जिल्हयात 10
डिसेंबर पर्यंत मनाई आदेश
जळगाव, दि. 26 :- जिल्हयात सालाबादाप्रमाणे यात्रा, पालखी मिरवणुका व
इतर धार्मिक कार्यक्रम सुरु आहेत. दि. 30 नोव्हेंबर 2014 रोजी मा. मुख्यमंत्री यांचा जळगाव जिल्हा दौरा असून दि. 6 डिसेंबर 2014 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन तसेच दि. 8 डिसेंबर 2014 पासुन नागपुर येथे हिवाळी अधिवेशन सुरु होणार आहे. त्यानुषंगाने जिल्हयात कायदा व
सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी संपूर्ण जळगाव जिल्हा हद्दीत अपर जिल्हादंडाधिकारी धनंजय निकम यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 चे पोटकलम (1) व (3) मनाई आदेश जारी केले आहे. सदर आदेश दिनांक 10 डिसेंबर 2014 पर्यंत अंमलात राहील, असे अपर जिल्हादंडाधिकारी जळगाव यांनी कळविले आहे.
* * * * * * * *
एरंडोल येथे ऊरुसनिमित्त
ध्वनीक्षेपकास दोन तासांनी वाढ
जळगाव,दि. 26 : एरंडोल येथे दि. 2 डिसेंबर रोजी पीर नथ्थू बापु मियॉ यांच्या ऊरसनिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी ध्वनीक्षेपकाची वेळ दोन तासांनी वाढविण्यास जिल्हादंडाधिका-यांनी परवानगी दिली आहे. सदर परवानगी ध्वनीप्रदुषण (नियमन व नियंत्रण) नियम 2000 अन्वये ध्वनीक्षेपक व वाद्य ध्वनीप्रदुषण पातळी विहित मर्यादेत राखुन देण्यात आली आहे, असे जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी कळविले आहे.
* * * * * * * *
No comments:
Post a Comment