जिल्हा नियोजन समितीची 19 नोव्हेंबर रोजी सभा
जळगाव, दिनांक 17 :- जिल्हा नियोजन समितीची दिनांक 18 नोव्हेंबर 2013 रोजीची आयोजित बैठक
रद्द झाली असून सदरची बैठक आता दिनांक 19
नोव्हेंबर 2013 रोजी सकाळी 11.00 वाजता जिहाधिकारी कार्यालयाच्या अल्पबचत भवन येथे
राज्याचे कृषी, पशुसंवर्धन, दुग्धविकास,
रोजगार व स्वयंरोजगार, सामाजिक न्याय, व्यसनमुक्ती कार्य, विमुक्त भटक्या जमाती व
इतर मागासवर्गीय कल्याण तथा जळगाव जिल्हयाचे
पालकमंत्री संजय सावकारे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केली आहे. बैठकीचे
विषय 31 ऑक्टोबर 2013 रोजीच्या अजेंडयात नमूद केल्या नुसारच राहतील. तरी सर्व
संबंधितांनी बैठकीस उपस्थित रहावे. असे आवाहन ज्ञानेश्वर राजूरकर जिल्हाधिकारी तथा सदस्य सचिव
जिल्हा नियोजन समिती, जळगाव यांनी केले आहे.
*
* * * * *
माजी सैनिक तालुका समितीची 25 नोव्हेंबर रोजी
बैठक
जळगाव, दिनांक 17 :- पारोळा व चाळीसगाव
तालुक्यातील माजी सैनिक / विधवा व त्यांचे अवलंबितांच्या अडीअडचणी सोडविण्याकरिता
दिनांक 25 नोव्हेंबर 2013 रोजी सकाळी 11.30 वाजता संबंधित तहसिलदांच्या
अध्यक्षतेखाली आयोजित केली आहे. तरी संबंधित तालुक्यातील माजी सैनिक / अवलंबितांनी
त्यांच्या अडीअडचणी असल्यास लेखी स्वरुपात दोन प्रतीत आणाव्यात व बैठकीस हजर राहून
आपले प्रकरण तहसिलदारांना पुढील कार्यवाहीसाठी सादर करावे असे आवाहन जिल्हा सैनिक
कल्याण अधिकारी कॅप्टन मोहन कुलकर्णी यांनी केले आहे.
*
* * * * *
आजचा सैनिक दरबार कार्यक्रम रद्द
जळगाव, दिनांक 17 - जिल्हाधिकारी
कार्यालय येथील दिनांक 19 नोव्हेंबर रोजी आयोजित सैनिक दरबार कार्यक्रम काही
अपरीहार्य कारणामुळे रद्द करण्यात आला आहे. सैनिक दरबार कार्यक्रमाचे सुधारीत
तारीख नंतर कळविण्यात येईल तरी संबंधितांनी नोंद घ्यावी असे सैनिक कल्याण अधिकारी,
जळगाव यांनी कळविले आहे.
*
* * * * *
16 डिसेंबर रोजी डाक अदालत
जळगाव, दिनांक 17 :- पोस्टाच्या टपाल,
स्पीड, पोस्ट, काउंटर सेवा, डाक वस्तु, पार्सल, बचत बॅक, मनीऑर्डर आदि
कामासंबंधीच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी अधिक्षक डाकघर जळगाव येथे दिनांक 16
डिसेंबर 2013 रोजी सकाळी 11 वाजता डाक
अदालतचे आयोजन करण्यात आलेले आहे.
सदर
पोस्टाच्या कामासंबंधीच्या ज्या तक्रारींचे सहा आठवडयाच्या आत निराकरण झाले नसेल व
समाधानकारक उत्तर मिळाले नसेल, अशा तक्रारींची दखल डाक अदालतमध्ये घेण्यात येणार
आहे.
तरी
संबंधितांनी डाक सेवेबाबतची आपली तक्रार दोन प्रतीत सहाय्यक अधिक्षक (मुख्यालय)
एम. एस. जगदाळे यांचे कार्यालय पहिला
माळा, हेड पोस्ट ऑफिस, बिल्डींग, जळगाव यांच्या नावे अतिरिक्त प्रतीसह दिनांक 9
डिसेंबर 2013 पर्यंत अथवा तत्पूर्वी पोहचेल अशा बेताने पाठवावी. तदनंतर आलेल्या
तक्रारींवर कारवाई केली जाईल. परंतू त्यांचा डाक अदालत अंतर्गत विचार केला जाणार
नाही. तरी संबंधितानी डाक अदालतीचा लाभ घ्यावा असे आवाहन अधिक्षक डाकघर, जळगाव विभाग, जळगाव
यांनी केले आहे.
*
* * * * *
ना. एकनाथराव खडसे यांचा जळगाव जिल्हा दौरा कार्यक्रम
जळगाव, दि.17 :- महाराष्ट्र विधानसभेचे
विरोधी पक्षनेते ना. एकनाथराव खडसे यांचा जळगाव जिल्हा दौरा कार्यक्रम
पुढीलप्रमाणे आहे.
मंगळवार दिनांक 19 नोव्हेंबर 2013 रोजी पहाटे 2. 25
वा. जळगाव रेल्वे स्थानक येथे आगमन व
शासकीय वाहनाने निवासस्थानाकडे प्रयाण, सकाळी 2.40 वा. मुक्ताई बंगला शिवराम नगर,
जळगाव येथे आगमन व राखीव, सकाळी 11 वा.
डी. पी. डी. सी. बैठक ( स्थळ : अल्पबचत भवन, जिल्हाधिकारी, कार्यालय, जळगाव)
सोईनुसार शासकीय वाहनाने कोथळी ता. मुक्ताईनगरकडे प्रयाण, बुधवार दिनांक 20
नोव्हेंबर 2013 रोजी सकाळी 10.00 वा. मुक्ताईनगर येथुन बु-हाणपुर (मध्यप्रदेश) कडे
प्रयाण, दुपारी 4.00 वा. ब-हापूर (मध्यप्रदेश) येथुन मुक्ताईनगर जि. जळगावकडे
प्रयाण, सायं. 6.00 वा. मुक्ताईनगर जि. जळगाव येथे आगमन व राखीव, रात्री 10.40 वा.
अमरावती एक्सप्रेसने भुसावळ रेल्वेस्थानक येथुन मुंबईकडे प्रयाण
*
* * * * *
No comments:
Post a Comment