जिल्हा विकास निधी मुदतीत खर्च करण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश
जळगाव, दिनांक 19 - जिल्हा नियोजन समितीने जिल्ह्यातील विकासासाठी मंजूर केलेला निधी संबंधित विभागांनी विहीत मुदतीत खर्च करावा, असे स्पष्ट निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री संजय सावकारे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बेठकीत दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात असणा-या अल्पबचत सभागृहात आयोजित बेठकीच्या अध्यक्षस्थानी राज्याचे कृषी राज्यमंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री संजय सावकारे हे होते. या बेठकीस राज्य विधानसभेचे विरोधीपक्ष नेते एकनाथराव खडसे, खा. ए.टी.पाटील, जि.प. अध्यक्ष दिलीप खोडपे, जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर, जि.प.मुख्यकार्यकारी अधिकारी शीतल उगले आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी विविध विभागांनी माहे आक्टॊबर अखेर केलेल्या खर्चाचा आढावा तसेच पुढ़ील खर्चाचे नियोजन सादर करण्यात आले. यावेळी झालेल्या चर्चेत आ. गिरीश महाजन, आ. कृषीभूषण पाटील, आ. चिमणराव पाटील, आ. मनिष जेन, आ. शिरीष चोधरी, आ. राजीव देशमुख तसेच अन्य सदस्यांनी सहभाग घेऊन मोलिक सुचना मांडल्या. खर्च होऊ न शकणारा निधीचे पुनर्विनियोजन करुन अन्य विकासकामांसाठी हा निधी वळवावा, अशी सुचनाही पालकंत्र्यांनी यावेळी केली.
No comments:
Post a Comment