स्वच्छता ही काळाची गरज आहे !
:प्रांताधिकारी मनोज घोडे पाटील
चाळीसगांव,दिनांक 1:- स्वच्छता ही काळाची गरज ओळखुन प्रत्येक
नागरिकाने स्वच्छ भारत अभियानात सहभागी होऊन ही आपली सामुहीक जबाबदारी ओळखावी व
स्वच्छ भारताचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी सहयोग द्यावा असे आवाहन प्रातांधिकारी
मनोज घोडे पाटील यांनी केले. आज चाळीसगाव
शहरातील अनिल नगर भागातून स्वच्छ भारत अभियानास प्रारंभ करण्यात आला त्यावेळी ते
बोलत होते.
सकाळी
08:०० वाजता नगराध्यक्ष भोजराज पुन्शी यांच्या हस्ते श्रीफळ फोडुन या
अभियानास सुरुवात करण्यात आली. या अभियानात तालुक्यातील जवळपास 550 अधिकारी व
कर्मचारी सहभागी झाली असून शहरातील अनिल नगर व सभोवतालच्या परिसरातील दहा ठिकाणे
निश्चित करण्यात आली होती. त्यात प्रामुख्याने स्टेशन पोलीस चौकी, भाजी मार्केट, सिंधी
कॉलनी, हंस चित्रपट गृह परिसर, मोहन धाम मंदीर, पवारवाडी, महावीर हॉस्पीटल (मशीद),
अनिल नगर ओपन स्पेस, खान्देश मील, संत नामदेव नगर, अशी दहा ठिकाणे निश्चीत करुन विविध कार्यालयातील
अधिकारी कर्मचा-यांची दहा पथके तयार करुन श्रमदान करण्यात आले. यावेळी तहसिलदार
बाबासाहेब गाढवे, गटविकास अधिकारी मालती जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी केशव
पातोंड यांच्यासह विविध विभागांचे कार्यालय प्रमखांसह कर्मचारी मोठया संख्येने
सहभागी झाले होते.
सन 2019 मधील स्व.महात्मा गांधीच्या
150 व्या जयंती निमीत्त स्वच्छ भारत निर्माण करुन त्यांना श्रध्दाजंली वाहण्याचे
स्वप्न उराशी बाळगून प्रत्येक नागरिकाने
आठवडयातील दोन तास स्वच्छतेसाठी देऊन स्वच्छ भारत अभियान यशस्वी करावे असे आवाहन
प्रातांधिकारी मनोज घोडे यांनी यावेळी सर्व नागरिकांना केले. तर स्वच्छतेचे आपल्या
दैनंदिन जिवनातील महत्व देखील प्रत्येकांना पटवून द्यावयाचे काम सर्व प्रशासनातील
अधिकारी कर्मचा-यांनी करावे असेही त्यांनी यावेळी सांगीतले.
* * * * * * * *
No comments:
Post a Comment