बालकामगार
प्रथेचे समुळ उच्चाटनासाठी
समाजाचा
सहभाग अपेक्षित
: धनंजय निकम
जळगाव, दि. 22 :- बालकामगार
प्रथेचे समुळ उच्चाटन करण्यासाठी सक्रीय सहभाग अपेक्षित आहे असे मत निवासी
उपजिल्हाधिकारी धनंजय निकम यांनी आज व्यक्त केले. बालकामगार, असंघटीत कामगार,
वेठबिगार, शेतमजूर आदि समित्यांची बैठक धनंजय निकम त्यांच्या अध्यक्षतेत त्यांच्या
दालनात झाली. श्री. निकम पुढे म्हणाले, बालकामगार प्रथेचे समुळ उच्चाटनासाठी शासन
विविध उपाय योजना करीत असून समाजात बालकामगारांचे प्रमाण कमी झाल्याचे दिसते. आपण दैनंदिन जीवनात वावरतांना
बालकामगार आढळल्यास, त्या व्यावसायिकाने बाल कामगार ठेवल्यास गंभीर कायदेशिर
कार्यवाही होवू शकते याची जाणीव करुन दयावी व सहाय्यक कामगार आयुक्त
कार्यालयास माहिती दयावी.
प्रारंभी सहाय्यक कामगार आयुक्त
जे. जी. दाभाडे यांनी बालकामगार कृतीदला मार्फत टाकण्यात येणा-या धाडीची माहिती
दिली. जिल्हयात 19 बालकामगार शाळा आहेत 1190 बालकामगारांना शिक्षणाच्या मुख्य
प्रवाहात आणले असून बालकामगार मुक्त पोलीस स्टेशन, ग्राम पंचायत आणि संकल्पना बाबत
माहिती देवून उपस्थितांचे आभार मानले
*
* * * * * * *
No comments:
Post a Comment