Wednesday, 27 November 2013

पालकमंत्री थेट जनतेपर्यंत… माणूसकीचे अनोखे दर्शन


पालकमंत्री थेट जनतेपर्यंत… माणूसकीचे अनोखे दर्शन
                                                                                                                                                                                                                                                                                                                                                            
जनता दरबार; अनेक प्रयत्न करुनही शासन दरबारी सामान्य जनतेची काही प्रकरणे प्रलंबित राहतात. अशावेळी जनतेने दाद मागावी तरी कोणा कडे? तर ती आपल्याच लोकप्रतिनिधींकडे. जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री संजय सावकारे यांनी जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री पद स्विकारल्यापासून जिल्ह्यातील अनेक  प्रश्नांची निर्गत करण्याचा सपाटा चालवलाय. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून त्यांनी  सुरु केलेल्या जनता दरबार या उपक्रमाकडे पाहता येईल. सामान्य जनता आपल्या मागण्यांचे निवेदन मंत्रीमहोदयांकडे सादर करते आणि याच दरबारात संबंधित विभागाच्या अधिका-यांना त्या तक्रारीची सोडवणूक करण्याच्या सुचना दिल्या जातात. हा उपक्रम सुरु झाल्यापासून जिल्ह्याचे पालकमंत्री संजय सावकारे यांच्या जनतादरबार कार्यक्रमास नागरिकांनी मोठया प्रमाणावर प्रतिसाद देवून आपली गा-हाणी  पालकमंत्र्यांच्या  समक्ष मांडली आहेत आणि यातून अनेक प्रश्नांची सोडवणूक झाली आहे.
जळगाव जिल्ह्यात विविध पतसंस्थांत अडकलेल्या  ठेवींचा प्रश्नही असाच बिकट. या प्रश्नांची गुंतागुंत आणि त्याच्याशी  निगडीत सामाजिक बाजू लक्षात घेता पालकमंत्र्यांनी या प्रश्नाची सोडवणूक करण्यास नेहमीच प्राधान्य दिले आहे. त्याचे दृष्य परिणाम आता समोर येऊ लागले आहेत. आता अनेक ठेविदारांचे अडकलेले पैसे मिळू लागले आहेत, हा पालकमंत्र्यांच्या धडाडीचाच परिणाम.
मंगळवार दि.26 नोव्हेंबर 2013 रोजी आयोजित जनता दरबारालाही लोकांचा मोठा प्रतिसाद लाभला. पालकमंत्री जनतेची निवेदने स्विकारत होते, त्या त्या विभागाकडे निवेदन सोपवित होते. प्रत्येक तक्रारदाराला प्रश्नाची सोडवणूक करण्याचे ठोस आश्वासन मिळत होते. खरेतर जनता दरबारात सामान्यतः जनतेने पालकमंत्र्यांच्या समोर जावून निवेदन देणे हे अपेक्षित होते. मात्र बाहेर निवेदने घेऊन लोकांची रांगच लागली होती. त्यात अनेक ज्येष्ठ नागरिक, महिलांचा समावेश होता. गर्दी वाढतच होती.
बाहेरच्या गर्दीचा पालकमंत्र्यांना अंदाज आला. त्यांनी आतून सुचना पाठविली. ‘ठेवीदार संघटनेने बाहेर हिरवळीवर बसा, मी तेथे येतो.’ ठेवीदार संघटनेचे लोक बाहेर गेले. तरीही गर्दी कायम होती. अखेर पालकमंत्री स्वतः बाहेर आले. आणि एक अनोखेच दृष्य पहावयास मिळाले. लोक आपल्या तक्रारी, निवेदने घेऊन उभे होते आणि पालकमंत्री संजय सावकारे स्वतः प्रत्येकाजवळ जाऊन त्यांचे निवेदन स्विकारत त्यांची गा-हाणी  ऎकत होते. पालकमंत्र्यांचा हा पवित्रा पाहून उपस्थितांना आश्चर्यच वाटले. निवेदने घेऊन आलेल्या जनतेच्या आश्चर्याला तर पारावारच उरला नव्हता. कारण थेट जनतेपर्यंत येऊन पोहोचणारा आणि आस्थेवाईकपणे विचारपूस करणारा पालकमंत्री ते प्रथमच पाहत होते.
रांगेतल्या लोकांची निवेदने स्विकारल्यानंतर पालकमंत्री थेट विश्रामगृहाच्या हिरवळीकडे निघाले. तेथे बसलेल्या ठेवीदार संघटनेच्या लोकांनी पालकमंत्री आपल्याकडे येतायेत, असे पाहून एकच जयजयकार सुरु केला. त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी पालकमंत्र्यांना बसण्यासाठी खुर्च्यांची सोय करण्यात आली होती. परंतू त्यांनी ही खूर्ची नाकारली आणि थेट ठेविदारांमध्ये  मांडी घालून बसले. मंत्रीमहोदयांसमवेत असणा-या अधिका-यांनाही मग मांडी घालून बसावे लागले. यथासांग चर्चेनंतर ठेविदारांना ठोस आश्वासन मिळालेच पण जनतेप्रती  बांधिलकी असणारा आणि ती प्रत्यक्ष कृतीतून जपणा-या पालकमंत्र्यांतल्या ‘माणूसकी’च्या दर्शनाने सारेच भारावले होते.
यावेळच्या जनता दरबारात  सहकार विभागाच्या -42 , महसूल -35 जिल्हा परिषद -14, जिल्हा रुणालय-01, शिक्षण -03,  पोलीस विभाग -04, एस. टी. 04, सार्वजनिक बांधकाम - 02, लघुसिंचन -01,   महानगर पालिका- 02 कृषी विभाग- 01 ,    महाराष्ट्र वीज. वितरण कंपनी- 03, भूमि अभिलेख - 03, पाणी पुरवठा- 01, समाजकल्याण -01,  वन विभाग-  01, - वीज निर्मिती 02 -अशा  एकूण 120 तक्रारी दाखल झाल्यात.


             ·         मिलिंद मधुकर दुसाने, माहिती अधिकारी, जळगाव

Monday, 25 November 2013

आहरण व संवितरण अधिका-यांनी सेवाप्रणालीत बँक शाखा, खाते क्रमांकाची माहिती अदयावत करावी

आहरण व संवितरण अधिका-यांनी सेवाप्रणालीत
बँक शाखा, खाते क्रमांकाची माहिती अदयावत करावी

               जळगाव, दिनांक 25 :- सेवार्थ प्रणालीमध्ये बँक शाखा, खाते क्रमांक संबंधीची माहिती अदयावत करण्यासाठी  Assistant Login / D D O Login वर दिनांक 30 नोव्हेंबर 2013 पर्यत सुविधा उपलब्ध करण्यात आलेली असून, सदर सुविधा दिनांक 30 नोव्हेंबर 2013 पर्यंतच उपलब्ध असल्याने माहिती अदयावत करण्याची दक्षता जळगाव कोषागाराच्या अधिनस्त असलेल्या सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांनी घ्यावी. सदर सुचना सेवार्थ प्रणालीच्या Home Page वर प्रसारीत करण्यात आलेली आहे. असे जिल्हा कोषागार अधिकारी शि. बा. नाईकवाडे यांनी कळविले आहे.

* * * * * * * *

आज जनता दरबार   

                 जळगाव,दि. 25 :- कृषी, पशुसंवर्धन, दुग्धविकास, रोजगार व स्वयंरोजगार, सामाजिक न्याय आणि भटक्या व विमुक्त जातींचे कल्याण राज्यमंत्री तथा जळगाव जिल्हयाचे पालकमंत्री  संजय सावकारे यांचा जनता दरबार कार्यक्रम   मंगळवार दिनांक 26 नोव्हेंबर 2013  रोजी दुपारी 2.00 वाजता शासकीय विश्रामगृह  पदमालय, जळगाव येथे आयोजित केलेला आहे. या जनता दरबाराचा नागरिकांनी  लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी, ज्ञानेश्वर राजूरकर  जळगाव यांनी केले आहे.                                                                 


* * * * * * * *

Friday, 22 November 2013

बालकामगार प्रथेचे समुळ उच्चाटनासाठी समाजाचा सहभाग अपेक्षित

बालकामगार प्रथेचे समुळ उच्चाटनासाठी
समाजाचा सहभाग अपेक्षित
                                                           : धनंजय निकम

             जळगाव, दि. 22 :- बालकामगार प्रथेचे समुळ उच्चाटन करण्यासाठी सक्रीय सहभाग अपेक्षित आहे असे मत निवासी उपजिल्हाधिकारी धनंजय निकम यांनी आज व्यक्त केले. बालकामगार, असंघटीत कामगार, वेठबिगार, शेतमजूर आदि समित्यांची बैठक धनंजय निकम त्यांच्या अध्यक्षतेत त्यांच्या दालनात झाली. श्री. निकम पुढे म्हणाले, बालकामगार प्रथेचे समुळ उच्चाटनासाठी शासन विविध उपाय योजना करीत असून समाजात बालकामगारांचे प्रमाण कमी  झाल्याचे दिसते. आपण दैनंदिन जीवनात वावरतांना बालकामगार आढळल्यास, त्या व्यावसायिकाने बाल कामगार ठेवल्यास गंभीर कायदेशिर कार्यवाही होवू शकते याची जाणीव करुन दयावी व सहाय्यक कामगार  आयुक्त  कार्यालयास माहिती दयावी.
            प्रारंभी सहाय्यक कामगार आयुक्त जे. जी. दाभाडे यांनी बालकामगार कृतीदला मार्फत टाकण्यात येणा-या धाडीची माहिती दिली. जिल्हयात 19 बालकामगार शाळा आहेत 1190 बालकामगारांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणले असून बालकामगार मुक्त पोलीस स्टेशन, ग्राम पंचायत आणि संकल्पना बाबत माहिती देवून उपस्थितांचे आभार मानले


* * * * * * * *

Thursday, 21 November 2013

आदिवासी उमेदवारांकरिता 1 डिसेंबर रोजी प्रशिक्षण

आदिवासी उमेदवारांरिता 1 डिसेंबर रोजी प्रशिक्षण  

             जळगाव, दि 21 :-  आदिवासी उमेदवारांकरिता रोजगार व स्वयंरोजगार माहिती व मार्गदर्शन केंद्र रावेर येथे दिनांक 1 डिसेंबर 2013 पासून 85 वे प्रशिक्षण सत्र सुरु होत आहे.
            प्रशिक्षनात आदिवासी उमेदवारांना विविध संस्थामार्फत घेतल्या जाणा-या स्पर्धा (इंग्रजी, सामान्य ज्ञान, गणित, बौधिक चाचणी ) परीक्षांची तयारी करुन घेतली जाते.  प्रशिक्षणाकरिता उमेदवारांची शैक्षणिक पात्रता कमीत कमी एस. एस. सी . पास, वय 18 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे. उमेदवार आदिवासी (अनु. जमाती) या प्रवर्गाचा असावा. प्रशिक्षणाचा कालावधी साडेतीन महिन्याचा असून प्रशिक्षण काळात प्रशिक्षणार्थी उमेदवारांना दरमहा 1 हजार विद्यावेतन देण्यात येते.
            प्रशिक्षणाकरिता इच्छुक उमेदवारांनी त्यांचे अर्ज मूळ शैक्षणिक प्रमाणपत्रांच्या साक्षांकित प्रती, दोन पासपोर्ट साईज फोटो व जातीच्या दाखल्याच्या साक्षांकित छायाप्रतीसह दिनांक 28 नोव्हेंबर 2013 पर्यंत आदिवासी उमेदवारांकरिता रोजगार व स्वयंरोजगार माहिती व मार्गदर्शन केंद्र, प्लॉट नं. 2, शनि मंदीरामागे, स्टेशन रोड, पंचायत समिती जवळ, रावेर, जि. जळगाव येथे हजर रहावे. यापूर्वी या कार्यालयामार्फत प्रशिक्षण घेतलेल्या उमेदवारांनी प्रशिक्षणासाठी हजर राहू नये .
            प्रशिक्षणाच्या साडेतीन महिन्याच्या कालावधीत उमेदवारांना राहण्याची व भोजनाची व्यवस्था स्वत: करावी लागेल. तसेच मुलाखतीसाठी येतांना कोणताही प्रवासखर्च दिला जाणार नाही. मुलाखतीची तारीख यथावकाश कळविण्यात येईल. असे रावेर रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन अधिकारी बी. व्ही. मोरे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.


* * * * * * * *

Wednesday, 20 November 2013

क्रीडा संकुलातील सुरक्षा रक्षकांचे वेतन तत्काळ अदा करा : जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर

क्रीडा संकुलातील सुरक्षा रक्षकांचे वेतन तत्काळ अदा करा
: जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर

          जळगाव, दिनांक 20 :-  गेल्या चार महिन्यापासून थकित असलेले जिल्हा क्रीडा संकुलातील सुरक्षा रक्षकांचे वेतन तत्काळ अदा करावे अशा सूचना जिल्हा क्रीडा संकुल कार्यकारी समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर यांनी आज दिल्या जिल्हा क्रीडा संकुल कार्यकारी समितीची बैठक आज दुपारी त्यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या दालनात झाली त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी शीतल उगले, जिल्हा पोलिस अधीक्षक एस. जयकुमार, आदि समितीचे  सदस्य उपस्थित होते.  
          जिल्हाधिकारी राजूकर पुढे म्हणाले, क्रीडा संकुलातील भाडयाने दयावयाचे गाळयाची जाहिरात करुन अर्ज मागविण्यात यावेत. गाळयाचे भाडे हे बाजारमूल्य व नगररचना कार्यालयाकडून निश्चित करुन घ्यावे.
            जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी बैठकीत क्रीडा संकुलाचा देखभाल दुरुस्तीचा खर्च संकुलाच्या उत्पन्नातूनच भागविण्यात येईल याप्रमाणे नियोजन करावे असे सांगून मिळकतीचे स्त्रोत वाढवितांना क्रीडा संकुलाची भव्यता व नैसर्गिक सौदर्य विद्रूप होणार नाही याची काळजी घ्यावी.
            जिल्हा पोलिस अधीक्षक एस. जयकुमार यांनी जिल्हा क्रीडा संकुल हे व्यवसायीक नफा मिळविणारी संस्था नसून क्रीडा प्रकारांना प्रोत्साहन देऊन राष्ट्रीयस्तरावर क्रीडापटू  निर्माण करणारी सेवाभावी संस्था असल्याचे सांगून सभासद फी अथवा इतर फी आकारतांना या मूळ संकल्पनेला ठेच लागणार नाही याची काळजी घ्यावी.
        सभेचे प्रास्ताविक, संचलन व आभार प्रदर्शन जिल्हा क्रीडा संकुल कार्यकारी  समितीच्या सदस्य सचिव तथा जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील यांनी केले.

* * * * * * * *

पारोळा व चाळीसगाव येथे माजी सैनिकांच्या बैठकीचे आयोजन

              जळगाव, दिनांक 20 :- माजी सैनिक / विधवा व त्यांचे अवलंबितांच्या अडीअडचणी सोडविण्याकरिता पारोळा  येथे दिनांक 25 नोव्हेंबर 2013  तर चाळीसगाव येथे 28 नोव्हेंबर 2013 रोजी  सकाळी 11.30 वाजता संबंधित तहसिलदारांच्या अध्यक्षतेखाली बैठकींचे आयोजन केले आहे. तरी संबंधित तालुक्यातील माजी सैनिक / अवलंबितांनी त्यांच्या अडीअडचणी असल्यास लेखी स्वरुपात दोन प्रतीत आणाव्यात व बैठकीस हजर राहून आपले प्रकरण तहसिलदारांना पुढील कार्यवाहीसाठी सादर करावे असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कॅप्टन मोहन कुलकर्णी यांनी केले आहे. 

* * * * * * * *

सेवानिवृत्त डाक कर्मचा-यांची 16 डिसेंबर रोजी पेन्शन अदालत

            जळगाव, दि. 20 :- डाक विभागातर्फे सेवानिवृत्त झालेल्या डाक कर्मचा-यांच्या पेन्शन विषयी तक्रारी समजुन घेण्यासाठी  16 डिसेंबर 2013 रोजी सकाळी 11 वाजता पेन्शन अदालत डाक अधिक्षक जळगाव विभाग यांचे कार्यालयात आयोजित करण्यात येणार आहे.
         जळगाव डाक विभागातील सेवानिवृत्त कर्मचा-यांच्या पेन्शन विषयीच्या ज्या तक्रारींचे निवारण सहा आठवडयांच्या आत झालेले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नसेल अशा तक्रारींची या पेन्शन अदालतमध्ये दखल घेतली जाईल असे आवाहन डाकघर अधिक्षक सु. मा. पाटील यांनी केले आहे.

* * * * * * * *

नैसर्गिक आपत्तीमध्ये नुकसानग्रस्त शेतक-यांना
8 कोटी 26 लाखाची आर्थिक मदत

           जळगावा, दिनांक 20 :-  माहे जानेवारी, फेब्रुवारी 2013 मध्ये नैसर्गिक आपत्तीमध्ये नुकसान झालेल्या शेतक-याना आर्थिक मदत जिल्हयाचे पालकमंत्री ना. संजय सावकारे यांच्या प्रयत्नाने जिल्हयास रुपये 8 कोटी 26 लाख, 85 हजाराची रक्कम प्राप्त झाली असून  जिल्हयातील बाधीत शेतक-याना वाटप करण्यात येणार आहे.
       जळगाव 1.95, भुसावळ 10.66, यावल 53.27, रावेर 664.70, मुक्ताईनगर 19.86, बोदवड 0.18, अमळनेर 1.70, चोपडा 26.06, पारोळा 32.71, एरंडोल 0.25, पाचोरा 1.15, भडगाव 9.63, चाळीसगाव 3.05,  जामनेर 1.71  असे एकूण  8 कोटी 26 लाख 85 हजार रक्कम प्राप्त झाली असल्याची माहिती जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी किसन मुळे यांनी दिली आहे.

* * * * * * * *

गिरणा प्रकल्पावरील पाणीसाठयासाठी
   शेतक-यांनी 20 डिसेंबर पर्यत पाणी अर्ज सादर करावेत

            जळगाव, दिनांक 20 :- गिरणा पाटबंधारे विभाग जळगाव अतर्गत गिरणा प्रकल्पावरील पांझण डावा कालवा, जामदा डावा कालवा व निम्न गिरणा कालव्याव्दारे कालवा प्रवाही, कालवा, उपसा, जलाशय उपसा, लाभक्षेत्रातील अधिसूचित नदी, नाले, ओढे वरुन उपसा सिंचनाने तसेच लाभक्षेत्रातील व 35 मीटर आतील विहिरीवरुन पाण्याचा लाभ घेणा-या सर्व लाभधारकांनी  गिरणा प्रकल्पात यावर्षी अंशत पाणीसाठा उपलब्ध झालेला आहे. त्यापैकी पिण्याचे पाण्याचे आरक्षण वगळून उर्वरित उपलब्ध पाणीसाठयातून    रब्बी हंगाम 2014 मधील उभी पीके तसेच विहिरीवरुन किंवा अन्य मार्गाने पाणीपुरवठयाची पर्यायी व्यवस्था असेल अशा लाभधारकांना गहू, हरबरा, ज्वारी, दादर, हा. दूरी, मका, कडवाळ, कपाशी, सुर्यफुल, करडई, भाजीपाला इत्यादी हंगामी पिकांना जानेवारी 2014 मध्ये दोन आर्वतनात सिंचनाचे पाण्याच्या उपलब्धतेनुसार सिंचनासाठी मर्यादित पाणी पुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. त्यादृष्टीने पिकांचे नियोजन करुन पाणी मागणी करावी.
           अटी व शर्तीच्या पूर्ततेसह नमुना नं. 7 , 7 अ व 7 ब चे पाणी अर्ज भरुन दिनांक 20 नोव्हेंबर 2013  ते 20 डिसेंबर 2013 या कालावधीत संबंधीत पाट शाखेच्या कार्यालयात कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अगर पोस्टाने देण्याचे करावे. सिंचनाच्या पाणी पुरवठयाच्या अटी व शर्ती नियमा नुसार राहतील असे आवाहन कार्यकारी अभियंता गिरणा पाटबंधारे विभाग, जळगाव यानी केले आहे.

* * * * * * * *

आता टपाल कार्यालयातून पाठवा मोबाईल मनिऑर्डर

               जळगाव, दिनांक 20  :- जळगाव विभागातील 6 टपाल कार्यालयात मोबाईल मनिऑर्डरची सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे. यात जळगाव हेड पोस्ट ऑफिस अमळनेर, धरणगाव, पारोळा, पाचोरा, चाळीसगाव येथे ही सुविधा उपलब्ध झाली आहे.
            कमी कमीशनमध्ये तत्काळ सेवेमध्ये रुपये 1 हजार ते 10 हजार पर्यंत मनिऑर्डर करता येईल.त्यासाठी कमीशन पुढीलप्रमाणे राहिल. रुपये 1 हजार ते 1500 पर्यत रुपये 45,रु.  1500 ते 5000 रु. 79  रुपये 5001 ते 10000 रुपये 112 असे राहिल.  कार्यालयातील काऊंटरवर पैसे जमा केल्यानंतर ज्यांना पैसे पाठवायचे आहे. त्याचा व आपला मोबाईल क्रमांक दयावा रक्कम जमा केल्यानंतर ज्या व्यक्तीला पैसे पाठवाचे आहे त्यास आणि पैसे जमा करणा-यास टपाल कार्यालयातून संदेश येईल. ज्या टपाल कार्यालयातून आपणास मोबाईल मनिऑर्डर घ्यावयाची आहे तेथे जाऊन हा  संदेश दाखवावा. आपल्या ओळखपत्राची एक झेरॉक्स प्रत दाखवावी आणि ती जमा करुन रक्कम घ्यावी. टपाल कार्यालयातून रक्कम दिल्यानंतर पुन्हा रक्कम भरणा-या आणि घेणा-यास मोबाईलवर संदेश येईल. ही  सेवा तत्काळ स्वरुपाची असल्याने त्याचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहन अधिक्षक डाकघर जळगाव यांनी केले आहे.

* * * * * * * *

अमळनेर येथे 25 रोजी वाळू साठयाचा लिलाव

            जळगाव, दि 20 :- मौजे. अमळनेर ( शहर तलाठी कार्यालय आवारात) वाळू साठयाचा लिलाव सन 2013-14 या कालावधीसाठी करण्यात येणार आहे. सदर प्रक्रिया दिनांक 25 नोंव्हेबर 2013 रोजी सकाळी 11 वाजता तहसिलदार, अमळनेर यांच्या दालनात पार पडणार आहे. इच्छूकांनी उपस्थित रहावे , असे आवाहन तहसिलदार, अमळनेर यांनी केले आहे.


* * * * * * * *

Tuesday, 19 November 2013

जिल्हा विकास निधी मुदतीत खर्च करण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश


जिल्हा विकास निधी मुदतीत खर्च करण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश

जळगाव, दिनांक 19 -  जिल्हा नियोजन समितीने जिल्ह्यातील विकासासाठी मंजूर केलेला निधी संबंधित विभागांनी विहीत मुदतीत खर्च करावा, असे स्पष्ट निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री संजय सावकारे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बेठकीत दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात असणा-या अल्पबचत सभागृहात आयोजित बेठकीच्या अध्यक्षस्थानी राज्याचे कृषी राज्यमंत्री  तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री संजय सावकारे हे होते. या बेठकीस राज्य विधानसभेचे विरोधीपक्ष नेते एकनाथराव खडसे, खा. ए.टी.पाटील,  जि.प. अध्यक्ष दिलीप खोडपे, जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर,  जि.प.मुख्यकार्यकारी अधिकारी शीतल उगले आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी विविध विभागांनी माहे आक्टॊबर अखेर  केलेल्या खर्चाचा आढावा तसेच पुढ़ील खर्चाचे नियोजन सादर करण्यात आले. यावेळी झालेल्या चर्चेत आ. गिरीश महाजन, आ. कृषीभूषण पाटील, आ. चिमणराव पाटील, आ. मनिष जेन, आ. शिरीष चोधरी, आ. राजीव देशमुख तसेच अन्य सदस्यांनी सहभाग घेऊन मोलिक सुचना मांडल्या.  खर्च होऊ न शकणारा निधीचे पुनर्विनियोजन करुन अन्य विकासकामांसाठी हा निधी वळवावा, अशी सुचनाही पालकंत्र्यांनी यावेळी केली.

                                               * * * * * * * *

Monday, 18 November 2013

साखर कारखानदारी जगविण्यासाठी शासन प्रयत्नशिल- आर.आर.पाटील


साखर कारखानदारी जगविण्यासाठी शासन प्रयत्नशिल : आर.आर.पाटील

जळगाव, दि.18- राज्यातील सहकारी साखर कारखानदारीपुढे आज अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. अशा परिस्थितीत काही धोरणात्मक निर्णय घेऊन राज्याला सहकाराने समृद्ध अशी  देशस्तरावर ऒळख  देणा-या साखर कारखानदारीला उर्जितावस्था प्राप्त करुन देण्यासाठी शासन प्रयत्नशिल आहे, असे प्रतिपादन राज्याचे गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी आज चोपडा येथे केले.
राज्याचे गृहमंत्री आर.आर. पाटील  यांच्या हस्ते चोपडा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या   20 व्या गळीत हंगामाचा प्रारंभ करण्यात आला, त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, सहकाराने समृद्ध अशीही महाराष्ट्राची ओळख आहे. आज या सहकारी साखर कारखानदारी समोर अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. परंतू त्यातून मार्ग काढून हे क्षेत्र वाचवायचे आहे, कारण त्यावर अवलंबून असणारा शेतकरी आम्हाला जगवायचा आहे. यासाठी साखरेची आयात कमी करणे, निर्यात अनुदान वाढविणे, सहकारी कारखान्यांना खरेदी करातून सवलत देणे,  मळीवरचे निर्बंध उठविणे, अशा उपायांची अंमलबजावणी व्हावी यासाठी आम्ही पाठपुरावा करु असे त्यांनी यावेळी उपस्थितांना आश्वस्त केले.
चहार्डी, ता.चोपडा जि. जळगाव येथील चोपडा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या 20 व्या गळीत हंगामाचा शुभारंभ गृहमंत्री आर.आर.पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. तर प्रमुख अतिथी म्हणून जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री संजय सावकारे उपस्थित होते.
याप्रसंगी पालकमंत्र्यांच्या हस्ते वजन काटा पूजन करण्यात आले. पालकमंत्र्यांनी आपल्या भाषणात जिल्ह्यातील काळी ज्वारी खरेदी करण्याचा मुद्दा उपस्थित केला. यावरही  गृहमंत्र्यांनी शेतक-यांना न्याय देण्याचीच आपली भूमिका असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमास आमदार जगदिशचंद्र वळवी, जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर,जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी शितल उगले,  माजी आमदार डॉ. सुरेश जी. पाटील, दिलीपराव सोनवणे,  कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश शामराव पाटील, व्हॉ. चेअरमन चंद्रहास गुजराथी, कार्यकारी संचालक उद्धव दिवेकर , ॲड. रविंद्र पाटील तसेच संचालक मंडळ व सभासद तसेच ग्रामस्थ शेतकरी उपस्थित होते.


* * * * * * *

Sunday, 17 November 2013

जिल्हा नियोजन समितीची 19 नोव्हेंबर रोजी सभा

जिल्हा नियोजन समितीची 19 नोव्हेंबर रोजी सभा

             जळगाव, दिनांक 17 :- जिल्हा नियोजन समितीची  दिनांक 18 नोव्हेंबर 2013 रोजीची आयोजित बैठक रद्द झाली असून सदरची बैठक आता  दिनांक 19 नोव्हेंबर 2013 रोजी सकाळी 11.00 वाजता जिहाधिकारी कार्यालयाच्या अल्पबचत भवन येथे  राज्याचे कृषी, पशुसंवर्धन, दुग्धविकास, रोजगार व स्वयंरोजगार, सामाजिक न्याय, व्यसनमुक्ती कार्य, विमुक्त भटक्या जमाती व इतर मागासवर्गीय कल्याण तथा जळगाव जिल्हयाचे  पालकमंत्री संजय सावकारे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केली आहे. बैठकीचे विषय 31 ऑक्टोबर 2013 रोजीच्या अजेंडयात नमूद केल्या नुसारच राहतील. तरी सर्व संबंधितांनी बैठकीस उपस्थित रहावे. असे आवाहन  ज्ञानेश्वर राजूरकर जिल्हाधिकारी तथा सदस्य सचिव जिल्हा नियोजन समिती, जळगाव यांनी केले आहे.

* * * * * *

माजी सैनिक तालुका समितीची 25 नोव्हेंबर रोजी बैठक

              जळगाव, दिनांक 17 :- पारोळा व चाळीसगाव तालुक्यातील माजी सैनिक / विधवा व त्यांचे अवलंबितांच्या अडीअडचणी सोडविण्याकरिता दिनांक 25 नोव्हेंबर 2013 रोजी सकाळी 11.30 वाजता संबंधित तहसिलदांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केली आहे. तरी संबंधित तालुक्यातील माजी सैनिक / अवलंबितांनी त्यांच्या अडीअडचणी असल्यास लेखी स्वरुपात दोन प्रतीत आणाव्यात व बैठकीस हजर राहून आपले प्रकरण तहसिलदारांना पुढील कार्यवाहीसाठी सादर करावे असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कॅप्टन मोहन कुलकर्णी यांनी केले आहे.

* * * * * *

आजचा सैनिक दरबार कार्यक्रम रद्द

             जळगाव, दिनांक 17 - जिल्हाधिकारी कार्यालय येथील दिनांक 19 नोव्हेंबर रोजी आयोजित सैनिक दरबार कार्यक्रम काही अपरीहार्य कारणामुळे रद्द करण्यात आला आहे. सैनिक दरबार कार्यक्रमाचे सुधारीत तारीख नंतर कळविण्यात येईल तरी संबंधितांनी नोंद घ्यावी असे सैनिक कल्याण अधिकारी, जळगाव यांनी कळविले आहे.

* * * * * *

16 डिसेंबर रोजी डाक अदालत

            जळगाव, दिनांक 17 :- पोस्टाच्या टपाल, स्पीड, पोस्ट, काउंटर सेवा, डाक वस्तु, पार्सल, बचत बॅक, मनीऑर्डर आदि कामासंबंधीच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी अधिक्षक डाकघर जळगाव येथे दिनांक 16 डिसेंबर 2013 रोजी सकाळी 11 वाजता  डाक अदालतचे आयोजन करण्यात आलेले आहे.
         सदर पोस्टाच्या कामासंबंधीच्या ज्या तक्रारींचे सहा आठवडयाच्या आत निराकरण झाले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नसेल, अशा तक्रारींची दखल डाक अदालतमध्ये घेण्यात येणार आहे.
         तरी संबंधितांनी डाक सेवेबाबतची आपली तक्रार दोन प्रतीत सहाय्यक अधिक्षक (मुख्यालय) एम. एस. जगदाळे  यांचे कार्यालय पहिला माळा, हेड पोस्ट ऑफिस, बिल्डींग, जळगाव यांच्या नावे अतिरिक्त प्रतीसह दिनांक 9 डिसेंबर 2013 पर्यंत अथवा तत्पूर्वी पोहचेल अशा बेताने पाठवावी. तदनंतर आलेल्या तक्रारींवर कारवाई केली जाईल. परंतू त्यांचा डाक अदालत अंतर्गत विचार केला जाणार नाही. तरी संबंधितानी डाक अदालतीचा लाभ घ्यावा  असे आवाहन अधिक्षक डाकघर, जळगाव विभाग, जळगाव यांनी केले आहे.

* * * * * *

ना. एकनाथराव खडसे यांचा जळगाव जिल्हा दौरा कार्यक्रम

          जळगाव, दि.17 :- महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते ना. एकनाथराव खडसे यांचा जळगाव जिल्हा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
          मंगळवार  दिनांक 19 नोव्हेंबर 2013 रोजी पहाटे 2. 25 वा.  जळगाव रेल्वे स्थानक येथे आगमन व शासकीय वाहनाने निवासस्थानाकडे प्रयाण, सकाळी 2.40 वा. मुक्ताई बंगला शिवराम नगर, जळगाव येथे आगमन व राखीव,  सकाळी 11 वा. डी. पी. डी. सी. बैठक ( स्थळ : अल्पबचत भवन, जिल्हाधिकारी, कार्यालय, जळगाव) सोईनुसार शासकीय वाहनाने कोथळी ता. मुक्ताईनगरकडे प्रयाण, बुधवार दिनांक 20 नोव्हेंबर 2013 रोजी सकाळी 10.00 वा. मुक्ताईनगर येथुन बु-हाणपुर (मध्यप्रदेश) कडे प्रयाण, दुपारी 4.00 वा. ब-हापूर (मध्यप्रदेश) येथुन मुक्ताईनगर जि. जळगावकडे प्रयाण, सायं. 6.00 वा. मुक्ताईनगर जि. जळगाव येथे आगमन व राखीव, रात्री 10.40 वा. अमरावती एक्सप्रेसने भुसावळ रेल्वेस्थानक येथुन मुंबईकडे प्रयाण


* * * * * *

Saturday, 16 November 2013

माध्यमांची जबाबदारी नैतिकतेच्या वकीलीची : विनोद रापतवार यांचे प्रतिपादन


माध्यमांची जबाबदारी नैतिकतेच्या वकीलीची
: विनोद रापतवार यांचे प्रतिपादन

जळगाव, दिनांक 16 -  लोकशाहीचा चवथा स्तंभ असणा-या माध्यमांवर नैतिकतेच्या धोरणांची वकीली करण्याची जबाबदारी आहे ,असे प्रतिपादन जैन उद्योग समूहाचे जनसंपर्क अधिकारी विनोद रापतवार यांनी आज येथे केले.
            राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त जिल्हा माहिती कार्यालय, जळगाव व जळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघ, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार भवनाच्या पद्मश्री भंवरलाल जैन  सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. जनहित सेवेमध्ये माध्यमांची भूमिका   या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा माहिती अधिकारी ज्ञानेश्वर इगवे हे उपस्थित होते. याप्रसंगी पत्रकार संघाचे अध्यक्ष हेमंत काळुंखे, कार्यवाहक अशोक भाटीया, ज्येष्ठ पत्रकार श्रीकृष्ण जळूकर आदी मान्यवर उपस्थित होते.
            यावेळी बोलतांना रापतवार म्हणाले की,  इतिहासात डोकावतांना पत्रकाराची भूमिका ही नेहमी जागल्याची राहिली आहे, असे आपणास दिसते. या देशातील सर्वसामान्य नागरिकांच्या अधिकारांचे रक्षण राज्यघटनेने केले आहे. लोकशाहीचे चारही स्तंभ हे आपल्या अधिकारांबद्द्ल अधिक जागरुक दिसतात. साहजिकच कर्तव्याच्या जाणीवा अधिक वृद्धिंगत करण्याची जबाबदारी आपणा सा-यांवर आहे. अलिकडच्या काळात सोशल नेटवर्किंगच्या प्रसारामुळे प्रसारणावर कुणाचे नियंत्रण राहिलेले नाही. मात्र अशावेळी आपण आपल्या नैतिकतेच्या धोरणाच्या वकीलीची जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन त्यांनी केले.
            या कार्यक्रमास पत्रकार संघाचे सरचिटणीस प्रमोद पाटील, उपाध्यक्ष कैलास शिंदे, दिलीप शिरुडे, राजेश यावलकर तसेच रितेश भाटीया, हेमंत पाटील, संजय निकुंभ आदी  पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माहिती अधिकारी मिलिंद दुसाने यांनी तर आभार प्रदर्शन सुरेश सानप यांनी केले. कार्यक्रमास पत्रकार तसेच शहरातील मान्यवर प्रतिष्ठीत नागरीक, महिला आदी उपस्थित होते.


* * * * * * * *

Thursday, 14 November 2013

केळी पिकावरील किड रोगाचे निर्मूलन करावे

केळी पिकावरील किड रोगाचे निर्मूलन करावे

           जळगाव, दि. 14 :- यावल, रावेर , मुक्ताईनगर तालुक्यातील केळी पिकांचे सर्वेक्षण करण्यासाठी तालुकास्तरावर किड सर्वेक्षण व किड नियंत्रकाची नेमणूक करण्यात आली आहे.
          सद्यस्थितीत केळी पिकावर किडींचा प्रादुर्भाव आढळून आलेला आहे. सदरचे किड रोग नियंत्रणासाठी कृषी विभागाने पुढीलप्रमाणे सल्ला दिला आहे. - फुलकिडीने प्रादुर्भाव झालेल्या केळी घडाचे निरीक्षण घेवून अपरीपक्व फळांवर खरचटल्या सारखा भाग दिसल्यास प्रादुर्भावग्रस्त फळांची नोंद घेवून 10  टक्के  किंवा 10-15 फुलकिडी प्रति केळीच्या बेचक्यात आढळल्यास ॲसिटामीप्राईड 5 मिली किंवा फिप्रोनील 15 मिली किंवा व्हर्टीसिलीयम 30 ग्रॅम +  स्टिकर 10 मिली 10 लिटर पाण्यातून फवारावे. किंवा 5 टक्के निंबोळी अर्क फवारावे.  पानाचा भाग जर करपाग्रस्त असेल तर प्रकाशसंश्लेषण क्रियेत अडथळा निर्माण होतो. त्यामुळे करपाग्रस्त पान पूर्णपणे न काढता फक्त करपाग्रस्त भागच काढावा. तसेच त्यावर प्रॉपीकोनॅझोल 5 मिली  +  खनीज तेल( मिनरल ऑईल ) 100 मिली 10 लिटर पाण्यातून फवारावे.

* * * * * * * * *

18 नोव्हेंबर रोजी महिला लोकशाही दिन

           जळगाव, दि. 14 :-  जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन सोमवार दिनांक 18 नोंव्हेबर 2013 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी 11.00 वाजता आयोजित करण्यांत आलेला आहे. तरी संबंधीत समस्याग्रस्त व पिडीत महिलांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सदस्य सचिव महिला लोकशाही दिन समिती तथा  जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी , जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.                                                      
                                     
* * * * * * * * *

सहकार पुरस्कारासाठी  प्रस्ताव मागविणे !

           जळगाव, दि. 14 :- सहकार क्षेत्रात उत्कृष्ट काम करणा-या संस्थांना पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यासाठी शासनाने  सहकार पुरस्कार देण्याचे ठरविले आहे. इच्छूक संस्थांनी सविस्तर प्रस्ताव तयार करुन ते संबंधित जिल्हा उपनिबंधक, विभागीय सहनिबंधक कार्यालयात दिनांक 15 नोव्हेंबर 2013 पर्यत सादर करावेत. अधिक माहितीसाठी संस्थांनी संबंधित सहाय्यक निबंधक, जिल्हा उपनिंबधक, विभागीय सहनिबंधक कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांनी केले आहे.


* * * * * * * * *

Wednesday, 13 November 2013

माहितीपट महोत्सवाचे 23 नोव्हेंबरला जळगावात आयोजन

माहितीपट महोत्सवाचे 23  नोव्हेंबरला
जळगावात आयोजन

       जळगाव, दिनांक 13 :- चित्रपट निर्मितीच्या शताब्दी वर्षानिमित्ताने सांस्कृतीक कार्य विभागाकडून प्रत्येक जिल्हयात लघुपट व माहितीपट प्रदर्शन महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. जळगाव येथे नटवर सिनेमागृहात 23 व 24 नोव्हेंबर रोजी लघुपट व माहितीपट महोत्सवाचे आयोजन केले जात आहे. या महोत्सवाच्या आयोजनासाठी निवासी उपजिल्हाधिकारी धनंजय निकम यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या दालनात आज पहिली बैठक झाली.
            या लघुपट व माहितीपट महोत्सवात 5 लघुपट  व 5 माहितीपट प्रदर्शित केले जात असून नटवर सिनेमागृहाच्या स्क्रिन क्रमांक दोनवर याचे प्रदर्शन केले जाणार आहे. जिल्हयातील 18 वर्षावरील सर्व रसिकांसाठी हा महोत्सव विनाशुल्क खुला आहे. या महोत्सवात प्रदर्शित होणारे लघुपट मुक्ती, भिंतीमागे, कोलाज, कातळ, विवर - द ब्लॅक होल, असे असून माहितीपट - देवराई, व्हि. बाबासाहेब, मुंबई ट्रेन हॉकर्स,सावित्री, मन्माया या पारितोषिक प्राप्त कलाकृतीचा समावेश आहे.
             या बैठकीस जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिनल कुटे, महानगर पालिकेचे उपआयुक्त अविनाश गांगुडे, अनिल भोळे, शंभू पाटील, दिपक चांदोरकर, हेमंत काळुंखे, विनोद ढगे आदि मान्यवर उपस्थित होते.

* * * * * * * * *

सूक्ष्म व लघु उपक्रमासाठी 22 नोव्हेंबर रोजी कार्यशाळा

              जळगाव, दिनांक 13 :- नॅशनल स्मॉल इंड्रस्टीज कारपोरेशन लि. ( एनएसआयसी) नाशिक तर्फे सूक्ष्म व लघु उपक्रमासाठी दिनांक 22 नोव्हेंबर 2013 रोजी सकाळी 10 वाजता  एक दिवशी कार्यशाळा जिल्हा उद्योग केंद्र जळगाव येथे आयोजित करण्यात आली आहे. सदर कार्यशाळेत मान्यवरांचे मार्गदर्शन लाभणार असून कार्यशाळेमध्ये एनएसआयसी रजिस्टेशन, निविदा प्रक्रियेबाबत मार्गदर्शन, केंद्र शासन / शासकीय कार्यालय खरेदी प्रक्रियामध्ये सूक्ष्म व लघु उद्योग घटकांना प्राधान्य, अनु .जाती / जमाती प्रवर्गतील उद्योजकांना रजिष्टेशन मध्ये विशेष सवलत या विषयवर चर्चा होणार आहे.
            जिल्हा उद्योग केंद्र, जळगाव तर्फे जिल्हयातील सर्व अस्तित्वात असलेले सूक्ष्म व लघु उद्योगांनी सदर कार्यशाळेस उपस्थित रहावे असे आवाहन प्र. महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र जळगाव यांनी केले आहे.

* * * * * * * * *

जिल्हा परिषदेचा सन 2012-2013 वार्षिक  अहवाल प्रसिध्द

            जळगाव, दिनांक 13 :-  जिल्हा परिषद व पंचायत समित्या ( वार्षिक प्रशासन अहवाल) नियम 1964 मधील नियम 9 अन्वये  जिल्हा परिषदेचा सन 2012-2013  चा वार्षिक प्रशासन अहवाल जिल्हा परिषद ठराव क्र. 170 नुसार  दिनांक 9 ऑक्टोबर 2013 रोजी मंजूर करण्यात आला आहे. असे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती शीतल उगले यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

* * * * * * * * *

निवृत्तीवेतनधारकांनी 20 नोव्हेंबर पूर्वी
 हयातीचे दाखला सादर करावेत

       जळगाव, दि. 13 :- जळगाव कोषागारामार्फत निवृत्तीवेतन घेणा-या राज्य निवृत्तीवेतन धारकांचे व इतर राज्य निवृत्ती वेतन / कुटूंब निवृत्तीवेतन धारकांनी 1 नोव्हेंबर रोजी निवृत्तीवेतन धारक हयात असल्याचे व पुनर्विवाह न केल्याचे प्रमाणपत्र कोषागारास संबंधीत बँकेमार्फत सादर करणे आवश्यक आहे.  प्रमाणपत्र, दाखला प्राप्त न झाल्यास माहे डिसेंबर 2013 चे निवृत्तीवेतन थांबविण्याबाबत आदेश आहेत. तरी संबंधीतानी हयातीचे दाखले संबंधीत बँकेस दिनांक 20 नोव्हेंबर 2013 पावेतो सादर करावे असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी,शि. बा. नाईकवाडे  यांनी केले आहे.

* * * * * * * * *

बेरोजगारांनी बीज भांडवल कर्ज योजनेचा लाभ घ्यावा

              जळगाव, दि. 13 :- अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत राबविण्यात येणा-या बीज भांडवल कर्ज योजनेच्या माहितीसाठी आर्थिकदृष्टया दुर्बल घटकांतील सुशिक्षित बेरोजगारांनी जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक संचालक  जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र जळगाव यांनी केले आहे. आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील सुशिक्षित बेरोजगारांसाठी रोजगार व स्वयंरोजगारांच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची स्थापना करण्यात आलेली आहे. ज्या प्रवर्गाकरिता शासनाचे महामंडळ नाही अशा प्रवर्गातील आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील सुशिक्षित बेरोजगारांच्या आर्थिक उन्नतीचा मार्ग खुला करण्यासाठी स्वयंरोजगाराच्या योजना राबवून त्यात येणा-या अडचणी दूर करणे हा या महामंडळाचा उद्देश आहे.

* * * * * * * * *
             
23 नोव्हेंबर रोजी महालोक अदालतचे आयोजन

         जळगाव, दिनांक 13 :- सदस्य सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जळगाव यांच्यामार्फत कामगार न्यायालय, जळगाव येथील  प्रलंबीत असलेले खटले, तडजोडीने व लवकरात लवकर निपटारा करण्यासाठी शनिवार दिनांक 23 नोव्हेंबर 2013 रोजी सकाळी 10.30 वाजता कामगार न्यायालय परिसर, जुने बी. जे. मार्केट , 3 रा मजला  जी गाळा, जळगाव येथे महालोक अदालत घेण्यात येणार आहे.
                 कामगार न्यायालयात प्रलंबित असलेल्या केसेस ज्यांना महालोक अदालतमध्ये ठेवावयाच्या असतील त्या सर्व संबंधीतानी स्वत: वकीलांमार्फत, प्रतिनिधीमार्फत महालोक अदालतमध्ये प्रकरण ठेवण्याबाबतचे संमतीपत्रक भरुन द्यावे,  असे आवाहन न्यायालय अधिक्षक श्री. अशोग पानपाटील यांनी केले आहे.


* * * * * * * * *

Tuesday, 12 November 2013

शासनाच्या खरिप अनुदान-2012 चे वाटप 84 टक्के पूर्ण : तहसिलदार बाबासाहेब गाढवे

शासनाच्या खरिप अनुदान-2012 चे वाटप 84 टक्के पूर्ण
                                           : तहसिलदार बाबासाहेब गाढवे
           
            चाळीसगाव दि. 12 :- शासनाच्या खरिप अनुदान 2012 चे अनुदान वाटप तालुक्यातील शेतकरी लाभार्थ्यांना वितरीत करण्यात येत असून तालुक्यातील 136 गावांपैकी 135 गावातील लाभार्थ्यांना सदर अनुदानाचे वाटप पुर्ण   झाले आहे, एकूण अनुदानाच्या 84 टक्के अनुदान आजतागायत वितरीत करण्यात आल्याचे तहसिलदार बाबासाहेब गाढवे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
            खरिप अनुदान 2012 च्या सर्व्हेक्षणानुसार प्राप्त एकूण अनुदान रु. 19 कोटी 13 लाख इतक्या अनुदानापैकी रु. 16 कोटी 4 लाख इतके अनुदान हे तालुक्यातील 49 हजार 625 शेतकरी लाभार्थ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यामार्फत वितरीत करण्यात आले असून सरासरी एकूण 84 टक्के इतके अनुदान आजतागायत वितरीत झाले आहे. उर्वरित अनुदान वितरणासाठी वंचित शेतकरी लाभार्थ्यांनी आपल्या जवळच्या जिल्हा बँकेत अथवा राष्ट्रीयकृत बँकेत आपले खाते उघडून आपला बँकेचा खातेक्रमांक संबंधित तलाठयांकडे तात्काळ जमा करावा असे आवाहनही तहसिलदार गाढवे यांनी केले आहे.


 * * * * * * * * 

Monday, 11 November 2013

आगामी सिंहस्थ कुंभमेळा आढावा बैठक संपन्न


आगामी सिंहस्थ कुंभमेळा आढावा बैठक संपन्न

सिंहस्थ कुंभमेळाचे नियोजनाची माहिती
दोन दिवसात सादर करण्याचे आदेश
                                                  अपर मुख्य सचिव -अमिताभ राजन

नाशिक दि 11 :- सिंहस्थ कुंभमेळाचे सुयोग्य नियोजन व अंमलबजावणी करण्यासाठी संबंधित यंत्रणानी गेल्या एक वर्षापासून केलेल्या कामाची सद्यस्थिती व प्राप्त निधीची माहिती येत्या दोन दिवसात गृहमंत्रालयात सादर करावी असे आदेश राज्याचे गृह विभागाचे अपर मुख्य सचिव अमिताभ राजन यांनी नाशिक येथे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मध्यवर्ती सभागृहात आगामी सिंहस्थ कुंभमेळा आढावा बैठकीत मार्गदर्शन करतांना‍ आज दिले.
            ही माहिती प्राप्त होताच संबंधित विभागाच्या उच्चस्तरीय अधिका-याकडे निधी व कामाच्या मंजुरीसाठी पाठपुरावा करणे शक्य होणार आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळातील कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती हाताळण्यासाठी पोलिस आयुक्त व नाशिक ग्रामीण पोलिस अधिक्षकांनी अधिक दक्ष राहून आराखडा तयार करावा. साधुग्राम व शाही मिरवणुक मार्गावर कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही तसेच या ठिकाणी बंदोबस्तासाठी असणा-या अधिकारी व कर्मचा-यांना सर्व सोयी सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात असेही राज्याचे गृह विभागाचे अपर मुख्य सचिव अमिताभ राजन यांनी यावेळी सांगितले.
            जनहित लक्षात घेवून टाळता न येणारी खाजगी जमिन संपादनाची कामे तातडीने पुर्ण करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आदेश देवून नाशिक विभागाचे महसुल आयुक्त रवींद्र जाधव म्हणाले निलपर्वतावरील  रस्त्याचे काँक्रटीकरण व तिळनंदी येथील त्रिशुळ उभारणीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने अधिक सर्तक राहावे. पावसाळयाच्या कालावधीत सिंहस्थ पर्वण्या येत असल्या तरी या परिसरातील घाटाचे पाणी शुध्दीकरण्यासाठी ही वेळीच नियोजन करण्याची आवश्यकता आहे.
प्रारंभी जिल्हाधिकारी विलास पाटील यांनी गेल्या महिन्यात 17 ऑक्टोबर रोजी मा. मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शिखर समितीची बैठकीत इतिवृत्ताची माहिती देवून प्रत्येक विभागाने सिंहस्थ कुंभमेळासाठी अर्थसंकल्पात स्वतंत्र तरतुद करुन घ्यावी असे सांगितले. पोलिस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल, पोलिस अधिक्षक प्रविण पडवळ,महापालिका आयुक्त संजय खंदारे ,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुकदेव बनकर, सिंहस्थ कुंभमेळा कक्षाचे उपजिल्हाधिकारी महेश पाटील आदिसह विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

* * * * * * * * *