माहितीपट महोत्सवाचे 23 नोव्हेंबरला
जळगावात आयोजन
जळगाव, दिनांक 13 :- चित्रपट निर्मितीच्या शताब्दी वर्षानिमित्ताने
सांस्कृतीक कार्य विभागाकडून प्रत्येक जिल्हयात लघुपट व माहितीपट प्रदर्शन
महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. जळगाव येथे नटवर सिनेमागृहात 23 व 24 नोव्हेंबर
रोजी लघुपट व माहितीपट महोत्सवाचे आयोजन केले जात आहे. या महोत्सवाच्या आयोजनासाठी
निवासी उपजिल्हाधिकारी धनंजय निकम यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या दालनात आज
पहिली बैठक झाली.
या लघुपट व माहितीपट महोत्सवात 5 लघुपट व 5 माहितीपट प्रदर्शित केले जात असून नटवर
सिनेमागृहाच्या स्क्रिन क्रमांक दोनवर याचे प्रदर्शन केले जाणार आहे. जिल्हयातील
18 वर्षावरील सर्व रसिकांसाठी हा महोत्सव विनाशुल्क खुला आहे. या महोत्सवात
प्रदर्शित होणारे लघुपट मुक्ती, भिंतीमागे, कोलाज, कातळ, विवर - द ब्लॅक होल, असे
असून माहितीपट - देवराई, व्हि. बाबासाहेब, मुंबई ट्रेन हॉकर्स,सावित्री, मन्माया
या पारितोषिक प्राप्त कलाकृतीचा समावेश आहे.
या बैठकीस जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाच्या उप मुख्य
कार्यकारी अधिकारी श्रीमती मिनल कुटे, महानगर पालिकेचे उपआयुक्त अविनाश गांगुडे, अनिल
भोळे, शंभू पाटील, दिपक चांदोरकर, हेमंत काळुंखे, विनोद ढगे आदि मान्यवर उपस्थित
होते.
*
* * * * * * * *
सूक्ष्म व लघु उपक्रमासाठी 22 नोव्हेंबर रोजी कार्यशाळा
जळगाव, दिनांक 13 :- नॅशनल स्मॉल इंड्रस्टीज
कारपोरेशन लि. ( एनएसआयसी) नाशिक तर्फे सूक्ष्म व लघु उपक्रमासाठी दिनांक 22
नोव्हेंबर 2013 रोजी सकाळी 10 वाजता एक
दिवशी कार्यशाळा जिल्हा उद्योग केंद्र जळगाव येथे आयोजित करण्यात आली आहे. सदर
कार्यशाळेत मान्यवरांचे मार्गदर्शन लाभणार असून कार्यशाळेमध्ये एनएसआयसी
रजिस्टेशन, निविदा प्रक्रियेबाबत मार्गदर्शन, केंद्र शासन / शासकीय कार्यालय खरेदी
प्रक्रियामध्ये सूक्ष्म व लघु उद्योग घटकांना प्राधान्य, अनु .जाती / जमाती
प्रवर्गतील उद्योजकांना रजिष्टेशन मध्ये विशेष सवलत या विषयवर चर्चा होणार आहे.
जिल्हा उद्योग केंद्र, जळगाव तर्फे
जिल्हयातील सर्व अस्तित्वात असलेले सूक्ष्म व लघु उद्योगांनी सदर कार्यशाळेस
उपस्थित रहावे असे आवाहन प्र. महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र जळगाव यांनी
केले आहे.
*
* * * * * * * *
जिल्हा परिषदेचा सन 2012-2013 वार्षिक अहवाल प्रसिध्द
जळगाव, दिनांक 13 :- जिल्हा परिषद
व पंचायत समित्या ( वार्षिक प्रशासन अहवाल) नियम 1964 मधील नियम 9 अन्वये जिल्हा परिषदेचा सन 2012-2013 चा वार्षिक प्रशासन अहवाल जिल्हा परिषद ठराव
क्र. 170 नुसार दिनांक 9 ऑक्टोबर 2013
रोजी मंजूर करण्यात आला आहे. असे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी
श्रीमती शीतल उगले यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
*
* * * * * * * *
निवृत्तीवेतनधारकांनी 20 नोव्हेंबर पूर्वी
हयातीचे दाखला सादर करावेत
जळगाव, दि. 13 :- जळगाव कोषागारामार्फत निवृत्तीवेतन घेणा-या राज्य
निवृत्तीवेतन धारकांचे व इतर राज्य निवृत्ती वेतन / कुटूंब निवृत्तीवेतन धारकांनी
1 नोव्हेंबर रोजी निवृत्तीवेतन धारक हयात असल्याचे व पुनर्विवाह न केल्याचे
प्रमाणपत्र कोषागारास संबंधीत बँकेमार्फत सादर करणे आवश्यक आहे. प्रमाणपत्र, दाखला प्राप्त न झाल्यास माहे
डिसेंबर 2013 चे निवृत्तीवेतन थांबविण्याबाबत आदेश आहेत. तरी संबंधीतानी हयातीचे
दाखले संबंधीत बँकेस दिनांक 20 नोव्हेंबर 2013 पावेतो सादर करावे असे आवाहन जिल्हा
कोषागार अधिकारी,शि. बा. नाईकवाडे यांनी
केले आहे.
*
* * * * * * * *
बेरोजगारांनी बीज भांडवल कर्ज योजनेचा लाभ
घ्यावा
जळगाव, दि. 13 :- अण्णासाहेब पाटील आर्थिक
मागास विकास महामंडळामार्फत राबविण्यात येणा-या बीज भांडवल कर्ज योजनेच्या
माहितीसाठी आर्थिकदृष्टया दुर्बल घटकांतील सुशिक्षित बेरोजगारांनी जिल्हा रोजगार व
स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक संचालक जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र
जळगाव यांनी केले आहे. आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील सुशिक्षित बेरोजगारांसाठी
रोजगार व स्वयंरोजगारांच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक
मागास विकास महामंडळाची स्थापना करण्यात आलेली आहे. ज्या प्रवर्गाकरिता शासनाचे
महामंडळ नाही अशा प्रवर्गातील आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील सुशिक्षित
बेरोजगारांच्या आर्थिक उन्नतीचा मार्ग खुला करण्यासाठी स्वयंरोजगाराच्या योजना
राबवून त्यात येणा-या अडचणी दूर करणे हा या महामंडळाचा उद्देश आहे.
*
* * * * * * * *
23 नोव्हेंबर रोजी महालोक अदालतचे आयोजन
जळगाव, दिनांक 13 :- सदस्य सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जळगाव
यांच्यामार्फत कामगार न्यायालय, जळगाव येथील
प्रलंबीत असलेले खटले, तडजोडीने व लवकरात लवकर निपटारा करण्यासाठी शनिवार
दिनांक 23 नोव्हेंबर 2013 रोजी सकाळी 10.30 वाजता कामगार न्यायालय परिसर, जुने बी.
जे. मार्केट , 3 रा मजला जी गाळा, जळगाव
येथे महालोक अदालत घेण्यात येणार आहे.
कामगार न्यायालयात प्रलंबित
असलेल्या केसेस ज्यांना महालोक अदालतमध्ये ठेवावयाच्या असतील त्या सर्व संबंधीतानी
स्वत: वकीलांमार्फत, प्रतिनिधीमार्फत महालोक अदालतमध्ये प्रकरण ठेवण्याबाबतचे
संमतीपत्रक भरुन द्यावे, असे आवाहन
न्यायालय अधिक्षक श्री. अशोग पानपाटील यांनी केले आहे.
*
* * * * * * * *
No comments:
Post a Comment