संविधान
दिनानिमित्त उद्देशिकेचे सामूहिक वाचन
जळगाव, दि.26- भारतीय संविधान दिनानिमित्त येथील जिल्हाधिकारी
कार्यालयात संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. जिल्हाधिकारी
कार्यालयाच्या प्रांगणात सकाळी 11 वाजता
अप्पर जिल्हाधिकारी गुलाबराव खरात यांच्या प्रमुख उपस्थितीत संविधानाच्या
उद्देशिकेचे सामुहिक वाचन करण्यात आले.
या कार्यक्रमास जिल्हाधिकारी
कार्यालयासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित
होते. भारतीय राज्यघटना 26 नोव्हेंबर 1949
रोजी स्वीकारली व 26 जानेवारी 1950 पासून ती अंमलात आणली. त्यानिमित्ताने दरवर्षी
26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून साजरा केला जातो.
*
* * * * * * * *
अपंगांसाठी
मोफत प्रशिक्षण
जळगाव, दि.26- जिल्हा
उद्योग केंद्र, मिटकॉन स्वयंरोजगार केंद्र, जळगाव व जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्र,
जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने अपंग व्यक्तींसाठी मोफत तांत्रिक प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात
येत आहे.
जिल्ह्यातील
जळगाव, भुसावळ, मुक्ताईनगर, यावल, रावेर, जामनेर, बोदवड या तालुक्यासाठी हा
कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. इयत्ता 7 वी उत्तीर्ण व 18 ते 45 वयोगटातील अपंग
व्यक्तींनी आपली नावे दि. 29 नोव्हेंबर पर्यंत नोंदवावीत. नावे नोंदविण्यासाठी
हेमंत ठोमरे, महेंद्र सोनवणे, जिल्हा उद्योग केंद्र, जळगाव (9850841324) किंवा
जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्र , जळगाव 0257-2260528 येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले
आहे.
* * * * * * * * *
No comments:
Post a Comment