लोकशाही दिनी 58 अर्ज प्राप्त
जळगाव, दि.3- प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित करण्यात येणारा लोकशाही दिन दि. 3 नोव्हेंबर रोजी घेण्यात आला. जिल्हाधिकारी
कार्यालयाच्या सभागृहात लोकशाही दिन कार्यक्रम घेण्यात आला. त्यामध्ये
पुढील विभागाच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.
उप विभागीय अधिकारी, जळगाव - 01, उपविभागीय अधिकारी अमळनेर -01, विशेष
भुसंपादन अधिकारी 01, जिल्हा उपनिंबधक सहकारी संस्था -20, मुख्य कार्यकारी अधिकारी
जि. प. -07, जिल्हा पोलीस अधिक्षक 04,
महसुल जि. का. जळगाव 02, पुरवठा शाखा 02, कुळकायदा शाखा 02, टंचाई शाखा 01,
ग्रामपंचायत शाखा 01, मुख्याधिकारी न. पा. रावेर 01, तहसिलदार जळगाव 02, तहलिसदार
एरंडोल 01, तहसिलदार धरणगाव 01, तहसिलदार पाचोरा 01, मुख्याधिकारी न. पा. सावदा
03, अधिक्षक अभियंता म. रा वीज वितरण कं जळगाव 02, क्रॉम्प्टन ग्रीव्हज कं. जळगाव
01, मुख्याधिकारी न. पा. 01, अधिक्षक भुमी अभिलेख जळगाव 02, उप अभियंता नाशिक
गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ, नाशिक 1 सदरच्या तक्रारी संबंधित विभागाकडे
पाठविण्यात आल्या. आहेत. यावेळी सर्व शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
* * * * * * *
जवाहर
नवोदय विदयालय प्रवेश अर्ज जमा करण्याची
मुदत
15 नोव्हेंबर 2014 पर्यंत
जळगाव,
दि. 3 :- जवाहर नवोदय विदयालय हे भारत सरकार संचलित CBSE पाढयक्रम असणारे ग्रामीण
भागातील मुलामुलीसाठी दर्जेदार अद्ययावत शिक्षण देणारे जिल्हयातील एकमेव निवासी
विदयालय आहे. विदयालयात इयत्ता 6 वी च्या प्रवेशासाठी प्रवेश परीक्षेचे अर्ज
भरण्याची शेवट ची तारीख 30 ऑक्टोंबर 2014 जाहीर करण्यात आली होती. परंतु हया
तारखेत पधरा दिवसाची मुदतवाढ देण्यात आली आहे. आता अर्ज भरण्याची शेवट ची तारीख 15
नोव्हेंबर 2014 ही आहे. याची नोंद सर्व मुख्याध्यापक पालक शिक्षक व
गटशिक्षणाधिकारी यांनी घ्यावी व इयत्ता 5
वी शिकत असलेल्या पाल्यांच्या सर्व पालकांनी हया वाठीव तारखेचा लाभ घ्यावा व
जास्तीत जास्त संख्येने विदयार्थ्यांनी प्रवेश अर्ज भरावेत असे आवाहान प्राचार्य
जवाहर नवोदय विदयालय साकेगांव भुसावळ जि. जळगाव यांनी केले आहे.
* * * * * * *
जिल्हयातील केबल टि. व्ही वर प्रकाशित करावयाची
जाहिरात
जळगाव, दि. 3 :-
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम - 2009 नुसार वंचीत गट व
दुर्बल घटकांतील बालकांसाठी विनाअनुदानित व कायम विनाअनुदानित (अल्पसंख्याक वगळून)
शाळामध्ये 25 टक्के प्रवेश राखीव ठेवलेले आहे. सदरचे प्रवेश इयत्ता पहिली अथवा
पूर्व प्राथमिक साठी आरक्षित असून प्रवेशासाठी अद्यापही जागा रिक्त आहेत. तरी सर्व
इच्छूक अर्जदारांनी आपल्या नजिकच्या वरील शाळांमध्ये संपर्क करुन आवश्यक
कागदपत्रासह अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी जिल्हयातील शिक्षणाधिकारी (प्राथ)
जिल्हा परिषद, तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी, नगरपालिकेतील शिक्षण अधिकारी / प्रशासन
अधिकारी व महानगरपालिका क्षेत्रात प्रशासन अधिकारी / शिक्षणाधिकारी यांच्याशी
संपर्क साधावा असे जिल्हाधिकारी, जळगाव यांनी कळविले आहे.
* * * * * * *
No comments:
Post a Comment