क्रीडा संकुलातील सुरक्षा
रक्षकांचे वेतन तत्काळ अदा करा
: जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर
राजूरकर
जळगाव, दिनांक 20 :- गेल्या चार
महिन्यापासून थकित असलेले जिल्हा क्रीडा संकुलातील सुरक्षा रक्षकांचे वेतन तत्काळ
अदा करावे अशा सूचना जिल्हा क्रीडा संकुल कार्यकारी समितीचे अध्यक्ष तथा
जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर यांनी आज दिल्या जिल्हा क्रीडा संकुल कार्यकारी
समितीची बैठक आज दुपारी त्यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या दालनात झाली त्यावेळी
ते बोलत होते. या बैठकीस जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी शीतल उगले,
जिल्हा पोलिस अधीक्षक एस. जयकुमार, आदि समितीचे
सदस्य उपस्थित होते.
जिल्हाधिकारी राजूकर पुढे म्हणाले,
क्रीडा संकुलातील भाडयाने दयावयाचे गाळयाची जाहिरात करुन अर्ज मागविण्यात यावेत.
गाळयाचे भाडे हे बाजारमूल्य व नगररचना कार्यालयाकडून निश्चित करुन घ्यावे.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी
अधिकारी यांनी बैठकीत क्रीडा संकुलाचा देखभाल दुरुस्तीचा खर्च संकुलाच्या
उत्पन्नातूनच भागविण्यात येईल याप्रमाणे नियोजन करावे असे सांगून मिळकतीचे स्त्रोत
वाढवितांना क्रीडा संकुलाची भव्यता व नैसर्गिक सौदर्य विद्रूप होणार नाही याची
काळजी घ्यावी.
जिल्हा पोलिस अधीक्षक एस. जयकुमार
यांनी जिल्हा क्रीडा संकुल हे व्यवसायीक नफा मिळविणारी संस्था नसून क्रीडा
प्रकारांना प्रोत्साहन देऊन राष्ट्रीयस्तरावर क्रीडापटू निर्माण करणारी सेवाभावी संस्था असल्याचे
सांगून सभासद फी अथवा इतर फी आकारतांना या मूळ संकल्पनेला ठेच लागणार नाही याची
काळजी घ्यावी.
सभेचे प्रास्ताविक, संचलन व आभार
प्रदर्शन जिल्हा क्रीडा संकुल कार्यकारी
समितीच्या सदस्य सचिव तथा जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील यांनी केले.
*
* * * * * * *
पारोळा व चाळीसगाव येथे माजी सैनिकांच्या
बैठकीचे आयोजन
जळगाव, दिनांक 20 :- माजी सैनिक /
विधवा व त्यांचे अवलंबितांच्या अडीअडचणी सोडविण्याकरिता पारोळा येथे दिनांक 25 नोव्हेंबर 2013 तर चाळीसगाव येथे 28 नोव्हेंबर 2013 रोजी सकाळी 11.30 वाजता संबंधित तहसिलदारांच्या
अध्यक्षतेखाली बैठकींचे आयोजन केले आहे. तरी संबंधित तालुक्यातील माजी सैनिक /
अवलंबितांनी त्यांच्या अडीअडचणी असल्यास लेखी स्वरुपात दोन प्रतीत आणाव्यात व
बैठकीस हजर राहून आपले प्रकरण तहसिलदारांना पुढील कार्यवाहीसाठी सादर करावे असे
आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कॅप्टन मोहन कुलकर्णी यांनी केले आहे.
*
* * * * * * *
सेवानिवृत्त डाक कर्मचा-यांची
16 डिसेंबर रोजी पेन्शन अदालत
जळगाव, दि. 20 :- डाक विभागातर्फे
सेवानिवृत्त झालेल्या डाक कर्मचा-यांच्या पेन्शन विषयी तक्रारी समजुन
घेण्यासाठी 16 डिसेंबर 2013 रोजी सकाळी 11
वाजता पेन्शन अदालत डाक अधिक्षक जळगाव विभाग यांचे कार्यालयात आयोजित करण्यात
येणार आहे.
जळगाव डाक विभागातील सेवानिवृत्त
कर्मचा-यांच्या पेन्शन विषयीच्या ज्या तक्रारींचे निवारण सहा आठवडयांच्या आत
झालेले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नसेल अशा तक्रारींची या पेन्शन अदालतमध्ये
दखल घेतली जाईल असे आवाहन डाकघर अधिक्षक सु. मा. पाटील यांनी केले आहे.
*
* * * * * * *
नैसर्गिक
आपत्तीमध्ये नुकसानग्रस्त शेतक-यांना
8
कोटी 26 लाखाची आर्थिक मदत
जळगावा, दिनांक 20 :- माहे जानेवारी, फेब्रुवारी 2013 मध्ये नैसर्गिक
आपत्तीमध्ये नुकसान झालेल्या शेतक-याना आर्थिक मदत जिल्हयाचे पालकमंत्री ना. संजय
सावकारे यांच्या प्रयत्नाने जिल्हयास रुपये 8 कोटी 26 लाख, 85 हजाराची रक्कम
प्राप्त झाली असून जिल्हयातील बाधीत
शेतक-याना वाटप करण्यात येणार आहे.
जळगाव
1.95, भुसावळ 10.66, यावल 53.27, रावेर 664.70, मुक्ताईनगर 19.86, बोदवड 0.18,
अमळनेर 1.70, चोपडा 26.06, पारोळा 32.71, एरंडोल 0.25, पाचोरा 1.15, भडगाव 9.63,
चाळीसगाव 3.05, जामनेर 1.71 असे एकूण
8 कोटी 26 लाख 85 हजार रक्कम प्राप्त झाली असल्याची माहिती जिल्हा अधिक्षक
कृषि अधिकारी किसन मुळे यांनी दिली आहे.
*
* * * * * * *
गिरणा
प्रकल्पावरील पाणीसाठयासाठी
शेतक-यांनी 20 डिसेंबर पर्यत पाणी अर्ज सादर
करावेत
जळगाव, दिनांक 20 :- गिरणा पाटबंधारे विभाग जळगाव अतर्गत गिरणा प्रकल्पावरील
पांझण डावा कालवा, जामदा डावा कालवा व निम्न गिरणा कालव्याव्दारे कालवा प्रवाही,
कालवा, उपसा, जलाशय उपसा, लाभक्षेत्रातील अधिसूचित नदी, नाले, ओढे वरुन उपसा
सिंचनाने तसेच लाभक्षेत्रातील व 35 मीटर आतील विहिरीवरुन पाण्याचा लाभ घेणा-या
सर्व लाभधारकांनी गिरणा प्रकल्पात यावर्षी
अंशत पाणीसाठा उपलब्ध झालेला आहे. त्यापैकी पिण्याचे पाण्याचे आरक्षण वगळून
उर्वरित उपलब्ध पाणीसाठयातून रब्बी
हंगाम 2014 मधील उभी पीके तसेच विहिरीवरुन किंवा अन्य मार्गाने पाणीपुरवठयाची
पर्यायी व्यवस्था असेल अशा लाभधारकांना गहू, हरबरा, ज्वारी, दादर, हा. दूरी, मका,
कडवाळ, कपाशी, सुर्यफुल, करडई, भाजीपाला इत्यादी हंगामी पिकांना जानेवारी 2014
मध्ये दोन आर्वतनात सिंचनाचे पाण्याच्या उपलब्धतेनुसार सिंचनासाठी मर्यादित पाणी
पुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. त्यादृष्टीने पिकांचे नियोजन करुन पाणी
मागणी करावी.
अटी व शर्तीच्या पूर्ततेसह नमुना नं. 7 , 7 अ व 7 ब चे पाणी अर्ज भरुन
दिनांक 20 नोव्हेंबर 2013 ते 20 डिसेंबर
2013 या कालावधीत संबंधीत पाट शाखेच्या कार्यालयात कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अगर
पोस्टाने देण्याचे करावे. सिंचनाच्या पाणी पुरवठयाच्या अटी व शर्ती नियमा नुसार
राहतील असे आवाहन कार्यकारी अभियंता गिरणा पाटबंधारे विभाग, जळगाव यानी केले आहे.
*
* * * * * * *
आता टपाल कार्यालयातून पाठवा मोबाईल मनिऑर्डर
जळगाव, दिनांक 20 :- जळगाव विभागातील 6 टपाल कार्यालयात मोबाईल
मनिऑर्डरची सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे. यात जळगाव हेड पोस्ट ऑफिस अमळनेर,
धरणगाव, पारोळा, पाचोरा, चाळीसगाव येथे ही सुविधा उपलब्ध झाली आहे.
कमी कमीशनमध्ये तत्काळ सेवेमध्ये रुपये 1 हजार
ते 10 हजार पर्यंत मनिऑर्डर करता येईल.त्यासाठी कमीशन पुढीलप्रमाणे राहिल. रुपये 1
हजार ते 1500 पर्यत रुपये 45,रु. 1500 ते
5000 रु. 79 रुपये 5001 ते 10000 रुपये
112 असे राहिल. कार्यालयातील काऊंटरवर
पैसे जमा केल्यानंतर ज्यांना पैसे पाठवायचे आहे. त्याचा व आपला मोबाईल क्रमांक
दयावा रक्कम जमा केल्यानंतर ज्या व्यक्तीला पैसे पाठवाचे आहे त्यास आणि पैसे जमा
करणा-यास टपाल कार्यालयातून संदेश येईल. ज्या टपाल कार्यालयातून आपणास मोबाईल
मनिऑर्डर घ्यावयाची आहे तेथे जाऊन हा संदेश
दाखवावा. आपल्या ओळखपत्राची एक झेरॉक्स प्रत दाखवावी आणि ती जमा करुन रक्कम
घ्यावी. टपाल कार्यालयातून रक्कम दिल्यानंतर पुन्हा रक्कम भरणा-या आणि घेणा-यास
मोबाईलवर संदेश येईल. ही सेवा तत्काळ
स्वरुपाची असल्याने त्याचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहन अधिक्षक डाकघर जळगाव
यांनी केले आहे.
*
* * * * * * *
अमळनेर येथे 25 रोजी वाळू साठयाचा लिलाव
जळगाव, दि 20 :- मौजे. अमळनेर ( शहर
तलाठी कार्यालय आवारात) वाळू साठयाचा लिलाव सन 2013-14 या कालावधीसाठी करण्यात
येणार आहे. सदर प्रक्रिया दिनांक 25 नोंव्हेबर 2013 रोजी सकाळी 11 वाजता तहसिलदार,
अमळनेर यांच्या दालनात पार पडणार आहे. इच्छूकांनी उपस्थित रहावे , असे आवाहन
तहसिलदार, अमळनेर यांनी केले आहे.
*
* * * * * * *
No comments:
Post a Comment