तलाठी, ग्रामसेवकासह
लाभार्थींचे कुटूंबीय उपस्थित होते.
* * * * * * * *
No comments:
Post a Comment