Friday, 8 November 2013

पालकमंत्री संजय सावकारे यांचा जिल्हा दौरा कार्यक्रम

पालकमंत्री संजय सावकारे यांचा जिल्हा दौरा कार्यक्रम

              जळगाव,दि. 8:- कृषी, पशुसंवर्धन, दुग्धविकास, रोजगार व स्वयंरोजगार, सामाजिक न्याय आणि भटक्या व विमुक्त जातींचे कल्याण राज्यमंत्री तथा जळगाव जिल्हयाचे पालकमंत्री  संजय सावकारे यांचा जळगाव जिल्हा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे :-
               रविवार दि. 10 नोव्हेंबर 2013 रोजी  सकाळी 7.00  जालना येथुन पाचोऱ्याकडे प्रयाण व शासकीय विश्रामगृह पाचोरा येथे आगमन, सकाळी 11.00 वा महालपुरे मंगल कार्यालय, भडगाव रोड पाचोरा येथे उपस्थिती, सकाळी 12.00 वा. स्व. बिंदुबाई नारायण सभागृह कांचन नगर जळगाव येथे उपस्थिती, दुपारी 2.30 वा. गोलवाडे ता. रावेर येथे उपस्थिती, दुपारी 3.30 वा. चुंचाळे कोरपावली चिंचोली व दहीगांव ता. यावल येथे उपस्थिती, संध्या. सोयीनुसार भुसावळकडे प्रयाण व आगमन

* * * * * * * *

11 नोव्हेंबर रोजी जनता दरबार

              जळगाव,दि. 8:- कृषी, पशुसंवर्धन, दुग्धविकास, रोजगार व स्वयंरोजगार, सामाजिक न्याय आणि भटक्या व विमुक्त जातींचे कल्याण राज्यमंत्री तथा जळगाव जिल्हयाचे पालकमंत्री  संजय सावकारे यांचा जनता दरबार कार्यक्रम सोमवार  दिनांक 11 नोव्हेंबर 2013 रोजी दुपारी 2.00 वाजता शासकीय विश्रामगृह  पदमालय, जळगाव येथे आयोजित केलेला आहे. तरी जनतेने  या जनता दरबाराचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी, जळगाव यांनी केले आहे.

* * * * * * * *

राष्ट्रीय विधी सेवा दिनानिमित्त
9 नोव्हेंबर रोजी कार्यक्रमाचे आयोजन

               जळगाव, दि. 8 :- जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगाव तथा जिल्हा वकील संघ, जळगाव यांचे संयुक्त विद्यमाने  शनिवार दिनांक 9 नोव्हेंबर 2013 रोजी नवीन बसस्थानक, जळगाव येथे सकाळी 11.00 वाजता राष्ट्रीय विधी सेवा दिनानिमित्त कायदेविषयक अधिकार व इतर माहिती व्हावी, विधी सेवा दिनाचे महत्व सामान्य जनतेला व्हावे म्हणून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आला आहे. तरी जनतेने कायदेविषयक कार्यक्रमात सहभागी होऊन कायदेविषयक ज्ञानाचा  लाभ घ्यावा. असे आवाहन अधिक्षक जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगाव यानी केले आहे.


  * * * * * * * *

No comments:

Post a Comment