Tuesday, 12 November 2013

शासनाच्या खरिप अनुदान-2012 चे वाटप 84 टक्के पूर्ण : तहसिलदार बाबासाहेब गाढवे

शासनाच्या खरिप अनुदान-2012 चे वाटप 84 टक्के पूर्ण
                                           : तहसिलदार बाबासाहेब गाढवे
           
            चाळीसगाव दि. 12 :- शासनाच्या खरिप अनुदान 2012 चे अनुदान वाटप तालुक्यातील शेतकरी लाभार्थ्यांना वितरीत करण्यात येत असून तालुक्यातील 136 गावांपैकी 135 गावातील लाभार्थ्यांना सदर अनुदानाचे वाटप पुर्ण   झाले आहे, एकूण अनुदानाच्या 84 टक्के अनुदान आजतागायत वितरीत करण्यात आल्याचे तहसिलदार बाबासाहेब गाढवे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
            खरिप अनुदान 2012 च्या सर्व्हेक्षणानुसार प्राप्त एकूण अनुदान रु. 19 कोटी 13 लाख इतक्या अनुदानापैकी रु. 16 कोटी 4 लाख इतके अनुदान हे तालुक्यातील 49 हजार 625 शेतकरी लाभार्थ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यामार्फत वितरीत करण्यात आले असून सरासरी एकूण 84 टक्के इतके अनुदान आजतागायत वितरीत झाले आहे. उर्वरित अनुदान वितरणासाठी वंचित शेतकरी लाभार्थ्यांनी आपल्या जवळच्या जिल्हा बँकेत अथवा राष्ट्रीयकृत बँकेत आपले खाते उघडून आपला बँकेचा खातेक्रमांक संबंधित तलाठयांकडे तात्काळ जमा करावा असे आवाहनही तहसिलदार गाढवे यांनी केले आहे.


 * * * * * * * * 

No comments:

Post a Comment