शहीद जवान बाळासाहेब पाटील यांच्यावर
शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
चाळीसगांव,दिनांक 12:-
101-इंजिनिअरींग रेजीमेंट मध्ये लान्स नायक पदावर कार्यरत असलेले श्री.बाळासाहेब
विरभान पाटील हे जवान कर्तव्यावर असतांना दिनांक 09 नोव्हेंबर, 2014 रोजी शहीद झाले.
आज दिनांक 12 नोव्हेंबर 2014 रोजी सकाळी 09:00 वाजता त्यांच्यावर भडगांव येथील नदीपात्रात शासकीय इतमामात
अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी नगरसेवक शशीकांत येवले, गणेश परदेशी, सुनिल
देशमुख आदी तर तहसिलदार बी.ए.कापसे, पोलीस निरीक्षक दिलीप निकम यांच्यासह
परिसरातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
शासकीय इतमामात अंत्यसंस्कारासाठी
कॅप्टन अमितकुमार यादव यांच्यासह एक ज्युनिअर कमिशन ऑफीसर नऊ जवान यांनी सलामी
देऊन पुष्पचक्र अर्पण केले. सैनिक कल्याण कार्यालयाच्या वतीने सुबेदार
एस.एस.सोनवणे यांनी तर तालुका प्रशासनाच्या वतीने तहसिलदार बी.ए.कापसे व पोलीस
निरीक्षक दिलीप निकम यांनी पुष्पचक्र अर्पण केले.
कै.बाळासाहेब विरभान पाटील यांच्या
पश्चात वडील विरभान रामधर पाटील, आई
मंगलबाई विरभान पाटील, पत्नी वैशाली बाळासाहेब पाटील, मुलगा देवांग बाळासाहेब
पाटील, व भाऊ मनोज विरभान पाटील असा परिवार आहे.
* * * * * * * *
No comments:
Post a Comment