Thursday, 8 August 2013

औद्योगिक प्रशिक्षण संस्था विशेष प्रवेश फेरी



वृत्त क्र  :-  536                                                                                                   दिनांक  :- 8  ऑगस्ट 2013
औद्योगिक प्रशिक्षण संस्था विशेष प्रवेश फेरी

                  जळगांव, दि. 8 :- राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधून राबविण्यात येणारी  प्रवेश प्रक्रिया सुलभ, जलद, अचूक आणि पारदर्शक करण्याच्या दृष्टीकोनातून ऑगस्ट 2013 प्रवेशसत्राची प्रक्रिया मुनष्यबळाऐवजी संगणकीय पध्दतीने ( Online) करण्यांत आली आहे. त्यानुसार प्रवेशाची अंतिम फेरी पूर्ण झालेली आहे. सदर पध्दतीचा अनुभव प्रवेशोच्छुक उमेदवारांना नसल्याने काही उमेदवार विहित कालावधीत अर्ज करु शकले नाहीत, काही अर्जाची नोंदणी केल्यानंतर शुल्क भरुन नोंदणी निश्चित करु शकले नाहीत, काही उमेदवारांना व्यवसाय अभ्यासक्रमांचे विकल्प  ( Options)  भरता आले नाहीत, निवड झालेले काही उमेदवार अतिवृष्टीमुळे रुजू होऊ शकले नाहीत या प्रकारच्या कोणत्याही कारणानी ज्यांची प्रवेशाबाबतची संधी हुकलेली आहे अशा सर्व उमेदवारांनी अंतिम प्रवेश फेरीनंतर रिक्त राहिलेल्या जागांवर प्रवेशाची संधी घेण्यासाठी गुणवत्तेवर आधारीत असलेल्या विशेष प्रवेश फेरीसाठी दिनांक 10 ऑगस्ट 2013 ते 13 ऑगस्ट 2013 या कालावधीत ( Online)  पध्दतीने फक्त नागरी सुविधा केंद्र (C S C)  मार्फत अर्ज करावेत. निवड यादी दिनांक 14 ऑगस्ट 2013 रोजी प्रसिध्द करण्यात येऊन त्याचदिवशी प्रवेश प्रक्रिया करण्यात येईल. प्रवेश प्रक्रियेची सविस्तर माहिती www.maharojgar.gov.in  या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. असे प्राचार्य औद्योगिक प्रशिक्षण संस्था जळगांव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

* * * * * *
वृत्त क्र  :-  536                                                                                                  दिनांक  :- 8  ऑगस्ट 2013
औद्योगिक प्रशिक्षण संस्था (मुलींची) विशेष प्रवेश फेरी

                  जळगांव, दि. 8 :- राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधून राबविण्यात येणारी  प्रवेश प्रक्रिया सुलभ, जलद, अचूक आणि पारदर्शक करण्याच्या दृष्टीकोनातून ऑगस्ट 2013 प्रवेशसत्राची प्रक्रिया मुनष्यबळाऐवजी संगणकीय पध्दतीने ( Online) करण्यांत आली आहे. त्यानुसार प्रवेशाची अंतिम फेरी पूर्ण झालेली आहे. सदर पध्दतीचा अनुभव प्रवेशोच्छुक उमेदवारांना नसल्याने काही उमेदवार विहित कालावधीत अर्ज करु शकले नाहीत, काही अर्जाची नोंदणी केल्यानंतर शुल्क भरुन नोंदणी निश्चित करु शकले नाहीत, काही उमेदवारांना व्यवसाय अभ्यासक्रमांचे विकल्प  ( Options)  भरता आले नाहीत, निवड झालेले काही उमेदवार अतिवृष्टीमुळे रुजू होऊ शकले नाहीत या प्रकारच्या कोणत्याही कारणांनी त्यांची प्रवेशाबाबतची संधी हुकलेली आहे अशा सर्व उमेदवारांनी अंतिम प्रवेश फेरीनंतर रिक्त राहिलेल्या जागांवर प्रवेशाची संधी घेण्यासाठी गुणवत्तेवर आधारीत असलेल्या विशेष प्रवेश फेरीसाठी दिनांक 10 ऑगस्ट 2013 ते 13 ऑगस्ट 2013 या कालावधीत ( Online)  पध्दतीने फक्त नागरी सुविधा केंद्र (C S C)  मार्फत अर्ज करावेत. निवड यादी दिनांक 14 ऑगस्ट 2013 रोजी प्रसिध्द करण्यात येऊन त्याचदिवशी प्रवेश प्रक्रिया करण्यात येईल. प्रवेश प्रक्रियेची सविस्तर माहिती www.maharojgar.gov.in  या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
              औद्योगिक प्रशिक्षण संस्था (मुलींची) जळगांव या संस्थेत प्रवेशासाठी उपलब्ध व्यवसाय – बेकरी आणि कन्फेक्शरी, ड्रेस मेकिंग, हेअर आणि स्किन केअर, फॅशन टेक्नॉलॉजी,  इलेक्टा्रॅनिक मेकॅनिक , इनफॉरमेशन टेक्नॉलॉजी  &  इएसएम इयत्ता 10 वी, कटिंग सुईग असे प्राचार्य औद्योगिक प्रशिक्षण संस्था जळगांव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
* * * * * * *

No comments:

Post a Comment