Monday, 11 November 2013

जनता दरबाराच्या माध्यमांतून नागरिकांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यात येईल : पालकमंत्री संजय सावकारे


जनता दरबाराच्या माध्यमांतून नागरिकांच्या
प्रश्नांची सोडवणूक करण्यात येईल : पालकमंत्री संजय सावकारे

जळगाव, दि. 11 :- जनता दरबाराच्या माध्यमातून नागरिकांच्या जास्तीत जास्त प्रश्नांची सोडवणूक केली जाईल असे प्रतिपादन राज्याचे कृषी राज्यमंत्री तथा जळगाव जिल्हयाचे पालकमंत्री संजय सावकारे यांनी आज येथे केले. येथील पद्मालय शासकीय विश्रामगृहात आयोजित जनता दरबार कार्यक्रमास नागरिकांनी मोठया प्रमाणावर प्रतिसाद देवून आपली गा-हाणी पालकमंत्री   श्री. सावकारे यांच्या समक्ष मांडली
               जनता दरबार कार्यक्रमास जिल्हा परिषदेचेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती शीतल उगले, निवासी उपजिल्हाधिकारी धनंजय निकम, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुनिल गायकवाड, जिल्हा माहिती अधिकारी ज्ञा. ना. इगवे आदि अधिकारी उपस्थित होते. महिन्याच्या दुस-या आणि चौथ्या सोमवारी जनता दरबाराचे आयोजन केले जाते. नागरिकांनी आपल्या शासनातील अडचणी सोडविण्यासाठी याचा फायदा घ्यावा असे सांगून श्री. सावकारे यांनी उपस्थित अधिका-यांनी प्राप्त झालेल्या आप आपल्या विभागाच्या तक्रारीचे निराकरण करुन कार्यवाही अहवाल पुढील जनता दरबारात सादर करावा असे सांगितले.

           आज झालेल्या जनता दरबारात सहकार विभागाच्या - 45, महसुल विभाग- 17, कृषी विभाग- 2, वन विभाग- 1, महाराष्ट्र वीज. वितरण कंपनी -4, महानगर पालिका- 3 पोलीस विभाग- 8 अशा तक्रारींचा समावेश होता.


* * * * * * * * *

No comments:

Post a Comment