छेडखानीविरोधात कृतीदल
सज्ज करण्याचे जिल्हाधिका-यांचे आदेश
मनोधैर्य
योजनेअंतर्गत तिघा पिडीतांना अर्थसहाय्य मंजूर
जळगाव, दि. 17:- अल्पवयीन मुलींना फूस लावून , लग्नाचे अमिष दाखवून बलात्काराच्या घटना घडत
असतात. यात शाळकरी व महाविद्यालयीन मुलींचे प्रमाण अधिक असते. या प्रकाराला आळा
घालण्यासाठी मुलींना प्रबोधनाद्वारे सक्षम करतांनाच शाळा महाविद्यालयांबाहेर
मुलींची छेडखानी करणा-या रोडरोमिओंना आळा घालण्यासाठी पोलीसांनी कृतीदल सज्ज
करावे, असे आदेश जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी आज दिले.
जिल्हाधिकारी
कार्यालयाच्या सभागृहात मनोधैर्य योजनेचा आढावा घेण्यासाठी आज बैठकीचे आयोजन
करण्यात आले. यावेळी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी देवेंद्र राऊत, पोलीस
उपधिक्षक (गृह) श्री. पाडवी, जिल्हा शल्य चिकित्सक डा. शेळके, अशासकीय सदस्या रजनी
पाटील, पाचोरा आदी उपस्थित होते. यावेळी
तिघा पिडीतांना अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले. तर अन्य प्रकरणात चौकशी बाकी
असल्याने चौकशी पूर्ण झाल्यावर निर्णय
घेण्याचे ठरविण्यात आले. आज सादर झालेल्या एकूण आठ प्रकरणापैकी केवळ तीनच पिडीत या सज्ञान आहेत, उर्वरित सर्व
अल्पवयीन आहेत. त्यामुळे असे प्रकार टाळण्यासाठी मुलींचे प्रबोधन करतांनाच
प्रतिबंधात्मक कारवाईचा भाग म्हणून रोडरोमिओंविरुद्ध पोलिसांनी कृतीदले सज्ज
करावीत असे आदेश जिल्हाधिका-यांनी दिले. मुलींना या प्रकारापासून परावृत्त
करण्यासाठी प्रबोधनपर उपक्रम राबविण्याच्या सुचनाही त्यांनी केल्या.
* *
* * * * *
महिला
लोकशाही दिनी 47 अर्ज प्राप्त
जळगाव, दि. 17:- दर महिन्याच्या तिस-या सोमवारी आयोजित होणारा महिला लोकशाही दिन आज आयोजित
करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल
यांनी महिलांचे अर्ज स्विकारले. त्यांची गा-हाणी एकून घेतली. या प्रसंगी जिल्हा
महिला व बालविकास अधिकारी देवेंद्र राऊत, जिल्हा उपनिबंधक संजय राऊत, पोलीस उपअधीक्षक किशोर पाडवी, जिल्हा परिषद महिला बाल
कल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुनिल दुसाने, महिला पोलीस अधिकारी
श्रीमती सारिका कोडापे आदी अधिकारी उपस्थित होते. यावेळी सहकार विभागाशी संबंधित
ठेविदार महिलांचे सर्वाधिक 43 अर्ज, तहसिलदार संजय गांधी निराधार योजना एक अर्ज
आणि महिला दक्षता विभाग, पोलीस अधीक्षक यांच्याशी संबंधित तीन अर्ज प्राप्त झाले.
* *
* * * * *
No comments:
Post a Comment