आहरण व संवितरण अधिका-यांनी सेवाप्रणालीत
बँक शाखा, खाते क्रमांकाची माहिती अदयावत करावी
जळगाव,
दिनांक 25 :- सेवार्थ प्रणालीमध्ये बँक शाखा, खाते क्रमांक संबंधीची माहिती अदयावत
करण्यासाठी Assistant Login / D D O Login
वर दिनांक 30 नोव्हेंबर 2013 पर्यत सुविधा उपलब्ध करण्यात आलेली असून, सदर सुविधा
दिनांक 30 नोव्हेंबर 2013 पर्यंतच उपलब्ध असल्याने माहिती अदयावत करण्याची दक्षता जळगाव
कोषागाराच्या अधिनस्त असलेल्या सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांनी घ्यावी. सदर
सुचना सेवार्थ प्रणालीच्या Home Page वर प्रसारीत करण्यात आलेली आहे. असे जिल्हा
कोषागार अधिकारी शि. बा. नाईकवाडे यांनी कळविले आहे.
* * * * * * * *
आज जनता दरबार
जळगाव,दि. 25 :- कृषी, पशुसंवर्धन,
दुग्धविकास, रोजगार व स्वयंरोजगार, सामाजिक न्याय आणि भटक्या व विमुक्त जातींचे
कल्याण राज्यमंत्री तथा जळगाव जिल्हयाचे पालकमंत्री संजय सावकारे यांचा जनता दरबार कार्यक्रम मंगळवार
दिनांक 26 नोव्हेंबर 2013 रोजी दुपारी
2.00 वाजता शासकीय विश्रामगृह पदमालय,
जळगाव येथे आयोजित केलेला आहे. या जनता दरबाराचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी, ज्ञानेश्वर
राजूरकर जळगाव यांनी केले आहे.
* * * * * * * *
No comments:
Post a Comment